हे हास्यव्यंगचित्र माझ्या कै. काकूला म्हणजेच बाईला ( आमच्यात आईला बाई म्हणतात ) आदरांजली आहे . तिनेच माझे मी सहा महिन्याचा असल्यापासून आई बनून संगोपन केले आहे . माझी बाई खूप बडबडायची , तिला मी अनेकदा गमतीत म्हणायचो कि " बाई तू जर एखाद्या मूक मोर्चात सामील झालीस तरीही " मूक मोर्चाचा विजय असो " अशी घोषणा देशील . तीच संकल्पना घेऊन हे हास्यव्यंगचित्र रेखाटले आहे .
( कोणत्याही राजकीय पक्षाने ,अराजकीय संघटनेने गैरसमज करून घेऊ नये . )
( कोणत्याही राजकीय पक्षाने ,अराजकीय संघटनेने गैरसमज करून घेऊ नये . )
No comments:
Post a Comment