Sunday, April 26, 2015

आवारा कुत्तोंके काट ने पर दो लाख का मुआवजा - दैनिक भास्कर - Dainik Bhaskar - Nagpur

नमस्कार व सुंदर सकाळ,

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्रातील नागपूर आवृत्तीच्या सोमवार २७ एप्रिल, २०१५ च्या अंकात पान नो. २ वर आलेली हि बातमी. नागरिकांचा काहीही दोष नसताना त्यांना श्वानदंश झाल्यावर खर्च, यातना , दवाखान्यातील हेलपाटे सोसावे लागतात.

दैनिक भास्कर चे मी हा प्रश्न वाचकांसमोर आणल्या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet             

भटका कुत्रा चावल्यावर नुकसान भरपाई द्या.

नमस्कार मंडळी ,

भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीवर मी व आमचे काही समविचारी मित्र निलेश आंबेकर , DR .  आनद हर्डीकर , ललित जी केंकरे ( वय वर्षे ८४ ) , सागर , DR . उदय कुलकर्णी असे काही  जण लढत आहोत.

त्याच संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन ई मेल ने पाठविले होते. त्याची नोंद घेवून "पुढारी" ने घेवून २६ एप्रिल, २०१५ च्या अंकात हि बातमी दिली आहे. अनेक वर्तमान पत्रे आमच्या या लढाई मध्ये आम्हाला साथ देत आहेत. पुढारी चे संपादक श्री. विवेक गिरधारी यांचे मन पासून मी आभार मानतो.

जो पर्यंत " नागरिक " नावाची व्यकी " जागरूक नागरिक " होणार नाही तो पर्यंत भारत या देशामधील अनेक प्रश्न रेंगाळतच राहणार.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Friday, April 24, 2015

फेसबुकवरील व्यक्ती आणि प्रवृत्ती

नमस्कार ,
माझा “ फेसबुकवरील व्यक्ती आणि प्रवृत्ती “ हा लेख "लोकप्रभा" या साप्ताहिकाच्या १ मे, २०१५ च्या अंकात ( जो आज प्रकाशित झाला आहे व वर्तमान पत्राच्या ठेल्यावर आजपासून मिळेल ) छापून आला आहे.
गेली अनेक वर्षे FACEBOOK ( F B ) वरील अनेक व्यक्तींच्या POST पहात होतो. त्यावरून काही व्यक्तीच्या प्रवृत्ती लक्षात आल्या. त्या या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मध्ये अतिशयोक्ती नाही.

आपण अनेक जण माझ्या या मताशी सहमत असाल कि FACEBOOK ( F B ) चा योग्य प्रकारे वापर भारतात तरी होत नाही. जर योग्य प्रकारे हे मध्यम वापरले गेले तर हे एक समाज प्रबोधनाचे अतिशय प्रभावी असे मध्यम होवू शकते. अनेक जण स्वतःच PROFILE PICTURE वारंवार बदलतात , पण या आपल्या देशाच PROFILE PICTURE मात्र बदलण्याची अश्यांना गरज वाटत नाही.

हा लेख वाचकांपर्यंत नेला म्हणून मी लोकप्रभा चे मनःपूर्वक आभार मानतो.
Blogspot : http://fightofacommonman.blogspot.in/

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

फेसबुकवरील व्यक्ती आणि प्रवृत्ती
सत्यजित अ. शाह - response.lokprabha@expressindia.com
Published: Friday, May 1, 2015
फेसबुक हे तरुणाईचंच नव्हे तर सगळ्याच वयोगटांचं आवडतं माध्यम. पण या आवडीचा अतिरेक झाला की विसंगती तयार होते आणि कधी कधी ती आपल्या लक्षातही येत नाही. फेसबुकवरील या विसंगतींवर मार्मिक टिप्पणी..
फेसबुक हे सोशल नेटवर्किंगचे एक आगळेवेगळे साधन आजच्या पिढीला मिळाले आहे. गेले काही महिने मी फेसबुकवर जे जे काही पाहिले, अनुभवले ते सगळे गमतीदार प्रसंग आपल्यासमोर सादर करीत आहे.
आज जर पु. ल. देशपांडे असते तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर एवढं मार्मिक लिहिलं असतं की त्यांच्या अजरामर पुस्तकांच्या यादीत अजून एका अफाट विनोदी पुस्तकाची भर पडली असती.
असो, फेसबुकवर अनेक प्रकारच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती (व्यक्ती आणि वल्ली) पाहिल्या.
टाइमकीपर प्रवृत्ती : सध्या बऱ्याच घरांमध्ये पहाटे पहाटे हालचाल दिसते. दिवे लागलेले दिसतात. परीक्षेचे दिवस नाहीत तरीही पहाटे ही हालचाल दिसते. आपल्याला वाटले असेल की व्यायाम सुरू असेल, पण तसे काहीच नाही.
दिवसाची सुरुवात सकाळने होते. पहिल्या प्रकारच्या फेसबुकवरील प्रवृत्ती (टाइमकीपर प्रवृत्ती) अगदी पहाटे, पहाटे फेसबुकवर गुड मॉर्निग लिहिण्यासाठी धडपडत असतात. त्यानंतर मग गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि मग गुड नाइट हे सगळं पोस्ट करीत असतात.. बरं, नुसतं स्वत: पोस्ट करीत असतात. पण अनेकांना ते टॅगही करीत असतात. त्यांना यात असा कोणता आनंद मिळत असतो हे मला कधीच कळले नाही. अशा व्यक्ती टाइमकीपरचे काम अगदी न चुकता, काटेकोरपणे करीत असतात. मला यात त्यांनी काय सोशल नेटवर्किंग केले हेच कळत नाही.
या प्रवृत्तीच्या व्यक्ती हे का विसरतात की, आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल असतो व त्यात घडय़ाळ असते, त्यामुळे सगळ्यांनाच सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधी होते हे कळते. नशीब, अशा व्यक्ती फेसबुकवर गुडनाइट म्हटल्यावर सकाळपर्यंत 'जागते रहो' असे पोस्ट टाकत नाहीत.
यातील हद्द तर पुढेच आहे. अशा टाइमकीपिंगच्या पोस्टला अनेक लाइक्स मिळालेले असतात व अशा टाइमकीपरचे काही फेसबुक मित्र तर स्वत:ही त्या गुड मॉनिंग-गुड नाइटवर कॉमेंटही करीत असतात.
या अशा वायफळ गोष्टींसाठी अशा प्रवृत्तींच्या व्यक्तींना कसा काय वेळ मिळतो, हे मला पडलेले कोडे अजूनही सुटले नाही.
लाइक प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती अक्षरश: प्रत्येक पोस्टला लाइक करीत असतात. जरा समजावून सांगतो. याअगोदर सांगितल्याप्रमाणे जेव्हा टाइमकीपर प्रवृत्तीच्या व्यक्ती गुड मॉर्निग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग पोस्ट करतात त्यालाही 'लाइक' प्रवृत्तीच्या व्यक्ती लाइक करतात. गुड मॉर्निगला गुड मॉर्निग म्हणणे आपण समजू शकतो, पण गुड मॉर्निगला लाइक करणे हे कुणाच्याही आकलनापलीकडचे असते.
एखाद्याचा 'पास झालो', 'मुलगा झाला', 'मुलगी झाली', 'नवी गाडी घेतली', वगैरे पोस्टना लाइक करणे आपण समजू शकतो, पण मी या 'लाइक' प्रवृत्तीच्या व्यक्तींना, एखाद्याने त्यांच्या आईचे देहावसान झाले वा वडिलांचे देहावसान झाले अशा पोस्टलासुद्धा लाइक केलेले पाहिले आहे.
बरे असे लाइकही एखाद्याने चुकून केले असेल असे सुरुवातीला वाटले, पण ५० ते ६० लाइक अशा दु:खी घटनेच्या पोस्टला दिलेल्या मी अनेक वेळा बघितल्या आहेत.
रनिंग कॉमेंट्री प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती फारच विचित्र असतात. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतात हे अक्षरश: सगळेच फेसबुकवर पोस्ट करतात. आता या प्रवृत्तीच्या काही व्यक्तींनी फेसबुकवर टाकलेल्या या काही पोस्ट.
अशीच एक प्रवृत्ती, गणपती आणायला घरातून निघाली. त्या वेळी त्याने अनेक फोटो टाकले ते असे होते- घरातून निघताना, स्कूटरला किक मारताना, ट्रॅफिक सिग्नलला अडकला म्हणून तेथील एक फोटो, गणपतीची मूर्ती घेताना, मूर्ती स्कूटरवर घेऊन बसताना, घराजवळ आल्यावर, घरी शिरताना, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना. गंमत म्हणजे प्रत्येक फोटोत ती व्यक्ती कॅमेऱ्याकडेच पाहत होती. म्हणजे अशा व्यक्तीबरोबर सदा एक फोटो काढणारा हवाच.
अजून एक अशीच या प्रवृत्तीची व्यक्ती जी लिहिते- आज मुंबईहून पुण्याला निघालो किंवा अंबेजोगाईहून जालन्याला निघालो, स्थळ काहीही असो, त्याने पोस्टवर टाकलेले फोटो काय तर घरातून निघताना, गाडीत बसल्यावर सीटबेल्ट लावताना, वाहनचालक बाळू गाडी चालू करताना, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (थांबण्यास बंदी असतानादेखील) मुद्दाम थांबून काढलेला फोटो, वाटेत एके ठिकाणी नाश्ता व चहा घेताना, त्याच फोटोत पाठीमागे एक टॉयलेट दिसत होते, मला लगेच भीती वाटली की आता पुढच्या फोटोत काय पाहायला मिळणार. माझ्या नशिबाने पुढचा फोटो गाडीत इंधन भरतानाचा होता.
याच प्रवृत्तीची एक व्यक्ती मुंबईहून दुबईला फिरायला गेली. त्या व्यक्तीने प्रवासाची रनिंग कॉमेंट्री घरापासून सामानाची बांधाबांधी करतानापासून केली. त्यानंतर टॅक्सीमध्ये बसताना, बोर्डिग पास घेताना, विमानाची वाट बघत असताना, विमानात गेल्यावर, विमानात जेवताना, दुबईला उतरल्यावर सामान घेताना, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर. त्या पुढच्या दिवसापासून त्याचे फोटो याप्रमाणे होते, आज अबुधाबीला या हॉटेलमध्ये, रस्त्यावर, बाहेर जेवताना, परत दुसऱ्या दिवशी शारजा येथे या हॉटेलमध्ये व असेच काही त्या प्रकारचे फोटो. आणि शेवटी एकदाचे मुंबईला उतरल्यावर सामान घेताना. पण या सगळ्या सहलीमध्ये तेथील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो नव्हते. जे टाकले त्या प्रत्येक फोटोमध्ये ती व्यक्ती अगदी आवर्जून व अगदी प्रामुख्याने व ठळकपणे दिसत होती.
प्रोफाइल फोटो प्रवृत्ती : ही एक जरा विचित्र प्रवृत्ती पाहायला मिळते. या प्रवृत्तीच्या व्यक्ती फारच अ‍ॅक्टिव्ह असतात, पण कोणत्या बाबतीत या व्यक्ती अ‍ॅक्टिव्ह असतात हे आपणाला कळलं तर आपणालाही आश्चर्याचा एक धक्का बसेल. अशा व्यक्ती त्यांचे प्रोफाइल फोटो वारंवार बदलत असतात. अशा प्रवृत्ती पुल्लिंगी जास्त असतात का स्त्रीलिंगी जास्त असतात, याचा अभ्यास केल्यावरच कळेल. हे सगळं (प्रोफाइल फोटो वारंवार बदलणे) यासाठी अशा व्यक्तींना कोठून वेळ मिळतो, हे करून करून यांना थकवा कसा काय येत नाही, एवढे वेगवेगळे फोटो काढायला यांना कोण भेटतात, असे अनेक प्रश्न पडतात, पण अजूनही त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत.
आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा अशा व्यक्ती प्रोफाइल फोटो बदलण्याचे सत्कार्य करतात, तेव्हा त्यांच्या या पोस्टलाला भरपूर लाइक मिळतात व अनेक कॉमेंट्सही येतात. म्हणजे एवढय़ा सगळ्यांना (लाइक देणाऱ्यांना व कॉमेंट्स करणाऱ्यांना) मोकळा वेळ आहे.
प्रतिक्रिया देणे प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती सदान्कदा दुसऱ्यांच्या पोस्टवर फक्त विचित्र प्रतिक्रियाच देत असतात. अशा प्रतिक्रिया देताना त्या पोस्टशी त्यांचा संबंध आहे की नाही, याचाही त्या व्यक्ती विचार करीत नाहीत.
खादाड प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सदान्कदा खाण्याच्या पदार्थाचे फोटो किंवा स्वत: खात असतानाचे फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्थासंदर्भातील फोटो एफबीवर टाकण्यात/ शेअर करण्यात फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच काय दाखवतील, तर कधी भजी, बटर पाव भाजी, जिलेबी, मिसळ वगैरेचे फोटो टाकून त्याबरोबर, असे काही तरी लिहितात या खायला वाट पाहतो, येता का खायला, कोण कोण येणार हे सगळं खायला?
अशाच प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झालं. त्याने लग्नातले भरपूर फोटो एफबीवर टाकले. त्यात लग्नातील विधींचे, जेवणाचे, एकमेकांना भरविताना वगैरे असे अनेक फोटो होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गंमत तर पुढे आहे. त्याने एका हॉटेलमध्ये शिरतानाचा फोटो टाकला होता व लिहिले होते की मधुचंद्राला आलो आहे. काय म्हणायचं यांना?
'स्व'प्रवृत्ती : ही एक गमतीदार प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या व्यक्ती सदान्कदा स्वत:चे फोटो एफबीवर पोस्ट करीत असतात. बरं स्वत:चे फोटो असतात, पण प्रत्येक फोटोमध्ये ते फक्त आणि फक्त कॅमेऱ्याकडेच पाहत असतात.
अशा व्यक्ती कोठेही गेल्या (ट्रेकिंगला गेल्या, परदेशी गेल्या, सहलीला गेल्या) तरीही तेथील फोटो टाकतानासुद्धा प्रत्येक फोटोत स्वत: असतील याची खबरदारी घेतात. जरा काही उदाहरणे देतो- अशी एक व्यक्ती आग्रा येथे ताजमहाल पाहायला गेली होती व ताजमहालचा फोटो पोस्ट केला गेला, पण गंमत म्हणजे ताजमहालसमोर ती व्यक्ती स्वत: उभी होती म्हणजे ती व्यक्ती व्यवस्थित दिसत होती, पण ताजमहाल पुसट दिसत होता. अशा या प्रवृत्तीच्या व्यक्तींना एफबीवरच्या मित्रांना ताजमहाल दाखवायचा असतो का स्वत:लाच दाखवायचे असते? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती, ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी गेल्या व त्यांना वाघ दिसला तर खाली उतरण्यास बंदी असूनदेखील या व्यक्ती खाली उतरतील व एखाद्याला असा फोटो काढायला सांगतील की ज्यात वाघ दिसेल न दिसेल, पण ते स्वत: ठळकपणे दिसतील.
या प्रवृत्तीच्या काही व्यक्ती स्वत:चे वेगवेगळ्या कपडय़ांतील फोटो किंवा वेगवेगळ्या प्रकारे उभे राहून, बसून, विचार करतानाचे (कृत्रिम) वगैरे काढलेले फोटो सारखे पोस्ट करीत असतात.
सेलिब्रिटीच्या सोबत फोटो काढणे प्रवृत्ती : ही एक जरा आगळीवेगळी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुप्रसिद्ध व्यक्तींबरोबर फोटो काढायची व ते फोटो एफबीवर पोस्ट करायची भारी हौस असते. जेथे त्यांना सेलिब्रिटी दिसतील तेथे ते पटकन जातात व त्यांच्याबरोबर स्वत:चा फोटो काढून घेतात. या प्रवृत्तीच्या काही व्यक्ती तर बहुतेक जेथे सेलिब्रिटी भेटू शकतील अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी हमखास जात असतील.
अशाच प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्याचा अनिल कपूरबरोबरचा एक फोटो एफबीवर टाकला होता. गंमत म्हणजे त्याने त्या पोस्टवर असे लिहिले होते की माझ्याबरोबर अनिल कपूर. म्हणजे जणू काही अनिल कपूर या व्यक्तीबरोबर फोटो काढायला कधी मिळतो हे जणू अनेक वर्षे वाट पाहत होता.
मला या सगळ्यात सेलिब्रिटीचे कौतुक वाटते, ते अशा वेळेला कसे काय शांत राहत असतील व फोटोमध्ये कसे काय खोटे खोटे हसत असतील?
या प्रवृत्तीची एक व्यक्ती तर काय करते सेलिब्रिटी दिसली की ती व्यक्ती त्या सेलिब्रिटीच्या थोडी जवळ जाते व सेल्फी काढते व लगेचच एफबीवर टाकते. आहे की नाही ही अगदी जगावेगळी प्रवृत्ती.
टॅग प्रवृत्ती : ही एक प्रवृत्तीसुद्धा जराशी जगावेगळीच आहे, अगदी रोजच्या रोज अशा व्यक्ती एफबीवरच्या बाकी मित्रांना काही तरी सतत टॅग करीत असतात. एखाद्या वेळेला अगदीच जगावेगळी घटना किंवा प्रसंग वगैरे टॅग केले तर समजू शकतो, पण रोजच्या रोज हे टॅग झेलणं म्हणजे ज्यांना टॅग केले जाते त्यांना हे अवघड जागेचे दुखणे वाटते. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना आपण 'टगे' असेही संबोधू शकतो.
उंटावरून शेळ्या राखणे प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्ती रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीच्या समस्या, अनधिकृत बांधकामे वगैरे समस्या अथवा फोटो पोस्ट करीत असतात, पण त्याचबरोबर असे लिहीत असतात 'अरे कोणी तरी याकडे लक्ष द्या, कोणी तरी हे थांबवा, कोणी तरी हे सुधरवा, कोणी तरी शासनाला हे दाखवा'. म्हणजे हे स्वत: मूग गिळून गप्प बसणार व दुसऱ्या कोणी तरी यावर आवाज उठवावा ही त्यांची अपेक्षा असते. यालाच म्हणतात 'उंटावरून शेळ्या राखणे' प्रवृत्ती.
चोर प्रवृत्ती : आत्तापर्यंत आपल्याला पैशांची चोरी, टॅक्सची चोरी, ऑक्ट्रॉयची चोरी, वस्तूंची चोरी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी अशा गोष्टीची चोरी करणाऱ्या चोरांविषयी माहिती होती. पण या एफबीवर उघड उघड चोरी होते.
बरेच जण एफबीवर त्यांच्या कविता, व्यंगचित्रे असे टाकतात. पण एफबीवरील या 'चोर' प्रवृत्तीच्या व्यक्ती, चक्क कवितेतील काही ओळी, कधी कधी अख्खी कविता, व्यंगचित्रातील व्यक्तिरेखा किंवा कधी कधी तर अख्खे व्यंगचित्रच स्वत:च्या नावाने खपवितात. अशा एका चोराने तर एका व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रातील दोन पात्रे चोरली होती. ती पत्रे जशीच्या तशी त्याने त्याच्या नाटकाच्या जाहिरातीत वापरली. फक्त त्याने त्या पात्रांच्या अंगावरच्या कपडय़ांचा रंग वेगळा बदलला.
तर अशा या फेसबुकवरच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती.
सत्यजित अ. शाह




Friday, April 17, 2015

जंगलातील प्राणी नागरी वस्तीत - एक धोक्याची घंटा

नमस्कार ,

मी तत्वदयान  विद्यापीठाच्या मागे  HYDE PARK , ठाणे पश्चिम   येथे राहतो .  आमचे निवासी संकुल तसे संजय गांधी राष्ट्रीय उद्याना  पासून बऱ्यापैकी दूरच्या अंतरावर आहे .

दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या संध्याकाळी ६ च्या सुमारास एक अघटीत असे घडले , आमच्या संकुला मध्ये एक जंगली  माकड शिरले . ते अगोदर आमच्या संकुलाच्या भिंतीवर बसलेले दिसले . त्यानंतर ते माकड संकुलाच्या आत आले व एका आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा खात बसलेले दिसले. त्यानंतर ते महानगर GAS च्या PIPE ला पकडून वर चढले व पुढे पुढे सरकू लागले.

मी या ई-मेल सोबत त्याची काढलेली काही छायाचित्रे जोडत आहे.

मी अग्निशमन दलाला दूरध्वनी करून याबाबत कळविले पण त्यांनी मला एक प्राणी मित्र श्री. योगेश पन्हाळे यांना कळविण्यास सांगितले.

मी त्याप्रमाणे त्यांना कळविले . त्यांनी मला काही वन अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले.

सध्या ते माकड कोठे आहे याची कल्पना नाही पण ते जवळपासच्या कोणत्यातरी निवासी अथवा व्यावसायिक संकुलात असू शकेल.

श्री. योगेश पन्हाळे यांनी असे सांगितले कि सध्या जी आरे कॉलोनी येथे वना मध्ये जे जंगल तोड सुरु आहे त्याचा हा परिणाम आहे. नुकतेच त्यांनी एक माकड वरळी येथे पकडले.

माझ्या मते हि एक धोक्याची घंटा आहे . मानवाने  राखीव वन क्षेत्रामध्येही बांधकाम करून जी घुसखोरी केली आहे त्यामुळे या वन्य प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे व ते आता मानवी वस्तीत  फिरू लागले आहेत.

सगळ्या बाजूने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात मानवाची घुसखोरी सर्रास सुरु आहे. काही दिवसातच बिबटे व बाकीचे प्राणी ही निवासी संकुलात दिसू लागतील.

या सगळ्या विरुद्ध आमच्या सारख्या सामान्य ( क्षुद्र ) नागरिकांनी कोणापुढे दाद मागायची हे कळेनासे झाले आहे.

ठाण्यातील नागरिक अगोदरच भटक्या कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्ल्यांमुळे त्रस्त झाली आहे , त्यातच या वन्य प्राण्यांनी हल्ले सुरु केले तर परिस्थिती हाता  बाहेर जावू शकते.

आता घराबाहेर  पडणे , रस्त्यावर   फिरणे , मुलांना खेळायला बाहेर सोडणे, वयोवृद्धांचे फिरणे   हे सगळ  भीतीदायक  झाले आहे.

वन्य प्राण्यांच्या मानवांवरील  भविष्यात होवू घातलेल्या हल्ल्यांची हि एक नांदी आहे.






Tuesday, April 7, 2015

भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा / DECLARE STRAY DOGS AS INDIAN NATIONAL ANIMAL

नमस्कार  आणि  सुंदर सकाळ ,

" भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " हा माझा एक लेख " नवा काळ " या दैनिकाच्या ७ एप्रिल, २०१५ च्या अंकात छापून आला आहे तो आपल्या  सर्वांच्या साठी या सोबत जोडत आहे.

हा लेख वाचून अनेक भारतीयांना ज्यात राजकारणी , नेते , शासकीय अधिकारी हि समाविष्ट आहेत अश्यांना सद्बुद्धि येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

हा लेख ज्यांना छापायचा असेल तर मी त्यांना हा लेख UNICODE मध्ये देवू शकतो.  माझा भ्रमण ध्वनी - ०९८२११५०८५८ , माझा ई मेल : satyajitshah64@gmail.com



Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Monday, April 6, 2015

" पुढारी " पहिल्या पानावर बातमी मध्ये माझा नावासकट उल्लेख केला आहे

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

या सोबत " पुढारी " या वर्तमान पत्रातील, ४  एप्रिल, २०१५ च्या अंकात पहिल्या पानावर  छापून आलेली बातमी  जोडत आहे.

मला सांगायला आनंद होत आहे कि या वर्तमान पत्राने देखील " भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या "  बातमी मध्ये  माझा नावासकट उल्लेख केला आहे व माझ्या " झी  २४ तास " वरील " रोख ठोक " या कार्यक्रमातील  विधानाचा उल्लेख केला आहे.

हा ज्वलंत प्रश्न वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी संपादकांचे व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो.  .


भारतीयांनो चला उठा " भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर " आपला आवाज उठवा नाहीतर मानवाचे हाल कुत्र्यांपेक्षा वाईट होतील. .



" सामना " च्या अग्रलेखात माझा उल्लेख

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

या सोबत " सामना " या वर्तमान पत्रातील, ६ एप्रिल, २०१५ च्या अंकात  छापून  आलेला अग्रलेख जोडत आहे.  मला सांगायला आनंद होत आहे कि या वर्तमान पत्राने " भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या "  प्रश्नावर  अग्रलेख लिहिला . या अग्रलेखात संपादकांनी माझा नावासकट उल्लेख केला आहे व माझ्या " झी  २४ तास " वरील " रोख ठोक " या  कार्यक्रमातील  विधानाचे समर्थन केले आहे .

हा ज्वलंत प्रश्न वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी संपादकांचे व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो.


भारतीयांनो चला उठा " भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर " आपला आवाज उठवा नाहीतर मानवाचे हाल कुत्र्यांपेक्षा वाईट होतील. .


Thursday, April 2, 2015

Rokhthok : Bhatkiya Kutrayachi Dehshat 2nd April 2015

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,

आपल्यापैकी काही जण २ एप्रिल, २०१५ ला सादर झालेला “रोख ठोक” हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर आता तो आपण पाहू शकता . त्याचा video या सोबत जोडत आहे.
यात सहभागी झालेल्यांपैकी एक मी आहे.
चल उठा या भयानक समस्येवर आवाज उठवा . जागरूक नागरिक व्हा .

Evil Triumphs When Good People Sit Quiet



Wednesday, April 1, 2015

रोज १० ठाणेकरांना कुत्रे चावतात

सुंदर सकाळ आणि नमस्कार ,

२ एप्रिल, २०१५ च्या "पुढारी" वर्तमान पत्राच्या मुंबई अंकातील बातमी वाचा. सर्वप्रथम मी "पुढारी" चे श्री. विवेक गिरधारी यांचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी सातत्याने या प्रश्नावर आवाज उठविला आहे.
तुम्हा , आम्हा सगळ्यांनी या गंभीर प्रश्नावर आवाज उठविला पाहिजे.

लक्ष्यात ठेवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे एक हि राजकीय व्यक्ती , नेता या प्रश्नावर बोलत नाही. त्यांना पुढची निवडणूक कशी जिंकायची हेच एक उद्दिष्ट असते.

भटके कुत्रे नेत्यांना चावणार नाहीत कारण ते सदा वातानुकुलीत गाडीतूनच फिरतात.

भटक्या कुत्र्यांचा त्रास हा फक्त सामान्य नागरिकांनाच होत असतो , तेव्हा उठा , जागरूक नागरिक व्हा.
भविष्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मानवी लोकसंख्येपेक्षा जास्त होवू शकते.

आता ठाण्याचीच गोष्ट घ्या , आजमितीला ठाण्यात अंदाजे ७०,००० च्या आसपास भटके कुत्रे असू शकतील. जर अश्या धीम्या गतीने ठाणे म न पा ने निर्बीजी करणाकडे दुर्लक्ष्य केले तर २०२१ सालात ठाण्यात अंदाजे २७ लाख भटके कुत्रे असतील.

कुत्र्यांच्या चावा जो असतो त्याच्यात अंदाजे ५५६ PSI एवढा FORCE असतो . PSI म्हणजे (Pound per Square Inch) . व मानवी ( प्रौढ ) चाव्याचा हाच FORCE १५० PSI असतो. यावरूनच आपल्याला काळू शकेल कि श्वान दंश हा किती भयानक असतो.

या बरोबर श्वान दंश झालेल्या एका मुलाच फोटो दिला आहे. हा DR आनंद हर्डीकर ( डोंबिवली ) यांच्या दवाखान्यात आला होता. DR आनंद हर्डीकर सुद्धा या प्रश्नावर लढत आहेत.

लक्षात ठेवा

Evil Triumphs When Good People Sit Quiet

उठा , जागरूक नागरिक व्हा.