Thursday, November 5, 2020

जागरूक नागरिक , राज्यपाल नियुक्त आमदार का होऊ शकत नाही ?

जागरूक नागरिक , राज्यपाल नियुक्त आमदार का होऊ शकत नाही ? 

दैनिक नवराष्ट्र  च्या ४ नोव्हेंबर , २०२० च्या अंकातील बातमी देत आहे 

मी , सत्यजित अ  शाह , राहणार ठाणे , महाराष्ट्र राज्य , उच्च  शिक्षित . 
आडनाव अमराठी , पण कोणत्याही मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीपेक्षा शुद्ध मराठीत संभाषण करतो . मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढतोय . 
अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी लाढलोय , लढतोय  , लढणारच . 
" आजची सत्यगीतं " हा माझा पहीला  वाहिला मराठी कवितांचा संग्रह  २०१४ रोजी प्रकाशित झाला आहे . 

राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठीच्या  प्रत्येक नियमात बसतो . 
मी का नाही आमदार होऊ शकत ? 

आमदार झालो तर , 

असेल माझा  वेगळाच झेंडा 
सामाजिक सुधारणा  हाच अजेन्डा  

# राज्यपाल नियुक्त आमदार   # SATYAJITASHAH # COMMONMAN



Wednesday, October 7, 2020

" ठाणे भूषण " एक खड्डा

 " ठाणे भूषण "

दर वर्षी ठाणे शहरात , ठाणे महानगरपालिका बहुतेक १ ऑक्टोबर रोजी अनेक ठाणेकरांना " वशिल्याचे " अनेक पुरस्कार देत असते .

यावर्षी दुर्दैवाने कोरोना मुळे हे पुरस्कार दिले गेलं नाहीत .जर ते दिले गेले असते , तर त्यातील मानाचा असा " ठाणे भूषण " हा पुरस्कार "ठाणे " या एका चलाख शहरातील ( SMARTCITY ) या छायाचित्रात दिसणाऱ्या रस्त्यावरील एखाद्या देशाच्या नकाश्यासारख्या दिसणाऱ्या अतिविशाल खड्डयाला मिळाला असता .

हा खड्डा कळवा सेतूवरून ( KALWA BRIDGE ) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे जुन्या पुणे - मुंबई मार्गाने जाताना ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अगदी जवळील रस्त्यावर गेली अनेक महिने दिमाखाने पहुडलेला आहे . खड्ड्यामुळे मूळ रस्ता देखील स्पष्ट्पणे दिसून येतो .

गम्मत म्हणजे या रस्त्यावरून ठाणे शहरातील अनेक आदरणीय , माननीय , वंदनीय , पूजनीय , . . . . . . . . . लोकप्रतिनिधी अनेकदा येजा करीत असतात , पण बहुतेक त्यांना हा नकाशा म्हणजे जणू मूळ रस्ताच वाटत असावा त्यामुळे त्यांचे या खड्डयाकडे लक्ष्य गेले नसावे .

मला मात्र हा एक खड्डा वाटतो , म्हणजेच माझी नजर बहुतेक वाईट असावी .

असंख्य ठाणेकर दरवर्षी अनेक खड्ड्यांमधून जातात , पण याविरोधात आवाज उठविण्यात मात्र कमीपणा मानतात.

असो , पण माझे एकट्याचे प्रयत्न मात्र कमी पडतात.

या सोबत " महाराष्ट्र टाईम्स " च्या ७ ऑक्टोबर , २०२० च्या अंकातील एक छोटीशी बातमी वज तळमळ येथे देत आहे .

# ठाणे भूषण , # POTHOLESTHANE




Saturday, May 30, 2020

एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या ) लढाईत अखेर " सत्य " जिंकले


एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या  )  लढाईत अखेर " सत्य " जिंकले 

अनेक भारतीय , त्याची बाजू सत्याची असूनदेखील , त्यांची काहीही चूक नसून देखील  घाबरून जाऊन ,  बलाढ्य अश्या भारतीय अथवा विदेशी आस्थापनांसमोर , न लढता शरणागती पत्करतात , व दंड , विलंबशुल्क वगैरे भरून मोकळे होतात . अश्या भारतीयांना हि माझी लढाई स्फुरण देईल असे वाटते म्हणून हा सगळा खटाटोप . 

थोडक्यात सांगतो , माझ्याकडे अनेक वर्षे STANDARD CHARTERED BANK  या एका  विदेशी अर्थपेढीचे  ( अर्थपेढी  = FOREIGN BANK ) उच्च श्रेणीचे  उधारी पत्ता ( PLATINUM CREDIT CARD )   होते .  मला मार्च , २०१३ जे मासिक देयक ( MONTHLY BILL  ) आलं , ते रुपये २४,९७३=०० एवढे होते . त्यात मी खरा खुरा खर्च केला होता ती मामुली रक्कम होती व बाकीची मोठ्ठी रक्कम मी न मागताच त्यांनी दिलेल्या भविष्यातील आजारपणामध्ये  रुग्णालयातील खर्चासाठी / आजारपणातील खर्चासाठी वा तत्सम असलेल्या नवीन  विमापत्रासाठी ( INSURANCE POLICY ) होती .  मी न मागीतलेल्या  विम्याची रक्कम त्या मासिक देयकात त्यांनी  लावल्याने मी त्यांना महाजाल-डाक ( E-MAIL ) ने ताबडतोब त्याबाबत कळविले व मी ती विम्याची रक्कम भरणार नाही हे कळविले . मी बाकीची रक्कम ( म्हणजे जो मी  खरा खुरा खर्च केला होता ती रक्कम भरून टाकली . ) . त्यानंतर मी त्यांचा तो  उधारी पत्ता ( CREDIT CARD ) खर्च करण्यासाठी वापरणे बंद केलं . 

त्यानंतर   STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून बाकी रक्कम भरण्यासाठी   महाजाल-डाक ( E-MAIL ) यायचे , मी त्यांना वारंवार सत्य लिहिले , त्याचप्रमाणे जेवढे पैसे भरले होते त्याचे   व्यवस्थित तपशील  अनेकदा पाठविले , त्याचप्रमाणे मी ती विम्याची रक्कम अजिबात भरणार नाही हे देखील सांगितले . त्यावर एकदा मला त्यांच्याकडून  महाजाल-डाक ( E-MAIL ) आला ज्यात त्यांनी  लिहिले होते कि त्यांनी विम्याची रक्कम माफ केली आहे , व मी उरलेली रक्कम भरावी . मी त्यांना पुन्हा   जेवढे पैसे भरले होते त्याचे  व्यवस्थित विवरण  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने पाठविले . 

त्यानंतर   STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून व त्यांच्या वसुली अडत्या / वसुली प्रतिनिधी ( RECOVERY AGENT ) यांचे अनेकदा उरलेली रक्कम ताबडतोब भरण्यासाठी  दादागिरीसम  , धमकीवजा दूरध्वनी यायचे . प्रत्येक वेळी ती रक्कम रुपये ४०,०००=०० त्यानंतर कधीतरी रुपये ५०,०००=०० अशी वाढीव रक्कम मागितली जायची , कारण काय म्हणे तर चक्रवाढ व्याजाने रक्कम वाढली . मी प्रत्येकाला सत्य वारंवार सांगायचो , त्यांना विनंती करायचो कि पूर्ण माहिती घ्या मग तुम्हाला कळेल कि मी काहीच पैसे देणे लागत नाही . मी तर त्यांना अनेकदा सांगितले कि एखाद्या निरपराध व्यक्तीला असा त्रास देणं योग्य नाही , मी तर अनेकदा त्यांना माझ्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला , म्हणजे त्यांच्या त्या परदेशी   अर्थपेढीचं   ( अर्थपेढी  = FOREIGN BANK ) हसू होईल कारण ते तेथे खटला ठरतील . तरीही त्यांचे वसुलीसाठी दूरध्वनी येण बंद झाले नाही . मलाच अनेकदा पैसे भरलेली माहिती घेऊन   STANDARD CHARTERED BANK च्या मुंबई कार्यालयात भेटण्यास सांगितले . त्यावर मी त्यांना सांगितले कि सगळी माहिती तर मी अनेकदा   महाजाल-डाक ( E-MAIL ) पाठवली आहे त्यामुळे जर  त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर गरज असेल तर मला माझ्या कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले . 

सन  २०१७ साली मला हृदयरोगाचा झटका आला , माझ्यावर शस्त्रक्रिया झाली , हे सुद्धा मी त्यांना सांगितले , व अनेकदा  सांगितले कि मला असे वारंवार धमकीवजा दूरध्वनी  करून त्रास देऊ नका . 
त्यानंतर मला शेवटचा   दूरध्वनी  २४ फेब्रुवारी  २०२० रोजी १७.४८ वाजता , ०२२-६८७८१७०० या क्रमांकावरून आला , त्या व्यक्तीला सुद्धा सगळा इतिहास पुन्हा  सांगितला , त्यांनी सुचविल्या प्रमाणे मी पुन्हा  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने सगळी माहिती पाठवली , त्याचा मला तक्रार क्रमांक ६९६१७७७ ता. २६.०२.२०२० मिळाला ( COMPLAINT NUMBER 6961777 dt. 26.02.2020 ) .   
त्यानंतर मला  STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून बुधवार , १५ एप्रिल , २०२० , २२.११ वाजता पुन्हा  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने रुपये  ४३,१७२=३७ भरण्यासाठी स्मरण पत्र आलं . 

हे सांगायचं राहिलं कि ,  STANDARD CHARTERED BANK यांनीं तोपर्यंत काही वर्षांपूर्वीच CIBIL ( Credit Information Bureau (India) Limited ) या संस्थेला कळवून माझा CIBIL SCORE वाईट केला होता / बिघडवला होता. याबाबत  देखील मी त्यांना दूरध्वनीसंभाषणात , महाजाल-डाक ( E-MAIL )  पत्रव्यव्हारात कळविले होते . 

सरतेशेवटी मला  मंगळवार , २६ मे , २०२० रोजी , १९.४४ वाजता   STANDARD CHARTERED BANK  यांच्या कडून   महाजाल-डाक ( E-MAIL )  आला , त्यात  त्यांनी खालील महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत ( तो  महाजाल-डाक ( E-MAIL ) , मी याच्या सोबत  जोडत आहे ) 

we confirm having reversed the entire balance outstanding reflecting in the above mentioned card account. 
- As on date, there is nil dues to be payable towards the same.  
- Further, we have instructed CIBIL in order to make the relevant changes in their records and the same shall be amended in the next 45 days. 
- As there is no further actionable at our end, we shall proceed to close the above mentioned complaint.  

याचाच अर्थ अंदाजे ७.२  वर्षे म्हणजेच अंदाजे २,६०० दिवस  चालू असलेल्या  एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या  ) अथक लढाईत माझ्या सारख्या एका सामान्य भारतीय नागरिकाचा विजय झाला , म्हणजेच शेवटी " सत्य " जिंकले .  

तळ  टीप : मी मार्च , २०१३ पासून याबाबत केलेली    महाजाल-डाक ( E-MAIL ) लिखापढी  कोणाला पुरावा म्हणून  पाहायची असेल तर माझ्या संगणकात आहे . 


"आम्ही नाही सुधारणार " - एक उपरोधिक / उपहासात्मक ( SATIRE )

"आम्ही नाही सुधारणार " - एक उपरोधिक / उपहासात्मक ( SATIRE ) , हास्य व्यंगचित्र. 
हे मी काढलं आहे . 
हे जे ठिकाण मी  दाखवील आहे तो ठाणे पूर्व येथील  कापूरबावडी नाका आहे . 
तेथे अनेकदा " ठाणे " या " हुशार शहरातील " ( SMART CITY )  अनेक राजकीय नेते यांच्या वाढदिवसाचे फलक अनेकदा व अनेक दिवस असलेले दिसून येतात . 
माझं असे अवलोकन / निरीक्षण आहे कि ठाणे शहरातील बहुसंख्य राजकीय नेते , स्वतःला " आयुष्याहून मोठे " ( LARGER THAN LIFE ) दाखविण्यात धन्यता मानतात . 
या हास्यव्यंगचित्राप्रमाणे एखादा राजकीय नेता , अश्या प्रकारे फलकावर झळकूसुद्धा शकेल . 
असो , तुम्हाला हे कसे वाटले ? 


Wednesday, May 13, 2020

मूक मोर्चा - हास्यव्यंगचित्र

हे हास्यव्यंगचित्र माझ्या कै. काकूला म्हणजेच बाईला ( आमच्यात आईला बाई म्हणतात ) आदरांजली आहे . तिनेच माझे  मी सहा महिन्याचा असल्यापासून आई बनून संगोपन केले आहे . माझी बाई खूप बडबडायची , तिला मी अनेकदा गमतीत म्हणायचो कि " बाई तू जर एखाद्या मूक मोर्चात  सामील झालीस तरीही " मूक मोर्चाचा  विजय असो " अशी घोषणा देशील . तीच संकल्पना घेऊन हे  हास्यव्यंगचित्र रेखाटले आहे . 
( कोणत्याही राजकीय पक्षाने ,अराजकीय संघटनेने गैरसमज करून घेऊ नये . ) 



Monday, May 11, 2020

PREPARE TO LIVE WITH CORONA , AYURVEDA , FACTS , Interview with Dr.Uday ...



PREPARE TO LIVE WITH CORONA , AYURVEDA ,
FACTS , Interview with Dr.Uday Kulkarni-Thane

like it , share it , subscribe to this channel








Saturday, May 2, 2020

दुर्दैवाने माझं हास्यव्यंगचित्र सत्यात उतरताना दिसतंय

दुर्दैवाने माझं हास्यव्यंगचित्र सत्यात उतरताना दिसतंय

या सोबत २९ मार्च , २०२० रोजी  मी स्वतः रेखाटलेले एक व्यंगचित्र / हास्यव्यंगचित्र देत आहे .   त्याचबरोबर २ / ३ दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीची ( कृपया खालील पांढऱ्या पट्टीतील बातमी वाचा ) झलक देत आहे . 

त्या बातमीवरून  माझं हास्यव्यंगचित्र सत्यात उतरतानाचे एक दुर्दैवी  चित्र आढळून येतंय . 



Sunday, April 26, 2020

" कोरोना टाळेबंदी कोणासाठी ? " - एक स्वरचित उपहासात्मक कविता

" कोरोना टाळेबंदी कोणासाठी ?  " - एक स्वरचित उपहासात्मक कविता 


Wednesday, April 22, 2020

SOCIAL DISTANCING ( सामाजिक अंतर ) SCOOTER

SOCIAL DISTANCING ( सामाजिक अंतर  ) SCOOTER


Tuesday, April 14, 2020

करोना , करोना आणि करोना

जेथे पहावं , ऐकावं , वाचावं  तेथे करोना , करोना आणि करोना . 
सगळं वातावरण एकदम नकारात्मक  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत NEGATIVE )  झालं आहे . 
त्याच नकारात्मक वातावरणाचं सकारात्मक  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत POSITIVE ) वातावरणात परिवर्तन  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत TRANSFORMATION  ) करण्यासाठी  आजच लिहिलेली खालील कविता पाठवीत आहे . 
आपणाला हि कविता वाचक , प्रेक्षक , श्रोते यांच्यापर्यंत न्यायची असेल तर अवश्य न्यावी ( माझ्या परवानगीची गरज नाही ) , फक्त  माझ्या नावासकट न्यावी हि नम्र विनंती . .


Sunday, April 12, 2020

घराचे घरपण घालवणारी माणसं 


घराचे घरपण घालवणारी माणसं 


Friday, April 10, 2020

आपले पोलीस

" आपले पोलीस " 

पोलिसांना मानाचा मुजरा ! 

त्यांच्या अविरत परिश्रमावर लिहिलेली हि कविता 


Monday, April 6, 2020

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल 

" खूप प्रयत्न करून  आज *मास्क* ला पर्यायी मराठी शब्द मिळाला आहे.

मुखनाकसंरक्षकजीवजंतूरोधकहवागाळ झाकोळ पट्टी " . 

हा असा विचित्र संदेश कसं काय ? / काय मग ? ( WHATSAPP ) द्वारे दिनांक ५ एप्रिल , २०२० पासून पसरवला ( VIRAL केला ) जातोय . मराठी भाषेचे अतीव दुःख म्हणजे हा संदेश मराठी आडनाव असलेल्या , मराठी भाषिक व्यक्तींकडूनच अग्रेषित ( FORWARD ) केला  जातोय.  

मराठी भाषिक हे विसरतोय कि हे असले विचित्र संदेश अग्रेषित करून ते मराठी भाषेची टिंगल , टवाळी करताहेत . ते हे विसरताहेत कि मराठी हि मराठी आडनाव असलेल्यांची मातृभाषा (MOTHER TONGUE )  आहे , म्हणजेच आपण आपल्या आईची खिल्ली उडवतोय . 

माझी तरी मराठी भाषा हि  मातृभाषा आहे , आणि मी माझ्या मातृभाषेची  खिल्ली  उडविणारी नाही , उडू देणार नाही . 

ज्या व्यक्तीने हा संदेश बनविला असेल , बहुतेक त्याच्या मेंदूवर कायमचा मुखवटा ( MASK ) लावलेला असेल .  

तुमची मातृभाषा कोणती आहे ? तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान आहे का ?  



Friday, April 3, 2020

आपले पोलीस

पोलिसांना मानाचा मुजरा .

गेले २ /३ आठवडे आपले पोलीस दिवस अन रात्र राबताहेत . त्यांच्या या अथक परिश्रमाला माझा मानाचा मुजरा . सगळ्या पोलिसांना " आपले पोलीस " हि कविता सादर अर्पण . 


Wednesday, April 1, 2020

"खादाड " प्रवृत्ती

"खादाड " प्रवृत्ती :

काही वर्षांपूर्वी , मी FACEBOOK  ( FB ) वरील  “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ” या माझ्या एका गाजलेल्या व " लोकप्रभा " या साप्ताहिकेत छापून आलेल्या लेखात  "खादाड " प्रवृत्ती विषयी लिहिले होते.  मला वाटलं होत कि या प्रवृत्तीच्या व्यक्ती फक्त समाजरूप / समाजचेहरा  (   FACEBOOK  ) या सामाजिक माध्यमात आढळून येतात . पण ते चुकीचं होत कारण मला अश्या प्रवृत्तीच्या व्यक्ती कसं काय ? / काय मग ? ( what'sapp )  या सामाजिक माध्यमावर देखील आढळून आल्या . आज तर हद्दच ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत HEIGHT  ) झाली . आज , , १ एप्रिल , २०२० रोजी भारत देशातील एक सुप्रसिद्ध व्यक्तीने   TWEETER  या सामाजिक माध्यमावर सोबत जोडलेल्या छायाचित्रातील माहिती टाकली होती . व त्यावर  अंबा  ( ज्याला आंबा म्हणतात ) घालून शिरा  ,  येता का  breakfast ( हे आजचं शुद्ध व प्रचलित मराठी )  ला  असे लिहिले होते . 

याला काय म्हणू  ? अजून काय लिहू ? भारतीय कधी प्रगल्भ  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत MATURE ) कधी होणार ? खरं तर सामाजिक माध्यमांचा उपयोग  सामाजिक प्रभोधनासाठी  , सामाजिक प्रश्नांना वाच फोडण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे . 

माझ्या लेखातील त्या  "खादाड " प्रवृत्ती विषयीचा भाग येथे देत आहे 
 
 "खादाड " प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या   व्यक्तींना  सदा कदा  खाण्याच्या पदार्थांचे फोटो , किवा स्वतः खात असतानाचे   फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्था संदर्भातील फोटो FB वर टाकण्यात / SHARE करण्यात  फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच ( RICE PLATE ) काय दाखवतील . तर कधी  भजी ,  बटर घातलेली पाव भाजी ,   जिलेबी ,  मिसळ  वगैरे चे फोटो टाकून त्याबरोबर , असे काहीतरी लिहितात या खायला वाट पाहतो,  येता का खायला , कोण कोण येणार हे सगळं गरमा  गरम खायला ? या प्रकारच्या प्रवृत्तींना हि खाण्याच्या पदार्थांची छायाचित्रे अनेकांना TAG करायची देखील एक ( अप )  प्रवृत्ती असते. TAG केल म्हणजे ती सगळी पदार्थांची छायाचित्रे नाईलाजास्तव पाहिलीच  जातात.  सुरुवातीला एवढे खाण्याचे पदार्थ या छायाचित्रातून पाहिले जायचे कि मला न्याहारी देखील करायची इच्छा होत नसे. तसेच  काहीही खाता मला अनेकदा ढेकर यायची, अपचन देखील व्हायचं. माझ्या आत्तापर्यंत " हाजमोला " च्या बाटल्या संपवून झाल्या आहेत , त्याचप्रमाणे " GELUSIL " च्या हि बाटल्या संपवून झाल्या आहेत. खूप विचारा अंती हि सगळी खाद्य पदार्थांची छायाचित्रे याला कारणीभूत आहेत हे कळाले . या प्रवृत्तीवर काही उपाय आपल्या कडे असेल तर मला जरूर कळवा .

अश्याच या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झाल . त्याने लग्नातले भरपूर फोटो FB वर टाकले. त्यात लग्नातील विधींचे , जेवणाचे  , एकमेकांना भरवितांना वगैरे असे अनेक  फोटो होते हे वेगळं  सांगायची गरज नाही. गम्मत तर पुढे आहे . त्याने एका HOTEL मध्ये शिरतानाचा  फोटो टाकला होता लिहिले होते कि मधु चंद्राला आलो आहे. 

जसे खाद्य पदार्थांचे फोटो टाकल्यावर अश्या व्यक्ती लिहितात कि  चला या खायला किंवा येता का खायला ? , अथवा कोण कोण येणार हे सगळं गरमा  गरम खायला ? तसच मला वाटल कि आता ती व्यक्ती लिहिते कि काय , चला या XXXXXX ला किंवा येता का XXXXX ला ? , अथवा कोण कोण येणार XXXXXXXXX ला ? . इतक्यांदा त्या व्यक्तीने अनेक पदार्थ खायला FB वर आमंत्रण दिले होते , पण मी काही  गेलो नव्हतो आणि तसा मला दांडगा अनुभव असल्यामुळे ( अहो काय हे भलताच काय विचार करता ? मी प्रवासाच्या  अनुभवाबद्दल बोलतोय )  म्हणून म्हटलं कि यावेळी  आता त्याचे मन नाही मोडायचे , आणि त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करायचा ,   मी लगेचच  माझी प्रवासाची पेटी ( TRAVEL BAG ) भरायला घेणारच होतो पण तशी  वाक्ये त्या व्यक्तीने तेथे टाकली नव्हती त्यामुळे माझा तसा मोठा पचकाच झाला .