नमस्कार,
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ९९.९९ % भारतीय शांत बसले आहेत. श्वान दंश जणू देवाचा प्रसाद म्हणून आनंदाने सहन करीत आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या रात्री अपरात्रीच्या भुंकण्याचा या ९९.९९ % सहनशील भारतीयांना त्रास होत नाही उलट त्यांना हे भुंकणे म्हणजे अंगाई गीत आहे असेच वाटते. . दुचाकीची आसने कुत्र्यांनी फाडलेली त्यांना चालतात. दुचाकीच्या मागे कुत्रे धावून त्याने अपघात होतात हे त्यांना चालते . लहान मुलांना कुत्रे चावतात हे चालते. सगळीकडे कुत्रे नैसर्गिक विधी करून घाण करतात हे त्यांना चालते. गेल्या वर्षी पुणे येथील १२ मानव प्राणी श्वान दंश झाल्यामुळे रेबीस ने जग सोडून गेले हे सहन करतात.
कशी गम्मत आहे ना , उंदीर नावाचा प्राणी मारण्यासाठी नगरपालिका, महानगर पालिका नागरिकांना पैसे देते , पण भटक्या कुत्र्याला साधे हाड जरी म्हटलं तरी या SO CALLED प्राणी मित्रांच्या तक्रारीवर मानव प्राण्याला कोठडीत टाकते.
जरा हि बातमी वाचा. भारतीय नागरिकांनो आता तरी सोंग घेतलेल्या झोपेतून जागे व्हा .
FB वर स्वतःचे PROFILE PICTURE बदलणे जरा कमी करा . भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या अनिर्बंध वाढीवर आवाज उठवा. या भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासावर आवाज उठवा .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment