Friday, October 6, 2017

वाचावे ते नवलचं

" वाचावे  ते नवलचं  " 

नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश .

नवाकाळ , ६  ऑक्टोबर  , २०१७  

आहे कि नाही गम्मत ? 

ज्या वाघांची संख्या अतिशय कमी आहे , त्यातील एका वाघिणीला ठार मारण्याचा आदेश दिला जातो , आणि दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना दंश करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मात्र मानव प्राणी स्व-सौरक्षणासाठी मानव प्राणी साधा दगड देखील मारू शकत नाही , काठीने मारू सुद्धा शकत नाही. 

या वाघिणीच्या रक्षणासाठी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी कसे  काय आले नाहीत याचे आश्चर्य वाटते . 

भारत या देशाचे एक वैशिष्ट्य आहे कि " मानव प्राणी मरो , पण भटका कुत्रा जगो " 

" मेरा भारत महा  ...... न ! "  


Thursday, October 5, 2017

" ठाणे - SMART CITY" मधील " SMART पुरस्कार नव्हे शिफारसी पुरस्कार "


" ठाणे - SMART CITY" मधील " SMART पुरस्कार नव्हे शिफारसी पुरस्कार

" महाराष्ट्र टाईम्स " या एक नावाजलेल्या दैनिकातील या आशयाची एक बातमी बुधवार, ऑक्टोबर , २०१७ च्या अंकात छापून आले आहे ती येथे देत आहे

अश्याच आशयाची बातमी " लोकमत " या दैनिकात देखील आली आहे

आजपर्यंत नोकरी साठी शिफारस , शाळा प्रवेशासाठी शिफारस , महाविद्यालय प्रवेशासाठी शिफारस , नोकरीत बढतीसाठी शिफारस  , नोकरीत बदलीसाठी शिफारस  , या अश्या इतर अनेक प्रकारच्या  शिफारसींबद्दल माहित होत , पण या अश्या नवीन शिफारसींबद्दल वाचल्यावर महा आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही 

असे शिफारसी पुरस्कार  पदरात पडून घेण्यात  " ठाणेकरांना

- कसे  काय हो  "भूषणवाटते

- असा कसा  हो " गौरव " झाला असे वाटते

हे मला आजतागायत कळलेले नाही

त्याचप्रमाणे " ठाणे - SMART CITY " मध्ये जर एवढे " गुणीजन " असते तर 
- ठाणे शहरातील परिवहन सेवा एवढी डबघाईला आली नसती
- ठाणे  शहरातील मैदाने गायब नसती झाली
- ठाणे शहरातील तलाव इतिहासजमा नसते झाले
- ठाणे शहरात एवढी अनधिकृत बांधकामे नसती झाली
- ठाणे शहरात एवढी अस्वछता नसली दिसली
ठाणे शहरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांची संख्या नगण्य झाली असती
- ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा एवढा बोजवारा उडाला नसता  , 
- ठाण्यातील नाले हे गटार नसते झाले
-  ठाणे शहरातील घोडबंदर  रोड वर पादचारी पुलांसाठी एवढी वाट पहावी नसती लागली
- ठाणे शहरातील गल्ली बोळात ( जागोजागी ) अनधिकृत फलक ( HOARDINGS ) नसते दिसले 
- ठाण्यात  सार्वजनिक स्वछता गृहांची वानवा नसती भासली
- ठाणे येथील येऊर या नैसर्गिक अरण्यात एवढे अनधिकृत बंगले  बांधले नसते गेले
- ठाणे येथील रस्ते , पादचारी पूल , अनधिकृत फेरीवाल्यानी  नसते अडवले
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्ते अडवले नसते गेले
- ठाणे शहरात सण , उत्सवांसाठी रस्त्यांवर खड्डे नसते पाडले गेले
- ठाण्यातील नाल्यावर अनधिकृत बांधकामे नसती  झाली
- ठाणे शहरात जागो जागी वाहन तळ उभारले गेले असते
- ठाणे शहरातील डोंगरावर , डोंगर अक्षरशः कापून अनधिकृत वस्त्या नसत्या उभारल्या गेल्या
- ठाणे शहरात अनधिकृत नळ जोडण्या नसत्या झाल्या
- ठाणे शहरातील पदपथांवर फेरीवाले नसते दिसले
- ठाणे शहरातील पदपथांवर अनधिकृत टपऱ्या नसत्या दिसल्या ,  
- ठाणे शहरातील सुविधा भूखंडांवर अनधिकृत बांधकामे नसती दिसली
- ठाणे शहरात अनधिकृत रिक्षांचा , अनधिकृत बसेस चा सुळसुळाट नसता दिसला
- ठाण्यातील शासकीय रुग्णालये , आरोग्य सेवा सेवा  यांचा बोजवारा नसता वाजला / यांची एवढी वाताहत नसती झाली
- ठाणे शहरातील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एवढा वेळ नसता  लागला
- ठाणे शहरातील बालकांना खेळाच्या मैदानाची  वानवा नसती भासली
- ठाणे शहरातील प्रत्येक शाळा , महाविद्यालये यांना खेळाची मैदाने असती
- ठाणे शहरातील रस्त्यावर , रस्ता कमीखड्डे जास्त अशी परिस्थिती नसती दिसली
- ठाणे शहरातील कोपरी पूल एवढी वर्षे नसता रखडला
- ठाणे शहरातील अपघाताला आमंत्रण देणारा माजिवाडा येथील वेडा वाकडा उड्डाण पूल नसता बांधला  गेला .  
- ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला असे अनेक वर्षे उशीर नसता झाला
ठाणे शहरातील अक्षरशः प्रत्येक प्रकल्प पूर्ण व्हायला अवाढव्य असा खर्च ( COST OVER RUN ) नसता  आला
ठाणे शहरातील श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया हि एक विनोदाचा विषय नसता झाला


ऐकावे ते नवलच नव्हे वाचावे ते नवलच

" ठाणे " येथे काय उणे

सत्यजित शाह - ०९८२११५०८५८ 
ठाणे 


Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !




Sunday, October 1, 2017

चाकण परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत - सोमवार, २ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ "

" चाकण परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत  " 

हे मी नाही सांगत , या मथळ्याची बातमी , सोमवार, २  ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " या एका नावाजलेल्या दैनिकात छापून आली आहे . 

महाराष्ट्र राज्यातील , भारत देशा तील एक गल्ली , एक बोळ  एक गाव , एक शहर असे नाही कि जेथे भटक्या कुत्र्यांचा मानव प्राण्यांना त्रास होत नाही . 

या विरुद्ध आदरणीय प्राणी मित्र , वंदनीय प्राणी मैत्रिणी काय करीत आहेत याची कोणालाच माहिती नाही. 

भारत देशात " मानव मरो , पण भटका कुत्रा जगो " असेच जणू भासते. 

" मेरा भारत महान ! " 


Saturday, September 30, 2017

भटक्या कुत्र्यांची दहशत - महाराष्ट्र टाईम्स - रविवार , १ ऑक्टोबर , २०१७

" भटक्या कुत्र्यांची दहशत "

रविवार , १  ऑक्टोबर , २०१७ रोजी  " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी दैनिकात सानिका कसूरकर या एका पत्रकार भगिनीने लिहिलेला लेख छापून आला आहे तो येथे देत आहे . 

दुर्दैवाने तिला आकडेवारी  माहित नसावी असे या हा लेख वाचल्यावर  दिसून येते .  

त्याचप्रमाणे या लेखातील डॉक्टर अविनाश दवे यांना देखील बहुतेक सद्य स्थिती माहित नाही असेच जाणवते . 

थोडक्यात हि आकडेवारी वाचा : 

- ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे ५० ते ७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७७  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो 
- भारत या देशात दररोज अंदाजे १,४१,९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

श्वान दंशाच्या घटनांमध्ये ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात . 

श्वान दंश काय असतो हे या  सोबत जोडलेल्या छायाचित्रांवरून कळून येते. 

दुर्दैवाने ९९ % भारतीय नागरिक हे कोणत्याही गंभीर प्रश्नावर लढण्याच्या मनस्थिती मध्ये नसतात कारण एकच " माझ्या पिताश्रींचे काय जाते ? " ( आजच्या शुद्ध , प्रचलित मराठीत WHAT GOES MY FATHER"S ) 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !







डोंबिवली - १८ हजार जणांना ( मानव प्राण्यांना ) वर्षभरात श्वान दंश - गेल्या महिन्यात ३५०० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला

" डोंबिवली " - महाराष्ट्र राज्य , भारत देश
" १८ हजार जणांना ( मानव प्राण्यांना ) वर्षभरात श्वान दंश "
- गेल्या महिन्यात ३५०० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला .
" लोकसत्ता " २८ सप्टेंबर , २०१७ .
- रेबीज मुळे मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये आशिया खंडात भारताचा प्रथम क्रमांक असून जागतिक स्तरावर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ( प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो कृपया म्हणू नकात कि कशात तरी भारताचा जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक लागतो. )
- कोठे गेले प्राणी मित्र ? 
- कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !




Sunday, September 17, 2017

" भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगा ठार " - " कुत्तेकी मौत " अहं , " कुत्तेकी वजहसे मौत "

" भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगा ठार  " 

(  " कुत्तेकी मौत " अहं , " कुत्तेकी वजहसे मौत " )

" नवाकाळ  " दिनांक १८ सप्टेंबर, २०१७ च्या मुखपृष्ठावरील हि एक हृदयद्रावक बातमी . 

अनेकदा कुत्तेकी मौत वो मर गया असा एक हिंदी वाक्यप्रयोग वापरला जायचा , जातो , पण हे पाहून ,  " कुत्तेकी मौत " चा योग्य अर्थ " कुत्तेकी वजहसे मौत "  हा असा होत चालला आहे  असेच जाणवते . 

कोठे गेले प्राणी मित्र ? 

कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

या मुलाच्या पालकांना शासन काय भरपाई देणार ? . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Thursday, July 27, 2017

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

भटका कुत्रा चावल्याने वाडा येथील शिवाजीनगर मधील , प्रणित मुकेश पाटील या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू " .

कोठे गेले प्राणी मित्र ? कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

२८ जुलै, २०१७ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रातील हृदयद्रावक बातमी वाचा. 

अनेक भारतीय व्यक्ती जे फक्त उंटावर बसून फक्त आणि फक्त शेळ्या हाकतात , म्हणजेच फेसबुक वरून स्वतः काहीही  " क्रिया " न करता , भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्यांना  होणाऱ्या त्रासाबद्दल  काहीही  माहिती न घेता " Bhaktya kutryani tumche Kay bighdwal " ..हा असा एक शेरा फेसबुकवरील माझ्या माहितीवर ( POST वर ) लिहिला होता / मारला होता .

गम्मत म्हणजे हा असा शेरा मारणारी व्यक्ती " पुणे " नावाच्या एका शहरात राहते . 

असा हा  शेरा / प्रतिक्रिया देणाऱ्या   निरागस , अज्ञानी  पण वयाने प्रौढ असलेल्या व्यक्तींची मला किंव येते .
खालील आकडेवारी कृपया वाचा :
- "महाराष्ट्र " या राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो
- "भारत" या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- श्वानदंशाच्या घटनांमधील अंदाजे ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात. 
- कुत्रीला वर्षातून दोनदा पिल्ले होऊ शकतात . 
- कुत्री एका वेळी अंदाजे १२ पिल्ले देते . म्हणजे दरवर्षी अंदाजे २४ पिल्ले जन्माला घालते . त्यातील फॆ निम्मी पिल्लेच जगतात . म्हणजे एक कुत्री दरवर्षी अंदाजे १२ पिल्ले जन्माला घालते . व या प्रकारे भटक्या कुत्र्यांची संख्या हि भरमसाठ वेगाने वाढत जात आहे. 
माझी प्रत्येक " भारतीयाला " नम्र विनंती आहे कि स्वतःला , स्वतःच्या कुटुंबियांना , स्वतःच्या आप्तेष्टांना श्वानदंश होण्याची वाट पाहू नकात .