Saturday, May 30, 2020

एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या ) लढाईत अखेर " सत्य " जिंकले


एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या  )  लढाईत अखेर " सत्य " जिंकले 

अनेक भारतीय , त्याची बाजू सत्याची असूनदेखील , त्यांची काहीही चूक नसून देखील  घाबरून जाऊन ,  बलाढ्य अश्या भारतीय अथवा विदेशी आस्थापनांसमोर , न लढता शरणागती पत्करतात , व दंड , विलंबशुल्क वगैरे भरून मोकळे होतात . अश्या भारतीयांना हि माझी लढाई स्फुरण देईल असे वाटते म्हणून हा सगळा खटाटोप . 

थोडक्यात सांगतो , माझ्याकडे अनेक वर्षे STANDARD CHARTERED BANK  या एका  विदेशी अर्थपेढीचे  ( अर्थपेढी  = FOREIGN BANK ) उच्च श्रेणीचे  उधारी पत्ता ( PLATINUM CREDIT CARD )   होते .  मला मार्च , २०१३ जे मासिक देयक ( MONTHLY BILL  ) आलं , ते रुपये २४,९७३=०० एवढे होते . त्यात मी खरा खुरा खर्च केला होता ती मामुली रक्कम होती व बाकीची मोठ्ठी रक्कम मी न मागताच त्यांनी दिलेल्या भविष्यातील आजारपणामध्ये  रुग्णालयातील खर्चासाठी / आजारपणातील खर्चासाठी वा तत्सम असलेल्या नवीन  विमापत्रासाठी ( INSURANCE POLICY ) होती .  मी न मागीतलेल्या  विम्याची रक्कम त्या मासिक देयकात त्यांनी  लावल्याने मी त्यांना महाजाल-डाक ( E-MAIL ) ने ताबडतोब त्याबाबत कळविले व मी ती विम्याची रक्कम भरणार नाही हे कळविले . मी बाकीची रक्कम ( म्हणजे जो मी  खरा खुरा खर्च केला होता ती रक्कम भरून टाकली . ) . त्यानंतर मी त्यांचा तो  उधारी पत्ता ( CREDIT CARD ) खर्च करण्यासाठी वापरणे बंद केलं . 

त्यानंतर   STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून बाकी रक्कम भरण्यासाठी   महाजाल-डाक ( E-MAIL ) यायचे , मी त्यांना वारंवार सत्य लिहिले , त्याचप्रमाणे जेवढे पैसे भरले होते त्याचे   व्यवस्थित तपशील  अनेकदा पाठविले , त्याचप्रमाणे मी ती विम्याची रक्कम अजिबात भरणार नाही हे देखील सांगितले . त्यावर एकदा मला त्यांच्याकडून  महाजाल-डाक ( E-MAIL ) आला ज्यात त्यांनी  लिहिले होते कि त्यांनी विम्याची रक्कम माफ केली आहे , व मी उरलेली रक्कम भरावी . मी त्यांना पुन्हा   जेवढे पैसे भरले होते त्याचे  व्यवस्थित विवरण  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने पाठविले . 

त्यानंतर   STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून व त्यांच्या वसुली अडत्या / वसुली प्रतिनिधी ( RECOVERY AGENT ) यांचे अनेकदा उरलेली रक्कम ताबडतोब भरण्यासाठी  दादागिरीसम  , धमकीवजा दूरध्वनी यायचे . प्रत्येक वेळी ती रक्कम रुपये ४०,०००=०० त्यानंतर कधीतरी रुपये ५०,०००=०० अशी वाढीव रक्कम मागितली जायची , कारण काय म्हणे तर चक्रवाढ व्याजाने रक्कम वाढली . मी प्रत्येकाला सत्य वारंवार सांगायचो , त्यांना विनंती करायचो कि पूर्ण माहिती घ्या मग तुम्हाला कळेल कि मी काहीच पैसे देणे लागत नाही . मी तर त्यांना अनेकदा सांगितले कि एखाद्या निरपराध व्यक्तीला असा त्रास देणं योग्य नाही , मी तर अनेकदा त्यांना माझ्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला , म्हणजे त्यांच्या त्या परदेशी   अर्थपेढीचं   ( अर्थपेढी  = FOREIGN BANK ) हसू होईल कारण ते तेथे खटला ठरतील . तरीही त्यांचे वसुलीसाठी दूरध्वनी येण बंद झाले नाही . मलाच अनेकदा पैसे भरलेली माहिती घेऊन   STANDARD CHARTERED BANK च्या मुंबई कार्यालयात भेटण्यास सांगितले . त्यावर मी त्यांना सांगितले कि सगळी माहिती तर मी अनेकदा   महाजाल-डाक ( E-MAIL ) पाठवली आहे त्यामुळे जर  त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर गरज असेल तर मला माझ्या कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले . 

सन  २०१७ साली मला हृदयरोगाचा झटका आला , माझ्यावर शस्त्रक्रिया झाली , हे सुद्धा मी त्यांना सांगितले , व अनेकदा  सांगितले कि मला असे वारंवार धमकीवजा दूरध्वनी  करून त्रास देऊ नका . 
त्यानंतर मला शेवटचा   दूरध्वनी  २४ फेब्रुवारी  २०२० रोजी १७.४८ वाजता , ०२२-६८७८१७०० या क्रमांकावरून आला , त्या व्यक्तीला सुद्धा सगळा इतिहास पुन्हा  सांगितला , त्यांनी सुचविल्या प्रमाणे मी पुन्हा  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने सगळी माहिती पाठवली , त्याचा मला तक्रार क्रमांक ६९६१७७७ ता. २६.०२.२०२० मिळाला ( COMPLAINT NUMBER 6961777 dt. 26.02.2020 ) .   
त्यानंतर मला  STANDARD CHARTERED BANK यांच्या कडून बुधवार , १५ एप्रिल , २०२० , २२.११ वाजता पुन्हा  महाजाल-डाक ( E-MAIL )  ने रुपये  ४३,१७२=३७ भरण्यासाठी स्मरण पत्र आलं . 

हे सांगायचं राहिलं कि ,  STANDARD CHARTERED BANK यांनीं तोपर्यंत काही वर्षांपूर्वीच CIBIL ( Credit Information Bureau (India) Limited ) या संस्थेला कळवून माझा CIBIL SCORE वाईट केला होता / बिघडवला होता. याबाबत  देखील मी त्यांना दूरध्वनीसंभाषणात , महाजाल-डाक ( E-MAIL )  पत्रव्यव्हारात कळविले होते . 

सरतेशेवटी मला  मंगळवार , २६ मे , २०२० रोजी , १९.४४ वाजता   STANDARD CHARTERED BANK  यांच्या कडून   महाजाल-डाक ( E-MAIL )  आला , त्यात  त्यांनी खालील महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत ( तो  महाजाल-डाक ( E-MAIL ) , मी याच्या सोबत  जोडत आहे ) 

we confirm having reversed the entire balance outstanding reflecting in the above mentioned card account. 
- As on date, there is nil dues to be payable towards the same.  
- Further, we have instructed CIBIL in order to make the relevant changes in their records and the same shall be amended in the next 45 days. 
- As there is no further actionable at our end, we shall proceed to close the above mentioned complaint.  

याचाच अर्थ अंदाजे ७.२  वर्षे म्हणजेच अंदाजे २,६०० दिवस  चालू असलेल्या  एका नामांकित विदेशी अर्थपेढीच्या ( FOREIGN BANK ) च्या मनमानी विरुद्धच्या ( दादागिरी विरुद्धच्या  ) अथक लढाईत माझ्या सारख्या एका सामान्य भारतीय नागरिकाचा विजय झाला , म्हणजेच शेवटी " सत्य " जिंकले .  

तळ  टीप : मी मार्च , २०१३ पासून याबाबत केलेली    महाजाल-डाक ( E-MAIL ) लिखापढी  कोणाला पुरावा म्हणून  पाहायची असेल तर माझ्या संगणकात आहे . 


No comments:

Post a Comment