Friday, November 1, 2019

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप - एक सामाजिक बांधिलकी

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप  - एक सामाजिक बांधिलकी 
३१ ऑक्टोबर , २०१९ च्या " ठाणे वैभव " या एक सुप्रसिद्ध दैनिकांमद्ये छापून आलेली बातमी येथे देत आहे .  प्रथम बातमी छापल्याबद्दल ठाणे वैभव व श्री. सुरेश सोंडकर यांचे मनःपूर्वक आभार . 
समाजातील समविचारी व्यक्ती एकत्र येऊन असे अनेक सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम करू शकतात . 
सुदैवाने ठाणे शहराला श्री. संजय केळकर साहेब यांच्या रूपात एक समाजकारणी व आदर्श आमदार लाभला आहे . त्यांचा अश्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना नेहमीच सक्रिय पाठिंबा असतो . 
या  फराळ वाटपात मला श्री. दत्ता घाडगे , सौ . मनीषा वायंगणकर , सौ. मीनल उत्तूरकर , श्री. भावेश जर्दोश , कुमार यश जर्दोश , कुमारी तनिषा शाह , सुमेध शाह , शामली दोषी  यांची मोलाची साथ लाभली . 
डॉक्टर  सौ . मृदुला भावे यांनी  फराळाची जबाबदारी तर  घेतली हाती  पण त्यांनी  सगळ्या खर्चातील थोडा भर देखील उचलला .दिवाळी फराळ वाटपादरम्यान  अनेक वाहतूक पोलिसांनी वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील  मुखवटा ( MASK ) ची मागणी केली .  भविष्यात ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांना  वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील  मुखवटा ( MASK ) देण्याची योजना आहे . 
आपल्याला देखील आपल्या परीने अश्या प्रकारच्या इतर अनेक सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सामील व्हायचे असेल तर माझ्याशी ९८२११५०८५८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . 
http://fightofacommonman.blogspot.com/  


No comments:

Post a Comment