Thursday, February 7, 2019

पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड #DhunBadalKeTohDekho

" पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "
नमस्कार , 
मंगळवार , २९.१२.२०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे जिल्ह्यातील वर्तमान पत्रातील पृष्ठ क्रमांक १ व ४ वर आलेली " पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड " बातमी येथे माहितीसाठी देत आहे.
या बातमीसंदर्भात एक छोटेसे विश्लेषण हि पुढे देत आहे.
केल्याने होत आहे रे पण " नागरिकाने " आधी " जागरूक नागरिक " बनलेची पाहिजे
" आपल्या देशात काहीच सुधारणा होणार नाही " , " हे सगळ असच चालत राहणार " , " मी एकटा कसा काय समाजात बदल घडवू शकतो ? " हि व अशी अनेक समानार्थी वाक्ये अथवा अश्या " प्रतिक्रिया " अनेकदा म्हणजे नेहमीच आपल्याला ऐकू येतात . याचे एक कारण देखील आहे आणि ते म्हणजे बहुसंख्य भारतीय नागरिकांना फक्त " प्रतिक्रिया " देण्याची हौस असते. पण स्वतः क्रिया कधीच करायची नसते.
मी माझ्या एका कवितेत म्हटले आहे
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ,
घरात बसून प्रतिक्रिया देणे निरर्थक आहे.
माझा अनुभव मात्र वेगळाच आहे . खालील दोन घटना आपल्यासमोर देत आहे. याचे सगळे पुरावे ( छायाचित्रे , दंड केल्याची पावती , पत्र ) या स्वरुपात माझ्याकडे आहेत.
घटना क्रमांक १ ) : २४.११.२०१५ रोजी मी कार्यालयात जात असताना एक दुचाकीस्वार ज्याच्या वाहन क्रमांक पट्टीवर " पोलिस " असे लिहिले होते ( जो गुन्हा आहे ) , शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले , वाहन क्रमांक छोट्या अक्षरात व मोठ्या आकड्यात लिहिला होता . तो सिग्नलला थांबला होता तेंव्हा त्याला याबद्दल मी शांतपणे सांगितले, पण त्याने दुर्लक्ष केले . पुढचा धक्का म्हणजे तो समोरील सिग्नल हिरवा होण्यास १८ सेकंद बाकी असताना सिग्नल मोडून वेगात निघून गेला . तेंव्हा माझी सटकली. त्याचे छायाचित्र अगोदरच काढले होते.
रात्री घरी आल्यावर हे सगळ DCP TRAFFIC , THANE , व इतर पोलिस अधिकार्यांना ई मेल ने कळविले.
छायाचित्र टिपायला ३० सेकंद लागले. ई मेल पाठविण्यास ५ ते ८ मिनिटे लागली . त्यानंतर मी कधीच या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही.
पण याचा परिणाम पहा. मला २४.१२.२०१५ ला नौपाडा वाहतूक शाखेतून दूरध्वनी आला कि माझी तक्रारीवरून त्या दुचाकीच्या मालकाचा पत्ता शोधून वाहतूक पोलिसांनी त्याला बोलावले . ती दुचाकी दुसराच कोणीतरी चालवीत होता , त्याला देखील बोलावले व त्या गृहस्थाला वर लिहिलेल्या ४ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी रुपये १०० म्हणजे एकूण रुपये ४०० दंड भरावा लागला. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर व त्या गृहास्थाला झालेल्या दंडाची पावती जोडली आहे )
घटना क्रमांक २ ) : शुक्रवार , ९ ओक्टोंबर , २०१५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५.५५ वाजता मी कार्यालयातून घरी निघालो होतो. . स्थळ ऐरोली कडून पटनी कॉम्पुटर कडे जाणारा रस्ता .
समोर एक दुचाकी चालविणारी व्यक्ती हि पोलिस असूनही त्या व्यक्तीने एकाच वेळी खालील ३ नियम मोडले होते .
१. ) दुचाकी चालविताना शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले .
२. ) दुचाकी चालविताना भ्रमणध्वनी यंत्रावर ( MOBILE PHONE वर ) संभाषण करीत आहे
३. ) दुचाकीच्या मागे पोलिस असे एक वर्तुळाकार STICKER लावले आहे.
ताबडतोब ते छायाचित्र टिपले. त्याच दिवशी रात्री DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांना व इतर काही व्यक्तींना एक ई मेल व ते छायाचित्र पाठविले. हे सगळ करण्यासाठी फक्त ५ ते ७ मिनिटे एवढाच वेळ लागला . त्यानंतर मी त्याचा कधीच पाठपुरावा केला नाही.
मला बुधवार , ४ नोव्हेंबर , २०१५ ला दुपारी १२.१७ वाजता DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांच्या कडून मला एक ई मेल आला त्यात त्यांनी माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही केली हे कळविले. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर जोडले आहे )
आता मला सांगा की
१. ) पोलिसांना , राजकारण्यांना , मंत्र्यांना , राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीचे नियम माफ आहेत ?
२. ) केल्याने होत आहे कि नाही ?
३. ) हे सगळ करायला असा कितीसा वेळ आपल्याला लागतो ?
गेली अंदाजे ३.५ ( साडे तीन ) वर्षे मी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घातले पाहिजे यासाठी विविध पातळ्यांवर लढत आहे. त्या लढ्याला यश येताना दिसत आहे . मी काही वाहतूक चौक्यांमध्ये तेथील वरिष्ठ अधिकार्यांना भेटलो . त्यांनी मला पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल केलेल्या कारवाई बद्दल सांगितले कि दर महिन्याला अंदाजे ५० ते १०० पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही केली जाते. आपण याची शहनिशा करण्यासाठी DCP TRAFFIC , THANE यांच्याशी सम्पर्क साधू शकता.
आपणाला हे लक्ष्यात आले आहे कि नाही ते माहित नाही , पण गेले काही महिने दूरचित्रवाणी ( T.V. ) वरील नवीन मालिकांमध्ये जेंव्हा दुचाकीवरील एखादा प्रसंग असतो तेंव्हा त्या पुरुष , महिला कलाकारांनी शिरस्त्राण घातलेले असते .
हे तर मी नेहमीच सांगतो कि फक्त एकट्याच्या प्रयत्नांनी १०० % यश येण्यासाठी जास्त वेळ लागेल . पण जर " नागरिक " हि व्यकी " जागरूक नागरिक झाली व सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी हा प्रश्न घेतला तर तो दिवस दूर नाही जेव्हा " भारत " या देशातील प्रत्येक पोलिस दुचाकीवर शिरस्त्राण घातलेला दिसेल. प्रत्येक राजकारणी , मंत्री, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , शासकीय कर्मचारी व नागरिक वाहतुकीचे व इतर सगळे नियम पाळताना दिसतील.
या पुढील लढाई आसन पट्टा ( SEAT BELT ) न लावणे , गाडीला काळ्या काचा असणे, विचित्र पद्धतीने वाहन क्रमांक लिहिणे , वाहन क्रमांक पट्टीवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे , गाडीचा दिवा प्रखर पांढरा ठेवणे , देवनागरी मध्ये वाहन क्रमांक लिहिणे , चित्र विचित्र असे भोंगे ( HORN ) बसविणे , सिग्नल न पाळणे , वाहन उलट दिशेला नेणे व इतर अश्या अनेक नियम मोडणाऱ्या च्या विरुद्ध चालू करायची आहे ( माझ्या कडून हि लढाई चालू सुद्धा झाली आहे ) .
आपल्याला हे पटतंय ना ? " भारत " या देशात स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो.
चला मग कोणाची वाट पाह्ताहात ? आपण सगळे मिळून हि लढाई लढवूया ना ?
वारंवार स्वतःचे PROFILE PICTURE फेसबुक वर बदलणे , वारंवार खाद्य पदार्थांची छायाचित्रे फेसबुक वर टाकणे , या पेक्षाही कमी वेळ " जागरूक नागरिक " बनण्यासाठी लागतो.
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
ठाणे, महाराष्ट्र 


Tuesday, February 5, 2019

पोलिसच नियम पाळत नाहीत

पोलिसच नियम पाळत नाहीत
ठाणे पश्चिम येथील राबोडी वाहतूक पोलीस चौकीसमोर हे छायाचित्र टिपलं आहे. या महिला पोलीस अधिकारी दुचाकी चालविताना विना शिरस्त्राण दिसत आहेत. गंमत म्हणजे समोरील बाजूस रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असलेले दिसत आहेत. म्हणजेच वाहतूक पोलीस चौकीसमोरून , व वाहतूक पोलिसांसमोरून या महिला पोलीस विना शिरस्त्राण दुचाकी चालवीत जात आहेत , पण हे त्या वाहतूक पोलिसांच्या नजरेस येत नाही. 
पोलिसांनी नियमांची अशी पायमल्ली केली तर कसं होणार ? 
हे थांबायला नको का ? 
पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे म्हणून मी एकट्याने २०१३ सालापासून प्रयत्न करीत आहे.    

Evil Triumphs When Good People Sit Quiet 
Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 



Monday, February 4, 2019

मराठी कमी , इंग्रजी जास्त अश्या या आजच्या मराठी मालिका

" मराठी कमी , इंग्रजी जास्त अश्या या  आजच्या मराठी मालिका "

" SORRY कोणाला HURT करायचं माझं INTENTION नाही. " हे एक वाक्य आत्ता दूरचित्रवाणीच्या एका मराठी वाहिनीच्या,  मराठी मालिकेतील ,  मराठी नायकाने , मराठीत (  मराठी कमी , इंग्रजी जास्त अश्या मराठीत )  म्हटले . 

या वाक्यात किती मराठी शब्द आहेत न किती इंग्रजी शब्द आहेत हे तुम्हीच पहा . 

इंग्रजीच्या एवढ्या कुबड्या का घ्यावा लागत आहेत आजच्या मराठी मालिकांच्या मराठी लेखकांना ? 
 
मराठी IS MY MOTHER TONGUE असे अभिमानाने जागतिक मराठी दिनाच्या दिवशी म्हणणारे असे हे लेखक असावेत. 

Sunday, February 3, 2019

इंग्रजी उच्च माध्यमिक शाळेची पाटी ( ENGLISH MIDIAM / HIGIER ENGLISH )

इंग्रजी उच्च माध्यमिक शाळेची पाटी ( ENGLISH MIDIAM / HIGIER ENGLISH )
ENGLISH MIDIAM / HIGIER ENGLISH हे असे इंग्रजी असल्यावर त्या इंग्रजी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षणाची पातळी काय असेल ?
हे छायाचित्र नागपूर येथील एक जागरूक नागरिक , श्री. सारंग पिंपरकर यांनी पाठविले आहे.


अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार

" अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार  "   

काही दिवसांपूर्वी  सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार चालू पुन्हा करण्यास परवानगी दिली अशी एक  बातमी वृत्तवाहिन्यांवर ऐकली .  ते ऐकल्यावर " अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार  "  हि  एक कविता सुचली.  

ती कविता येथे देत आहे .  माझ्या मते अनेकांच्या याच प्रकारे भावना असतील . 

ता. क . हि स्वरचीत कविता आहे . ( कोणाचीतरी  कविता चोरी करून स्वतःच्या नावाने खपवित नाही  ) . आपण देखील या कवितेची चोरी करून स्वतःच्या नावाने खपविण्याचे दुष्कृत्य करू नये हि एक चेतावणी . . 

" अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार  " 

उठणार रे उठणार 
      डान्स बार वरची बंदी उठणार 
होणार कि हो होणार 
        आबांच्या आत्म्याला असह्य वेदना होणार ।। १ ।।

होणार कि हो होणार 
        शौकिनांचा जणू दुष्काळच  दूर होणार 
होणार कि हो होणार 
         फुलण्याआधीच अनेक संसार उध्वस्त होणार  ।। २ ।।
         
नोटबंदीचा विसर कि हो पडणार 
           २००० च्या नोटांची बरसात कि हो होणार
माला  माल होणार कि हो होणार 
           अनेक तरन्नुम आता माला माल होणार  ।। ३ ।। 

वाहणार कि हो वाहणार 
         दारूच्या नदयाच नदया वाहणार 
जाणार कि हो जाणार 
         उत्सुकतेपोटी तरुणाई भरकटत जाणार  ।। ४ ।।

चालत होत कि चालत होत 
        जे लपून छपून चालत होत 
होणार कि होणार 
        ते आत्ता खुल्लम खुल्ला होणार  ।। ५ ।।

होणार कि हो होणार 
        पैसेवाल्यांची चंगळ  होणार 
होणार कि हो होणार 
        शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मात्र वाढ होणार ।। ६ ।।

लागणार  कि हो  लागणार    
        गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागणार 
जाणार कि हो जाणार 
       महाराष्ट्र  चार पावले मागेच कि हो जाणार ।। ७ ।।

अहो होणार कि हो होणार 
          अखेर डान्स बार सुरु कि हो होणार 
बार बालांची मदमस्त पाऊले 
           फ्लोर वर छम छम करीत कि हो  थिरकणार  ।। ८ ।।

सत्यजित अ शाह - ठाणे 

HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED ? पंतप्रधान पदाच्या दावेदाराचे अज्ञान


HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED ? पंतप्रधान पदाच्या दावेदाराचे अज्ञान 

भारत देशातील एका राजकीय पक्ष्याचे नेते व पंतप्रधान पदाचे दावेदार नुकतेच पाटणा येथी एका सभेत राफेल वर तावातावाने बोलत होते .  कोणत्याही विषयावर बोलताना त्याविषयीची सखोल माहिती घेणे अतिशय गरजेचे असते हे बहुतेक त्यांना कोणी सांगितले नसेल . 

दुःख हे आहे कि त्यांच्या भाषणात त्यांनी (  पंतप्रधान पदाच्या  दावेदारांनी )  HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED  असे नाव घेतले . अभ्यास अपूर्ण असल्याचे हे एक द्योतक आहे.  त्या आस्थापनाचे  खरं  नाव   " HINDUSTAN AERONAUTICS LIMITED "  असे आहे .  

त्यांना हे माहित नाही कि आजच्या भारतातील सुशिक्षित जनता हे सगळं पाहतेय . त्यांना कोण किती सखोल अभ्यास करतो हे सगळं ठाऊक आहे. 

असो मतदारांनी जागरूक होऊन मतदान करणे गरजेचे आहे. 

Saturday, February 2, 2019

प्राणी मित्र - प्राणी मैत्रीण यांची दादागिरी - एक दुर्दैवी वास्तव

प्राणी मित्र - प्राणी मैत्रीण यांची दादागिरी - एक दुर्दैवी वास्तव 
बुधवार , २२.जून , २०१६ रोजी , रात्रौ  ८.३०  ते ९.३० या वेळात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर चांगली चर्चा  ( थेट प्रक्षेपण / LIVE TELECAST  )  " ABP माझा " या एका प्रतिष्ठित वृत्त वाहिनीने घडवून आणली  होती . त्यात सुदैवाने मला देखील सहभागी होता आले.
गम्मत म्हणजे त्यामुळे फेसबुकवर प्राणीमित्र / प्राणिमैत्रीण माझ्यावर चवताळले आहेत.
अहो मी ही तक्रार नाही करत.. ही तुम्हाला भारत या देशातील प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी यांची दादागिरी दाखवावीशी  वाटली म्हणून हा सगळं खटाटोप .
या सोबत दोन छायाचित्रे जोडत आहे , जी मला फेसबुक वर टिप्पणी ( COMMENTS)  म्हणून आली आहेत.
या अगोदर प्राणी मित्रांच्या दादागिरीबद्दल ऐकून होतो . पण आज अनुभव आला. त्या मुलीने मला चक्क अप्रयत्यक्ष पणे पोलिसात तक्रार करण्याचा  धमकी वजा इशारा दिला आहे.
मी हे आमदार श्री. संजय केळकर यांना कळविले , तेंव्हा त्यांचे उत्तर आले की अजिबात काळजी करू नको.
अशी दमदाटी प्राणी मित्रांनी या अगोदर ठाण्यातील एका प्रतिष्ठित दैनिकाच्या उपसंपादकांना देखील झाली होती , पण त्यांनी जेव्हा याला भिक  नाही घातली तेंव्हा प्राणी मित्र गप्प बसले.
Forwarding below  thoughts of Mahatma Gandhi on the issue of STRAY DOG MENACE .

In the article in 'Young India' in 1926, Mahatma Gandhi, the strongest voice on non-violence, had said he favoured killing of dogs "whenever they are a menace to the society".
"A roving dog without an owner is a danger to society and a swarm of them is a menace to its very existence... If we want to keep dogs in towns or villages in a decent manner, no dog should be suffered to wander. There should be no stray dogs even as we have no stray cattle..."But can we take individual charge of these roving dogs? Can we have a pinjrapole for them? If both these things are impossible, then there seems to me no alternative except to kill them," Gandhi had said.

या वर दिलेल्या महात्मा गांधी यांच्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरील विचार मी कालच्या कार्यक्रमात  मांडले होते.
मी पुरावा असल्याशिवाय शक्यतो बोलत नाही , व अभ्यास केल्याशिवाय , माहिती काढल्याशिवाय बोलत नाही .
खालील माहितीने आपल्याला धक्का बसेल.
१. ) ठाणे महानगर पालिका हद्दीत दररोज अंदाजे ९० / १००  व्यक्तींना श्वान दंश होतो.
२. ) महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ९,००० / १०,००० निरपराध मानव प्राण्यांना  श्वान दंश होतो.
३. ) भारत या देशात दररोज अंदाजे १,६०,००० / १,७०,००० निरपराध मानव प्राण्यांना  श्वान दंश होतो.
कृपया  लक्ष्यात घ्या की शासनाकडे माहिती फक्त शासकीय रुग्णालये येथे आलेल्या श्वानदंश ग्रस्त व्यक्तींचीत असते , बाकी ६० ते ७० % व्यक्ती उपचार खाजगी रुग्णालयातून करतात.
श्वानदंशाच्या घटनेत ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
अशी दमदाटी करून काय साध्य होईल याची मला कल्पना नाही .
या प्राणी मित्रांना घाबरून कोणीही आजपर्यंत याविरुद्ध ब्र काढीत नव्हते.
आपल्याला आश्चर्य वाटेल की जर भटका  कुत्रा / कुत्रे अंगावर हल्ला करण्यासाठी आला आणि आपण त्याला स्वसंरक्षणासाठी दगड मारला तरीही कोठून तरी प्राणी मित्र / प्राणी मैत्रीण येतात  , पोलिसांना बोलावले जाते, आणि कधी नव्हे ते पोलीस तात्काळ हजर होऊन त्या मानव प्राण्याला पकडून नेतात .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !