Wednesday, October 5, 2016

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचे आव्हान


नमस्कार ,

" भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचे आव्हान "

हे आत्ता परळच्या परळच्या बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ऍनिमल म्हणजेच परळच्या बैल घोडा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी कुत्र्यांपासून , खास करून भटक्या कुत्र्यांपासून लेप्टोचा प्रसार होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

गुरुवार, 6 ओक्टोम्बर , 2016 च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .

गेले अनेक महिने हिच गोष्ट मी , डोंबिवली चे डॉक्टर आनंद हर्डीकर , जगाला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय , पण नेहमीप्रमाणे 99.99% भारतीयांची " माझ्या बापाचे काय जाते ? " / " WHAT GOES MY FATHER’S " हि प्रवृत्ती आड येते .

त्याच प्रमाणे राजकारण्यांची त्यांच्या गळ्यापर्यंत जो पर्यंत येत नाही , अथवा त्यांच्या मतांवर काही फरक होत नाही ( VOTE BANK ) तो पर्यंत शांतपणे बसणें , हि प्रवृत्ती आड येते .

आपण कृपया हा लेख नीट वाचा , लेप्टो चा संसर्ग झालेल्या प्राण्याचे मल-मूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते . अश्या पाण्यातून चालत जाणाऱ्या व्यक्तींच्या पायाला अथवा पायाच्या नखाला जखम असेल तर जखमेतून लेप्टोचे विषाणू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात .

आपल्याला हे वाचून धक्का बसेल कि फक्त डोंबिवली या शहरात दररोज अंदाजे 2.5 टन ( अडीच टन ) एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा पसरलेली असते . भटक्या कुत्र्यांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे , त्यामुळे हा प्रश्न अक्षरशः हाताबाहेर चालला आहे.

तेंव्हा झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीयांनो उठा , जागे व्हा .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !




No comments:

Post a Comment