Thursday, November 7, 2019

जागतिक शहर नियोजन / नगररचना दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )


जागतिक शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY ) 

नोव्हेंबर , हा जागतिक  शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )  म्हणून साजरा केला जातो

शहर अथवा इतर शहरी भागांचे बांधकाम , वाढ आणि विकास यांचे नियोजन आणि नियंत्रण अशी  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  याची व्याख्या आहे

Maharashtra Regional and Town Planning (amendment) act 2018 असा  एक कायदा सन १९६६ पासून अस्तित्वात आहेमाझ्या ज्ञानाप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील बांधकाम , वाढ आणि विकास होताना हा कायदा लागू होत असायला हवा . पण " ठाणे " नावाच्या , मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका स्मार्ट शहरातील गेल्या अनेक वर्षातील बांधकाम पाहता " ठाणे " या SMART CITY (  SMART = हुशार , चलाख , अद्यावत ,   CITY = शहरला हा कायदा बहुतेक लागू नसावा

  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  कसं नसावं याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणजे ' ठाणे " .  जागा दिसेल तेथे बांधकामं , मैदानांचा अभाव , नियोजनबद्ध अश्या भाजीमंड्या नाहीत , वाहनतळांचा अभाव , अस्तित्वात असलेले तलाव गायब , शाळांना मैदानं नाहीत ,  . . . .  अश्या अनेक गोष्टी सांगता येतील .   असेही ऐकले आहे कि काही उंच इमारतींमध्ये निर्वासित खोली / घर ( REFUGEE FLAT ) नाहीत , आणि होते ते भिंती बांधून खोली / घर ( FLAT ) म्हणून बांधकाम व्यवसिकांनी विकले

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


#townplannnin  #thanecitytownplanning  #thanecity

No comments:

Post a Comment