"खादाड " प्रवृत्ती :
काही वर्षांपूर्वी , मी FACEBOOK ( FB ) वरील “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ” या माझ्या एका गाजलेल्या व " लोकप्रभा " या साप्ताहिकेत छापून आलेल्या लेखात "खादाड " प्रवृत्ती विषयी लिहिले होते. मला वाटलं होत कि या प्रवृत्तीच्या व्यक्ती फक्त समाजरूप / समाजचेहरा (
FACEBOOK ) या सामाजिक माध्यमात आढळून येतात . पण ते चुकीचं होत कारण मला अश्या प्रवृत्तीच्या व्यक्ती कसं काय ? / काय मग ? ( what'sapp )
या सामाजिक माध्यमावर देखील आढळून आल्या . आज तर हद्दच ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत HEIGHT ) झाली . आज , , १ एप्रिल , २०२० रोजी भारत देशातील एक सुप्रसिद्ध व्यक्तीने TWEETER या सामाजिक माध्यमावर सोबत जोडलेल्या छायाचित्रातील माहिती टाकली होती . व त्यावर अंबा ( ज्याला आंबा म्हणतात ) घालून शिरा , येता का breakfast ( हे आजचं शुद्ध व प्रचलित मराठी ) ला असे लिहिले होते .
याला काय म्हणू ? अजून काय लिहू ? भारतीय कधी प्रगल्भ ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत MATURE ) कधी होणार ? खरं तर सामाजिक माध्यमांचा उपयोग सामाजिक प्रभोधनासाठी , सामाजिक प्रश्नांना वाच फोडण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे .
माझ्या लेखातील त्या "खादाड " प्रवृत्ती विषयीचा भाग येथे देत आहे
"खादाड " प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सदा न कदा खाण्याच्या पदार्थांचे फोटो , किवा स्वतः खात असतानाचे फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्था संदर्भातील फोटो FB वर टाकण्यात / SHARE करण्यात फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच ( RICE PLATE ) काय दाखवतील . तर कधी भजी , बटर घातलेली पाव भाजी , जिलेबी , मिसळ वगैरे चे फोटो टाकून त्याबरोबर , असे काहीतरी लिहितात या खायला वाट पाहतो, येता का खायला , कोण कोण येणार हे सगळं गरमा गरम खायला ? या प्रकारच्या प्रवृत्तींना हि खाण्याच्या पदार्थांची छायाचित्रे अनेकांना TAG करायची देखील एक ( अप ) प्रवृत्ती असते. TAG केल म्हणजे ती सगळी पदार्थांची छायाचित्रे नाईलाजास्तव पाहिलीच जातात. सुरुवातीला एवढे खाण्याचे पदार्थ या छायाचित्रातून पाहिले जायचे कि मला न्याहारी देखील करायची इच्छा होत नसे. तसेच काहीही न खाता मला अनेकदा ढेकर यायची, व अपचन देखील व्हायचं. माझ्या आत्तापर्यंत " हाजमोला " च्या ५ बाटल्या संपवून झाल्या आहेत , त्याचप्रमाणे " GELUSIL " च्या हि ६ बाटल्या संपवून झाल्या आहेत. खूप विचारा अंती हि सगळी खाद्य पदार्थांची छायाचित्रे याला कारणीभूत आहेत हे कळाले . या प्रवृत्तीवर काही उपाय आपल्या कडे असेल तर मला जरूर कळवा .
अश्याच या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झाल . त्याने लग्नातले भरपूर फोटो FB वर टाकले. त्यात लग्नातील विधींचे , जेवणाचे , एकमेकांना भरवितांना वगैरे असे अनेक फोटो होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गम्मत तर पुढे आहे . त्याने एका HOTEL मध्ये शिरतानाचा फोटो टाकला होता व लिहिले होते कि मधु चंद्राला आलो आहे.
जसे खाद्य पदार्थांचे फोटो टाकल्यावर अश्या व्यक्ती लिहितात कि चला या खायला किंवा येता का खायला ? , अथवा कोण कोण येणार हे सगळं गरमा गरम खायला ? तसच मला वाटल कि आता ती व्यक्ती लिहिते कि काय , चला या XXXXXX ला किंवा येता का XXXXX ला ? , अथवा कोण कोण येणार XXXXXXXXX ला ? . इतक्यांदा त्या व्यक्तीने अनेक पदार्थ खायला FB वर आमंत्रण दिले होते , पण मी काही गेलो नव्हतो आणि तसा मला दांडगा अनुभव असल्यामुळे ( अहो काय हे भलताच काय विचार करता ? मी प्रवासाच्या अनुभवाबद्दल बोलतोय ) म्हणून म्हटलं कि यावेळी आता त्याचे मन नाही मोडायचे , आणि त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करायचा , मी लगेचच माझी प्रवासाची पेटी ( TRAVEL BAG ) भरायला घेणारच होतो पण तशी वाक्ये त्या व्यक्तीने तेथे टाकली नव्हती त्यामुळे माझा तसा मोठा पचकाच झाला .
No comments:
Post a Comment