नमस्कार ,
कृपया दोन मिनिटे शांत पणे
उभे राहून भ्रूण हत्या झालेल्या या तत्वद्यान विद्यापीठ जवळील " पादचारी पुलाला " श्रद्धांजली वाहून
आम्हा ठाणेकर नागरिकांच्या दुखः आत सह्बागी व्हा.
मी "ठाणे वैभव
" या ठाणे येथून प्रसिध्द होणाऱ्या दैनिकाने हि बातमी रविवार , १९ जुलै , २०१५
च्या अंकात छापून आणून सगळ्या वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.
आपण हे वाचा म्हणजे आणि
हि हत्या समजून घ्या.
पुरावा म्हणून मी छायाचित्रे
सुद्धा जोडत आहे.
“एका
पादचारी पुलाची भ्रूण हत्या”
आजतागायत
आपण मानवी भ्रूण हत्येच्या घटनांन बद्दल ऐकले होते . म्हणजेच मानवी जीव
जन्माला यायच्या आतंच मातेच्या उदरात मारून टाकलेले ऐकले , वाचले असेल. पण निर्जीव
" वस्तूची " माफ करा " वास्तूची " भ्रूण हत्या झालेली
कधी ऐकली आहे ? काय म्हणता हे शक्य नाही ? अहो भारत नामक देशात अशक्य असे काय आहे
? मी काही विनोद करीत नाही , हे जरा वाचा .
घोडबंदर
रोड , हा ठाणे पश्चिम ( महाराष्ट्र , भारत ) येथील एक महत्वाचा महामार्ग ( HIGHWAY
) आहे. हा महामार्ग ठाणे , कळवा, नवी मुंबई , भिवंडी , मुंबई येथून बोरीवली
, वसई , डहाणू , पालघर , त्याचप्रमाणे गुजरात येथे जाण्यासाठी फार सोयीचा आहे.
हा एक महामार्ग असल्यामुळे ४ X ४ अश्या मार्गिका ( LANE ) वाहनांसाठी आहेत. या महामार्गावरून
दुचाकी पासून अजस्त्र असे TRAILER अश्या सगळ्या प्रकारच्या वाहनांची सतत ये जा असते.
या महामार्गाच्या दुतर्फा अनेक व्यावसायिक इमारती , MALL , दुकाने , शैक्षणिक संस्था
, रहिवासी संकुले उभी राहिली आहेत. आनंदनगर चेक पोस्ट ते अगदी कासार वडवली ,
ओवळा च्याही पार पुढे पर्यंत म्हणजे अंदाजे १८ ते २२ किलोमीटर च्या या महामर्गावर पादचाऱ्यांना
हा महामार्ग ओलांडण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ एक व लुईसवाडी येथे एक असे २
पादचारी पूल ( F O B ) सध्या आहेत . आणि नितीन जंक्शन येथे एक भुयारी मार्ग आहे.
पण बाकी ठिकाणी हा महामार्ग ओलांडणे म्हणजे पादचाऱ्यां साठी जीव धोक्यात घालून
केलेली रोजची कसरत असते. पादचारी पूल नसल्यामुळे आजतागायत अनेक नागरिकांना त्यांचा
जीव गमवावा लागला . त्याचप्रमाणे अनेक नागरिक अपघातग्रस्त होवून जखमी झाले आहेत.
आता
थोडीशी आकडेवारी देतो.
२०१०
/ २०११ साली ठाणे येथील प्रशासनाने / MSRDC यांनी १० पादचारी पूल घोडबंदर रोड
येथे उभारण्याचे जाहीर केले .
२०१२
, जानेवारी नंतर काम चालू होणार होते.
त्यानंतर
काहीच झाले नाही.
२२
नोव्हेंबर , २०१० पासून मी घोडबंदर रोड येथे पादचारी पूल हवे आहेत या साठी TMC चे कमिशनर
यांच्याकडे पाठ पुरावा केला होता. अनेकवेळा पाठपुरावा करून काहीही नाही हलले
म्हणून मी ४५० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ऑक्टोंबर , २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात
TMC चे श्री. K D LALA - CHIEF ENGINEER ( तत्कालीन ) यांना दिले. त्यावेळेस त्यांनी
असे आश्वासन दिले कि ६ पाठ्चारी पुलांसाठी मान्यता मिळाली आहे. त्यातील ४ साठी
tender मागविले आहेत व आनंद नगर आणि ज्युपिटर रुग्णालय येथील WORK ORDER दिली आहे
. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी अगोदर घाई घाई मध्ये काही
पादचारी पुलांचे भूमिपूजन , ठाणे येथील अनेक प्रतिष्ठित माननीय, आदरणीय, वंदनीय , पूजनीय
अश्या राजकीय व्यक्ती , नेते यांच्या शुभ हस्ते वाजत गाजत पार पडले . सगळ्या
प्रकारच्या प्रसार माध्यमांद्वारे भूमिपूजनाची बातमी पसरली. आज त्या भूमिपूजनाच्या
घटनेला काही महिने झाले आहेत . निवडणुका झाल्या आहेत. राजकारणी व्यक्ती , नेते कधीच
चालत रस्ता ओलांडत नाहीत . ते तरं परदेशी बनावटीच्या अद्ययावत अश्या गाड्यांमध्ये फिरतात.
त्यामुळे सध्या सगळीकडे या विषयावर साम सम दिसून येते आहे.
मी
याद्वारे काही छायाचित्रे जोडत आहे. दोन छायाचित्रात ( Before 1 & Bofore
2 ) जी १० ते १२ दिवसांपूर्वी घेतली होती, त्यात तत्वद्यान विद्यापीठा जवळील पादचारी
पुलासाठी जे भूमिपूजन केले होते ते स्पष्ट दिसत आहे . आता दुसरी
दोन छायाचित्रे ( Now 1 & Now 2 ) निरखून पहा , त्या भूमिपूजन केलेल्या
जागेवर नुकतेच सिमेंट टाकून ती जागा पूर्ववत केली गेली आहे.
यावरून
या तत्वाद्यान विद्यापीठ जवळील जन्माला येणाऱ्या पादचारी पुलाची भ्रूण हत्या झाली अशी
दाट शंका येते. बाकी पादचारी पुलाबद्दल मला काही माहित नाही.
आता
बहुतेक पुढील निवडणुकीपर्यंत वाट पहावी लागेल असे वाटते. पण त्यावेळी देखील परत त्याच
ठिकाणी भूमिपूजन होईल व काही महिन्यांनी ती जागा सिमेंट लावून पुर्वव्रत केली जाईल.
आणि अजून एक भ्रूण हत्या होईल .
म्हणा
मेरा भारत महा.......................न.
Stand up for what is right , Even
if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People
Sit Quiet
No comments:
Post a Comment