Monday, July 13, 2015

News in PUDHARI - STRAY DOG MENACE

नमस्कार , आणि सुंदर सकाळ ,

आज , म्हणजे १४ जुलै, २०१५ च्या " पुढारी " या वर्तमान पत्राने हि बातमी दिली आहे.

मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते कि या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर बहुतेक वर्तमान पत्रांनी अनेक वेळा लिहिले आहे  व वृत्त वाहिन्यांनी ( NEWS CHANNELS ) देखील या प्रश्नावर कार्यक्रम केले आहेत , व चर्चा देखील घडवून आणली आहे.

मला अनेक पत्रकार मित्रांनी , त्याच बरोबर वृत्त वाहिन्याच्या निवेदक , निवेदिका यांनी सांगितलं आहे कि त्यांना तर हा भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक वेळा होतो. रात्री अपरात्री घरी जाताना कुत्रे मागे लागतात, दुचाकी वरून प्रवास करतांना  देखील भटके कुत्रे मागे लागतात . हाच भयानक अनुभव अनेक पोलिसांना देखील आला आहे.

माझ्या कडे या प्रश्नावर एवढी माहिती आहे कि मला खरच PhD  मिळू शकेल . ( सध्या काही प्रतिष्ठित व्यक्ती मिळवितात तशी नाही ) . त्यात्तील थोडीशी  माहिती सांगतो ज्याने तुमची झोप उडवेल. " प्रत्येक  कुत्री एका वेळेला १२ पिल्लांना जन्म देते. त्यातील निम्मी जगतात.  कुत्री हि दरवर्षी पिल्लांना जन्म देवू शकते. " . विचार करा किती भयानक वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या तुमच्या आमच्या , प्रत्येकाच्या गावात , शहरात, राज्यात , देशात वाढत आहे.

तुम्हा सर्व सुजाण नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे कि , चला उठा, जागे व्हा , " जागरूक नागरिक " बना . या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवा . तुम्हाला , अथवा तुमच्या प्रियजनांना भटका कुत्रा चावण्याची वाट बघू नका .

आपण मानव प्राणी विसरून गेलो आहोत कि आपल्याला देखील सुखा समाधानाने जगण्याचा या देशात हक्क आहे .

चला या भटक्या कुत्र्यांचा दहशती खाली न जगता , या प्रश्नावर मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य यांना एक ई मेल पाठवा. काही माहिती हवी असेल तर मला  satyajitshah64@gmail.com   या ई मेल वर संपर्क साधा.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





No comments:

Post a Comment