Sunday, October 23, 2016

ठाणेकरांकडून ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर यांना धन्यवाद

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" ठाणेकरांकडून ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर यांना धन्यवाद "

हे एक महत दुर्दैव असे आहे आहे कि बहुतांश ठाणेकरांना " कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा " इतिहास माहीत नाही.. असे असूनही अनेक व्यक्ती या वर प्रतिक्रिया देत आहेत.

थोडक्यात सांगतो . त्या अगोदर तुम्ही प्रतिक्रिया द्याल कि मी कोण चोमडा , आणि हे मला कसे काय माहीत ? थोडं थांबा , तुम्हाला सगळं कळेल .

सन २००३ रोजी त्यावेळच्या युतीकाळातील सरकारने ठाणे पूर्व येथील " ठाणे व मुंबई " यांना वाहन मार्गाने जोडणारा रेल्वे वरून जाणाऱ्या कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. सध्याच्या कोपरी पुलावरून अक्षरशः २ X २ अशी एकूण ३ / ४ एका वेळेला वाहने जाऊ शकतात , ती या रुंदी कारणामुळे ४ X ४ अशी होणार होती. पण म्हणे २०१२ / २०१३ पर्यंत रेल्वे व PWD यांच्यात एकमत न झाल्यामुळे या रुंदीकरणाबाबत काहीही हालचाल झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे , त्या काळात रेल्वे ( दिल्ली ) केंद्रात त्याच प्रमाणे PWD ( महाराष्ट्र ) राज्यात दोन्ही कडे काँग्रेस - राष्ट्रवादी यांची युतीची सत्ता होती , त्याचप्रमाणे ठाणे येथे खासदार , अनेक आमदार काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या युतीचे होते , तरीही २०१२ / २०१३ पर्यंत या रुंदीकरणाच्या कामात काहीही प्रगती झाली नव्हती.

अंदाजे २०१२ मध्ये ठाणे येथील एक जागरूक नागरिक , श्री. निलेश आंबेकर यांना माहिती अधिकाराखाली सगळी माहिती मिळाली . त्याने व मी मिळून हि माहिती श्री. संजय केळकर साहेबांना दिली , त्यासोबत आम्ही केळकर साहेबांना १७७९ ठाणेकरांच्या सह्यांचे कपारी पुलाच्या रुंदीकरणाबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी ते आमदार नव्हते . त्यावेळी देखील केंद्रात त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात दोन्ही कडे काँग्रेस - राष्ट्रवादी यांची युतीची सत्ता होती. तरीही केळकर साहेबांनी २०१२ / २०१३ पासून ते आजतागायत अथक पाठपुरावा केला , अधिवेशनात पाठपुरावा केला , रेल्वे , PWD बरोबर पाठपुरावा केला , वाढीव पैशासाठी शासनाकडे पुरावा केला , आणि काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री यांनी २९५ कोटी रुपयाचा हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दुर्ष्टीने ठाणेकरांसाठी दिवाळी ची भेट मिळाली .

या अगोदर घोडबंदर मार्ग , ठाणे येथील हवेचे प्रदूषण करणाऱ्या ५ कारखान्यांविरुद्धच्या माझ्या ( २००२ ते २०१२ चाललेल्या ) लढाईत केळकर साहेबांनी केलेली अनमोल मदत मी विसरलेलो नाही . त्यांच्या मुळे आम्ही घोडबंदर मार्ग येथील रहिवासी रहिवासी हवेच्या प्रदूषणातून मुक्त झालो आहोत.


अश्या या समाजकारणी असलेल्या एका सुशिक्षित , सुसंस्कृत आमदाराच्या या प्रयत्नांसाठी ठाणेकर नागरिकांतर्फे आज , रविवार , २३. १०. २०१६ रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्यावेळी ठाण्यातील डॉक्टर उदय कुलकर्णी , श्री. सीताराम राणे , श्री. दत्त घाडगे , श्री. मोहंती , सुमेध शहा हे हजर होते . काही कारणांमुळे श्री. निलेश आंबेकर व इतर काही ठाणेकर येऊ शकले नाहीत. 
 
 

No comments:

Post a Comment