Monday, October 31, 2016

कुत्र्यांचा त्रास भारत या देशात फक्त राज्यसभा सदस्यांनाच होतो का ?

नमस्कार , सुन्दर  संध्याकाळ ,

कुत्र्यांचा त्रास भारत या देशात फक्त राज्यसभा सदस्यांनाच होतो का ?

मार्च, २०१६ मध्ये एका इंग्रजी दैनिकातील जाहिरात वाचा , सगळं तुमच्या लक्ष्यात आपोआपच येईल .
काहो " भटक्या कुत्र्यांचा " त्रास तुम्हा , आम्हा सामान्य भारतीय नागरिकांना हा भटक्या कुत्र्यांचा त्रास होत नाही का ?

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt them

Make INDIA  – A COUNTRY  Free From Stray Dog Bites.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet








Sunday, October 30, 2016

STRAY DOG MENACE IN KERALA

" भारत " देशातील " केरळ " या राज्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छादा  मुळे काय घडत आहे , हे ३१. १०. २०१६ च्या " The  Times of India " व " महाराष्ट्र टाईम्स " मध्ये छापून आलेल्या या बातम्यांवरून कळून येते.


People’s collectives to battle stray dog menace in city - " The Hindu " news paper dt. 31.10.2016

" People’s collectives to battle stray dog menace in city "

under this heading a news article is published in " The Hindu " news paper dt. 31.10.2016 .

http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-kerala/article9286968.ece?css=print


Return to frontpage
» Today's Paper » KERALA
Published: October 31, 2016 00:00 IST | Updated: October 31, 2016 05:34 IST KOCHI, October 31, 2016
People’s collectives to battle stray dog menace in city

G. Krishnakumar

Anti-stray dog movement to take its drive to the next level by launching groups in each local body

Irked by the laxity on the part of the government and enforcement agencies in reining in the stray dog menace, the anti-stray dog movement is planning to launch an elaborate exercise involving hundreds of ‘people’s collectives’ in Ernakulam.

Official start

Come November 1 and the movement will get an official start with members staging a dharna in front of the Kochi Corporation office.

“We want to take the movement to a bigger level. We are getting tremendous support from the public, who are fed up with the rising incidents of deaths and injuries caused by stray dogs,” said Jose Maveli, a key campaigner.

The movement is planning to launch people’s collectives in each local body. Mr. Maveli said the groups would include people from various walks of life. “The aim is to form collectives involving people from various walks of life. The stray dog menace has turned alarming. We have no other option but to launch a bigger movement demanding the eradication of the dog menace,” he said.

Each collective will identify areas affected by the menace. They will form squads to keep vigil against animals attacking people. The anti-stray dog movement will also offer legal aid to persons who take the lead in culling stray dogs.

Public protest

The move to form people’s collectives received a boost, after the public opposed attempts to arrest the members of the anti-stray dog movement at Varkala, where an elderly man died after being attacked by stray dogs. Mr. Maveli urged dog lovers to come forward and provide shelters to stray dogs, rather than issuing statements that stray dogs should not be culled.

“Who will take care of the commoner on the streets who has no one for support after being attacked by stray dogs?” he asked.

Friday, October 28, 2016

तमाम भारतीय नागरिकांना हि दिवाळी , हे नवीन वर्ष " श्वान दंश " विरहित जाओ , हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,
तुम्हाला , तुमच्या कुटुंबियांना तमाम भारतीय नागरिकांना हि दिवाळी , हे नवीन वर्ष
"
श्वान दंश " विरहित जाओ , हीच ईश्वर चरणी प्रार्थना !












DOG BITE CASES ON THE RISE IN KALYAN AREA - HINDUSTAN TIMES dt. 29.10.2016 .

" DOG BITE CASES ON THE RISE IN KALYAN AREA "

An article published in " HINDUSTAN TIMES " dt. 29.10.2016 .
 
It is an IRONY that everybody is neglecting this serious issue
 
 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील पीडितेला नुकसान भरपाई द्या ! उच्च न्यायालयाचे आदेश

नमस्कार ,

" भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील पीडितेला नुकसान भरपाई द्या ! उच्च न्यायालयाचे आदेश " - नवा काळ
" कुत्र्याने बळी घेतलेल्या मुलाच्या कुटुंबाला भरपाई " - पुढारी
" श्वान दंशाबाबत भरपाईची सूचना " - महाराष्ट्र टाईम्स

या अश्या मथळ्याच्या बातम्या शुक्रवार , २८. १०. २०१६ च्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या आहेत.त्या बातम्या येथे देत आहे.

याच आशयाची विनंती मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना १२. ०४. २०१५ रोजी केली होती . श्वान दंश ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबद्दल मी केलेल्या मागणीची बातमी २६. ०४. २०१५ च्या " पुढारी " या वर्तमान पत्रात व २७. ०४. २०१५ च्या नागपूर " दैनिक भास्कर " या हिंदी वृत्त पत्रात देखील छापून आले होते. किती गम्मत आहे ना , अवैध दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना शासन भरपाई देते , पण श्वान दंश ग्रस्तांना मात्र वाऱ्यावर सोडते.

दुखः एवढेच आहे कि एवढे मानवी प्राण्यांचे बळी जाऊन देखील " भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध अश्या वाढणाऱ्या संख्येवर " व त्यामुळे वाढत जाणाऱ्या श्वान दंशाच्या घटनांवर
शासन दरबारी काहीच हालचाल सुरु नाही.

भारत कोठे चालला आहे ?

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





Wednesday, October 26, 2016

Stray dogs maul sleeping 90-year-old to death in Kerala

Oct 27 2016 : The Times of India (Thane)
Stray dogs maul sleeping 90-year-old to death in Kerala
Thiruvananthapuram:
TIMES NEWS NETWORK


Stray dogs claimed another life in Kerala on Wednesday with a pack mauling a 90-year-old man to death at Varkala here. Raghavan had been asleep on his verandah when he was attacked in the morning. He suffered serious injuries and was rushed to the medical college hospital here where he died at around 2.55pm. The gruesome incident comes in the wake of the August 20 death of a 65-year old woman, Siluvamma, at Pulluvila here due to excessive bleeding caused by dog bites. An SC-appointed committee headed by former Kerala high court judge S Siri Jagan -in its report submitted to the apex court last week -had sought immediate steps against the menace. Residents said Raghavan, who had been living in his son Murali's house, had a habit of sleeping on the verandah. His daughter-in-law had left the house, which did not have a wall surrounding the compound, to buy milk when he was attacked by four to five dogs.
A woman in the neighbourhood saw the dogs and alerted other residents who drove away the pack. They said they saw blood dripping from the dogs' mouths when they scared them away . Raghavan's face was disfigured beyond recognition as the dogs had bitten off his nose and lips.
Hospital sources said Raghavan had lost a considerable amount of blood, leading to hypoxia, a deficiency of oxygen in the tissues. He had breathed blood into his lungs Raghavan is survived by his wife, a son and three daughters.



 



Tuesday, October 25, 2016

आमची शाळा


नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" आमची शाळा "

मला आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला आवडते . त्यातूंनच अशी कविता सुचते .

मी टिळक नगर , चेंबूर , मुंबई - ४०० ०८९ येथील " आमची शाळा " या शाळेत शिकलो . माझ्या शाळेच्या आठवणी या कवितेत व्यक्त केल्या आहेत.

" नवा काळ " या वृत्त पत्राचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी माझी हि कविता २५. १०. २०१३ रोजी छापून वाचकांपर्यंत नेली होती. कविता वाचून अनेक वाचकांचे कविता आवडल्याचे दूरध्वनी मला आले होते

ता. क. - हि कविता , मी स्वतः लिहिलेली आहे . कोणीतरी लिहिलेली व स्वतःच्या नावाने खपविलेली नाही.
 
 

Monday, October 24, 2016

पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद - भोपर गावात दोन बालकांना चावा : कल्याण-डोंबिवलीकर हैराण

नमस्कार ,

" पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद "
भोपर गावात दोन बालकांना चावा : कल्याण-डोंबिवलीकर हैराण

रविवार , २३. १०. २०१६ च्या " पुढारी " या वृत्तपत्रातील हि एक अंगावर अंगावर काटा आणणारी हि बातमी कृपया वाचा, व श्वानदंश ग्रस्त बालकाला खोलवर झालेली जखम पहा .

आपणाला हे माहित नसेल कि श्वान दंशाची तीव्रता हि मानवी दंशाच्या तीव्रतेपेक्षा अंदाजे ३.५ ते ४ पट असते . ( BITE FORCE ).

" भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.

" अश्या श्वान दंशाच्या वेळी नेमके " प्राणी मित्र " व " प्राणी मैत्रिणी " कोठे गायब होतात " याचे मला उत्तर आजतागायत मिळालेले नाही.

या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढी विरुद्धची माझी लढाई गेल्या ५ / ६ वर्षांपासून चालूच आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet



पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला

नमस्कार ,

" पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला "

सोमवार , २४. १०. २०१६ च्या " ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील हि एक अंगावर अंगावर काटा आणणारी बातमी कृपया वाचा.

आपणाला हे माहित नसेल कि श्वान दंशाची तीव्रता हि मानवी दंशाच्या तीव्रतेपेक्षा अंदाजे ३.५ ते ४ पट असते . ( BITE FORCE ).

या विरुद्धची माझी लढाई गेल्या ५ / ६ वर्षांपासून चालूच आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


Sunday, October 23, 2016

" कल्याणमध्ये चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्याने घेतला चावा " , " दोन बालकांवर कुत्र्याचा हल्ला "

नमस्कार ,

" कल्याणमध्ये चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्याने घेतला चावा " , " दोन बालकांवर  कुत्र्याचा हल्ला " ,

हे मथळे , रविवार , २३. १० . २०१६ च्या " नवा काळ " व " महाराष्ट्र टाईम्स " या दोन वृत्तपत्रांमधील. आहेत .
हे असे भारत या देशात दररोज चालू आहे.

" भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो.
तुम्हाला हे काही विचित्र वाटत नसेल , पण हे लक्ष्यात घ्या कि भारत या देशात भयावह वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


ठाणेकरांकडून ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर यांना धन्यवाद

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" ठाणेकरांकडून ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर यांना धन्यवाद "

हे एक महत दुर्दैव असे आहे आहे कि बहुतांश ठाणेकरांना " कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा " इतिहास माहीत नाही.. असे असूनही अनेक व्यक्ती या वर प्रतिक्रिया देत आहेत.

थोडक्यात सांगतो . त्या अगोदर तुम्ही प्रतिक्रिया द्याल कि मी कोण चोमडा , आणि हे मला कसे काय माहीत ? थोडं थांबा , तुम्हाला सगळं कळेल .

सन २००३ रोजी त्यावेळच्या युतीकाळातील सरकारने ठाणे पूर्व येथील " ठाणे व मुंबई " यांना वाहन मार्गाने जोडणारा रेल्वे वरून जाणाऱ्या कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. सध्याच्या कोपरी पुलावरून अक्षरशः २ X २ अशी एकूण ३ / ४ एका वेळेला वाहने जाऊ शकतात , ती या रुंदी कारणामुळे ४ X ४ अशी होणार होती. पण म्हणे २०१२ / २०१३ पर्यंत रेल्वे व PWD यांच्यात एकमत न झाल्यामुळे या रुंदीकरणाबाबत काहीही हालचाल झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे , त्या काळात रेल्वे ( दिल्ली ) केंद्रात त्याच प्रमाणे PWD ( महाराष्ट्र ) राज्यात दोन्ही कडे काँग्रेस - राष्ट्रवादी यांची युतीची सत्ता होती , त्याचप्रमाणे ठाणे येथे खासदार , अनेक आमदार काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या युतीचे होते , तरीही २०१२ / २०१३ पर्यंत या रुंदीकरणाच्या कामात काहीही प्रगती झाली नव्हती.

अंदाजे २०१२ मध्ये ठाणे येथील एक जागरूक नागरिक , श्री. निलेश आंबेकर यांना माहिती अधिकाराखाली सगळी माहिती मिळाली . त्याने व मी मिळून हि माहिती श्री. संजय केळकर साहेबांना दिली , त्यासोबत आम्ही केळकर साहेबांना १७७९ ठाणेकरांच्या सह्यांचे कपारी पुलाच्या रुंदीकरणाबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी ते आमदार नव्हते . त्यावेळी देखील केंद्रात त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात दोन्ही कडे काँग्रेस - राष्ट्रवादी यांची युतीची सत्ता होती. तरीही केळकर साहेबांनी २०१२ / २०१३ पासून ते आजतागायत अथक पाठपुरावा केला , अधिवेशनात पाठपुरावा केला , रेल्वे , PWD बरोबर पाठपुरावा केला , वाढीव पैशासाठी शासनाकडे पुरावा केला , आणि काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री यांनी २९५ कोटी रुपयाचा हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दुर्ष्टीने ठाणेकरांसाठी दिवाळी ची भेट मिळाली .

या अगोदर घोडबंदर मार्ग , ठाणे येथील हवेचे प्रदूषण करणाऱ्या ५ कारखान्यांविरुद्धच्या माझ्या ( २००२ ते २०१२ चाललेल्या ) लढाईत केळकर साहेबांनी केलेली अनमोल मदत मी विसरलेलो नाही . त्यांच्या मुळे आम्ही घोडबंदर मार्ग येथील रहिवासी रहिवासी हवेच्या प्रदूषणातून मुक्त झालो आहोत.


अश्या या समाजकारणी असलेल्या एका सुशिक्षित , सुसंस्कृत आमदाराच्या या प्रयत्नांसाठी ठाणेकर नागरिकांतर्फे आज , रविवार , २३. १०. २०१६ रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्यावेळी ठाण्यातील डॉक्टर उदय कुलकर्णी , श्री. सीताराम राणे , श्री. दत्त घाडगे , श्री. मोहंती , सुमेध शहा हे हजर होते . काही कारणांमुळे श्री. निलेश आंबेकर व इतर काही ठाणेकर येऊ शकले नाहीत. 
 
 

Saturday, October 22, 2016

" आमदार श्री. संजय केळकर यांचे ठाणेकरांतर्फे आभार प्रदर्शन "

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" आमदार श्री. संजय केळकर यांचे ठाणेकरांतर्फे आभार प्रदर्शन "

आज , रविवार , २३.१०.२०१६ रोजी , दुपारी १२.३० च्या दरम्यान ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर यांच्या कार्यालयात येण्याची कृपा करावी.

" कोपरी पुलाचे रुंदीकरण" जे २००३ ते २०१३ या काळात त्या काळातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे अडकले होते , पुढे सरकले नव्हते , ते केळकर साहेबांनी धडाडीने मार्गी लावले या साठी ठाणेकरांच्या वतीने मी त्यांचे आभार प्रदर्शन करणार आहे . आपण अनेकवेळा फक्त नावे ठेवत असतो , पण एखाद्याने चांगले काम केले तर त्याचे साधे आभार देखील मानीत नाही.

आपण त्यांना अंदाजे १८०० सह्यांचे निवेदन दिले होते हे आपणाला आठवत असेलच. निलेश आंबेकर याचा देखील यात मोठ्ठा वाटा आहे.

आपली उपस्थिती अत्यावश्यक आहे .

सत्यजित अ शाह - ठाणे
संपार्क क्रमांक - ०९८२११५०८५८

Thursday, October 20, 2016

समाजकारणी आमदार श्री. संजय केळकर ( ठाणे शहर ) यांच्या अथक पाठपुराव्यांना यश.


समाजकारणी आमदार श्री. संजय केळकर ( ठाणे शहर ) यांच्या अथक पाठपुराव्यांना यश.

ठाणेकर नागरिक मा. देवेंद्र जी फडणवीस - मुख्य मंत्री - महाराष्ट्र राज्य , व मा. श्री. संजय केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर यांचे आभारी आहे.

2003 साली हा प्रकल्प संमत झाला होता , पण तेव्हाच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना याचा पाठपुरावा करण्याची गरज भासली नाही . श्री. संजय केळकर साहेबांनी हा पाठपुरावा , सन 2013 पासून सुरू केला आणि गंमत म्हणजे त्यावेळी केंद्रात व राज्यात भा ज प ची सत्ता नव्हती.

हे सगळं मला माहीत आहे कारण या लढाईत श्री. निलेश आंबेकर - एक जागरूक ठाणेकर , व मी ( सत्यजित अ शाह ) यांचा खारीचा वाटा  आहे.

जर बाकीच्या राजकारण्यांनी , नेत्यांनी मोठं मोठ्ठे फलक ( HOARDINGS ) ठाणे शहरभर लावून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण हेच पूर्वापार चालत आलेले आहे . पण सध्याचा मतदार सुज्ञ झाला आहे. त्याला कोण काम करतं व कोण फक्त फलकांवर झळकतात हे कळू लागले आहे. आणि सुज्ञ मतदार हे सगळं मतपेटीतून दाखवून देतात.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !







Wednesday, October 19, 2016

कोपरी पूल रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांची २९५ कोटी रुपयांची मंजुरी.......


नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,

आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश ...

ठाणेकर नागरिकांतर्फे आमदार श्री संजय केळकर व मा. मुख्यमंत्री यांचे त्रिवार अभिनंदन

कोपरी पूल रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांची २९५ कोटी रुपयांची मंजुरी.......

सन २००३ रोजी कोपरी , ठाणे पूर्व येथील पुलाच्या रुंदीकरणासाठी मंजुरी मिळून देखील २०१३ पर्यंत काहीच हालचाल झाली नव्हती. रेल्वे व P W D , एकमेकांकडे फक्त ढकलत होते.

श्री.निलेश आंबेकर - एक जागरूक ठाणेकर यांना या बद्दल माहितीच्या अधिकाराखाली हि माहिती मिळाल्यावर ती गोष्ट श्री. संजय केळकर यांना सांगितल्यावर , श्री. संजय केळकर यांनी , या प्रश्नात स्वतः लक्ष्य घालून P W D व रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या व त्या दोन खात्यांमध्ये सु संवाद घडवून आणून , हा प्रकल्प पुढे सरकविला.

तोपर्यंत याचा खर्च वाढला होता , त्यामुळे हे रुंदीकरण पुन्हा अडकले होते.

भाजपा नेते आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरी पुलाच्या रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे. अनेक वर्षांपासून आमदार संजय केळकर हे या विषयाचा पाठपुरावा करत होते. जागरूक ठाणेकर नागरिक सत्यजित शहा, निलेश आंबेकर यांचा हि यात सहभाग होता. अगोदर या पुलासाठी ११३ कोटी मंजूर करण्यात आले होते. आता पुलाच्या रुंदीकरणाकरिता २९५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एम एम आर डी ए चे अधिकारी श्री. मदान यांच्याशी आ. केळकर यांनी चर्चा केली असता लवकरच या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करणार असल्याची माहिती आ. केळकर यांना दिली.

पी डब्लू डी कडे बजेट नसल्याने हे काम एम एम आर डी कडे सोपवण्यात आले होते अशी माहिती आ. संजय केळकर यांनी यावेळी बोलताना दिली. यापूर्वी अनेक वेळा या विषयातील संबंधित अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्या बरोबर एकत्रित या पुलाचा पाहणी दौरा आ. केळकर यांनी केला होता तसेच बैठकाही केल्या होत्या. या पुलाच्या बॉटल नेक मुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, प्रवासी त्रस्त होते. हि वाहतूक कोंडी होऊ नये या करिता आ. केळकर हे पुलाच्या रुंदीकरणाकरिता पाठपुरावा करीत होते.

या पुलाच्या रुंदीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार असून लाखो प्रवाश्याना यामुळे दिलासा मिळणार आहे, फायदा होणार आहे.

आमदार श्री संजय केळकर यांचे व मा. मुख्यमंत्री यांना आम्ही ठाणेकर मनापासून धन्यवाद देतो.

गम्मत म्हणजे अनेक राजकीय पक्षाचे नेते मोठ्ठे मोठ् फलक ( HOARDINGS ) ठाण्यात जागो जागी लावून या सगळ्याचे श्रेय स्वतःकडे घेतील , पण या मागे आमदार श्री. संजय केळकर यांचे अथक प्रयत्न आहेत हे सगळ्यांना कळावं म्हणून या सोबत काही कागदपत्रे , छायाचित्रे जोडत आहे.






Wednesday, October 5, 2016

भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचे आव्हान


नमस्कार ,

" भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टोचे आव्हान "

हे आत्ता परळच्या परळच्या बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ऍनिमल म्हणजेच परळच्या बैल घोडा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी कुत्र्यांपासून , खास करून भटक्या कुत्र्यांपासून लेप्टोचा प्रसार होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

गुरुवार, 6 ओक्टोम्बर , 2016 च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .

गेले अनेक महिने हिच गोष्ट मी , डोंबिवली चे डॉक्टर आनंद हर्डीकर , जगाला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय , पण नेहमीप्रमाणे 99.99% भारतीयांची " माझ्या बापाचे काय जाते ? " / " WHAT GOES MY FATHER’S " हि प्रवृत्ती आड येते .

त्याच प्रमाणे राजकारण्यांची त्यांच्या गळ्यापर्यंत जो पर्यंत येत नाही , अथवा त्यांच्या मतांवर काही फरक होत नाही ( VOTE BANK ) तो पर्यंत शांतपणे बसणें , हि प्रवृत्ती आड येते .

आपण कृपया हा लेख नीट वाचा , लेप्टो चा संसर्ग झालेल्या प्राण्याचे मल-मूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते . अश्या पाण्यातून चालत जाणाऱ्या व्यक्तींच्या पायाला अथवा पायाच्या नखाला जखम असेल तर जखमेतून लेप्टोचे विषाणू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात .

आपल्याला हे वाचून धक्का बसेल कि फक्त डोंबिवली या शहरात दररोज अंदाजे 2.5 टन ( अडीच टन ) एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा पसरलेली असते . भटक्या कुत्र्यांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे , त्यामुळे हा प्रश्न अक्षरशः हाताबाहेर चालला आहे.

तेंव्हा झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीयांनो उठा , जागे व्हा .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !