नमस्कार ,
आपल्यापैकी काही जणांना माहित असेल कि मी गेली ३ वर्षे , ठाणे येथील पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण ( HELMET ) घालावे यासाठी अनेक पातळीवर लढत आहे. त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे , गेल्या काही महिन्यांमध्ये अंदाजे २०० पोलिसांना दुचाकीवर शिरस्त्राण नाही घातले म्हणून दंड झाला आहे.
आता, हि TIMES OF INDIA , २१.०७.२०१५ च्या अंकात आलेली हि बातमी पहा. हीच बातमी मी २० जुलै, २०१५ ला संध्याकाळी वृत्तवाहिनीवर ( NEWS CHANNEL ) पाहिली होती. बातमी पाहिल्या पाहिल्या मी मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर ( MOBILE ) संपर्क साधला व त्यांना माझ्या या लढाई बद्दल सांगितलं. त्यांना असेही सांगितलं कि या पुढे मी पोलिस व राजकारणी यांनी आसन पट्टा ( SEAT BELT ) लावावा या साठी देखील लढाई चालू करणार आहे . मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांनी पोलिस व राजकारणी यांनी वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत या माझ्या मागणीला सहमती दर्शविली. त्यांनी मला एवढेही सांगितले कि त्यांच्या ४ चाकी वाहनाला काळ्या काचा नाही आहेत.
मी देखील तुम्हा सारखाच एक सामान्य माणूस आहे. जगण्यासाठी व्यवसाय करतो. फरक एवढाच आहे कि मी फक्त प्रतिक्रिया न देता क्रिया करण्यावर भर देतो.
विचार करा जर एखाद्या माणसाच्या प्रयत्नाने समाजात थोडा फार बदल होतो तर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी तर समाजात फार मोठ्ठा बदल होऊ शकेल.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment