Wednesday, October 7, 2020

" ठाणे भूषण " एक खड्डा

 " ठाणे भूषण "

दर वर्षी ठाणे शहरात , ठाणे महानगरपालिका बहुतेक १ ऑक्टोबर रोजी अनेक ठाणेकरांना " वशिल्याचे " अनेक पुरस्कार देत असते .

यावर्षी दुर्दैवाने कोरोना मुळे हे पुरस्कार दिले गेलं नाहीत .जर ते दिले गेले असते , तर त्यातील मानाचा असा " ठाणे भूषण " हा पुरस्कार "ठाणे " या एका चलाख शहरातील ( SMARTCITY ) या छायाचित्रात दिसणाऱ्या रस्त्यावरील एखाद्या देशाच्या नकाश्यासारख्या दिसणाऱ्या अतिविशाल खड्डयाला मिळाला असता .

हा खड्डा कळवा सेतूवरून ( KALWA BRIDGE ) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे जुन्या पुणे - मुंबई मार्गाने जाताना ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अगदी जवळील रस्त्यावर गेली अनेक महिने दिमाखाने पहुडलेला आहे . खड्ड्यामुळे मूळ रस्ता देखील स्पष्ट्पणे दिसून येतो .

गम्मत म्हणजे या रस्त्यावरून ठाणे शहरातील अनेक आदरणीय , माननीय , वंदनीय , पूजनीय , . . . . . . . . . लोकप्रतिनिधी अनेकदा येजा करीत असतात , पण बहुतेक त्यांना हा नकाशा म्हणजे जणू मूळ रस्ताच वाटत असावा त्यामुळे त्यांचे या खड्डयाकडे लक्ष्य गेले नसावे .

मला मात्र हा एक खड्डा वाटतो , म्हणजेच माझी नजर बहुतेक वाईट असावी .

असंख्य ठाणेकर दरवर्षी अनेक खड्ड्यांमधून जातात , पण याविरोधात आवाज उठविण्यात मात्र कमीपणा मानतात.

असो , पण माझे एकट्याचे प्रयत्न मात्र कमी पडतात.

या सोबत " महाराष्ट्र टाईम्स " च्या ७ ऑक्टोबर , २०२० च्या अंकातील एक छोटीशी बातमी वज तळमळ येथे देत आहे .

# ठाणे भूषण , # POTHOLESTHANE




No comments:

Post a Comment