Monday, April 6, 2020

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल 

" खूप प्रयत्न करून  आज *मास्क* ला पर्यायी मराठी शब्द मिळाला आहे.

मुखनाकसंरक्षकजीवजंतूरोधकहवागाळ झाकोळ पट्टी " . 

हा असा विचित्र संदेश कसं काय ? / काय मग ? ( WHATSAPP ) द्वारे दिनांक ५ एप्रिल , २०२० पासून पसरवला ( VIRAL केला ) जातोय . मराठी भाषेचे अतीव दुःख म्हणजे हा संदेश मराठी आडनाव असलेल्या , मराठी भाषिक व्यक्तींकडूनच अग्रेषित ( FORWARD ) केला  जातोय.  

मराठी भाषिक हे विसरतोय कि हे असले विचित्र संदेश अग्रेषित करून ते मराठी भाषेची टिंगल , टवाळी करताहेत . ते हे विसरताहेत कि मराठी हि मराठी आडनाव असलेल्यांची मातृभाषा (MOTHER TONGUE )  आहे , म्हणजेच आपण आपल्या आईची खिल्ली उडवतोय . 

माझी तरी मराठी भाषा हि  मातृभाषा आहे , आणि मी माझ्या मातृभाषेची  खिल्ली  उडविणारी नाही , उडू देणार नाही . 

ज्या व्यक्तीने हा संदेश बनविला असेल , बहुतेक त्याच्या मेंदूवर कायमचा मुखवटा ( MASK ) लावलेला असेल .  

तुमची मातृभाषा कोणती आहे ? तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान आहे का ?  



No comments:

Post a Comment