नमस्कार ,
हि काही वर्तमान पत्रातील कात्रणे पहा .
केरळ या राज्यात गेल्या ६ महिन्यात ७०,००० नागरिकांना श्वान दंश झाला म्हणून त्यांनी सर्व पक्षीय बैठक तातडीने बोलावली आहे.
पण आपल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात तालुका , ग्राम पंचायत , पालिका , नगरपालिका , महानगर पालिका त्याचप्रमाणे राज्य शासन या सगळ्या पातळीवर या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निष्क्रियता आठळून येते.
भटक्या कुत्र्यांच्या हाताबाहेर जात असलेल्या जन्म दराबद्दल त्याच बरोबर भटक्या कुत्र्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना होत असलेल्या अनेक प्रकारच्या त्रासांबद्दल मी गेली काही वर्षे महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य मंत्र्यानसमोर अनेक वेळा ई मेल द्वारे गाऱ्हाणे मांडले होते. आज सुद्धा मी देवेंद्र जी फडणवीस यांना एक ई मेल पाठविला आहे.
या सोबत नवा काळ व लोकसत्ता या दैनिकात १२ जुलै, २०१५ आलेली व अंगाचा थरकाप उडविणारी बातमी जोडली आहे. " चाळीसगाव या महाराष्ट्र राज्यातील एका तालुक्यात पिसाळ लेल्या कुत्र्याने १९ निरपराध नागरिकांचे लचके तोडले ." यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. यावर कडी म्हणजे तेथील रुग्णालयात रेबीस ची लस शिल्लक नसल्याने जखमींची लस विकत घेण्यासाठी धावपळ करावी लागली.
" ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत रोज अंदाजे ३० नागरिकांना श्वान दंश होतो . याचाच अर्थ फक्त " ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत दर वर्षी अंदाजे ११,००० नागरिकांना श्वान दंश होतो. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने डोंबिवली , अंबरनाथ , टिटवाळा , उल्हासनगर, पनवेल , मुंबई , नवी मुंबई , औरंगाबाद, पुणे , सोलापूर , कोल्हापूर, कल्याण , अ अश्या इतर अनेक गावां मध्ये आहे . २०१२ - २०१३ मध्ये नागपूर मध्ये २०,००० नागरिकांना श्वानदंश झाला . वर्धा येथे १०,००० नागरिकांना श्वानदंश झाला , मुंबई येथे ८०,००० नागरिकांना श्वानदंश झाला.
आपले दुर्दैव म्हणजे आपल्या नगरसेवकांना , आमदारांना , खासदारांना या प्रश्नावर लढणे हे महत्वाचे वाटत नाही. त्याच प्रमाणे नागरिकांनाही या प्रश्नावर आवाज उठवणे हे गरजेच वाटत नाही.
माझ्या प्रमाणे डोंबिवली येथील Dr आनंद हर्डीकर , बांद्रा येथील ललित जी केंकरे - वय ८३ वर्षे ( कैलासवासी दामू केंकरे यांच्या पत्नी ) , ठाणे येथील निलेश आंबेकर, ठाणे येथील चन्द्रहांस तावडे हे असे काही मोजकेच नागरिक या प्रश्नवर सदैव लढत आहेत.
माझ्या प्रमाणे डोंबिवली येथील Dr आनंद हर्डीकर , बांद्रा येथील ललित जी केंकरे - वय ८३ वर्षे ( कैलासवासी दामू केंकरे यांच्या पत्नी ) , ठाणे येथील निलेश आंबेकर, ठाणे येथील चन्द्रहांस तावडे हे असे काही मोजकेच नागरिक या प्रश्नवर सदैव लढत आहेत.
माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे हि आपल्या पैकी कोणाला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तींना श्वान दंश होई पर्यंत थांबू नका . आपण हि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याना ई मेल टाका.
त्यांचा ई मेल नाही हे कारण देऊ नकात. मला satyajitshah64@gmail.com या ई मेल वर संपर्क करा मी आपणाला सगळी माहिती देऊ शकतो.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment