Thursday, November 28, 2019

अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन


अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन 

'अग्रलेखांचा बादशहा' अशी ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर हे २२ नोव्हेंबर , २०१९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले . " नवाकाळ " मधील त्यांच्या अतिशय रोखठोक अश्या लिखाणाने अनेक दशके सातत्याने अन्यायाविरुद्ध वाचा फोडली होती .अशा  या दुःखद क्षणी मी आज , गुरुवार , २८.११.२०१९ रोजी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे - संपादक , " नवाकाळ " यांना भेटण्यासाठी " नवाकाळच्या गिरगांव येथी कार्यालयात गेलो होतो . कार्यालयातील ज्या खोलीत नीळकंठ जी खाडिलकर बसायचे , त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला मिळाले . त्यांची खुर्ची  इतर सामान तसेच जतन  करून ठेवले आहे . खुर्चीच्या वर मराठी साहित्यकार, नाट्याचार्य, पत्रकार " नवाकाळ " हे वृत्तपत्र मार्च , १९२३ साली ज्यांनी चालू केलं ते कृष्णजी प्रभाकर खाडिलकरकाका साहेब खाडिलकर म्हणून  ते प्रसिद्ध होते ) त्यांचे छायाचित्र आहे . त्या खोलीचं छायाचित्र मी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांच्या परवानगीने टिपलं .   

 त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला   नीळकंठ जी  खाडिलकर यांच्या हयातीत नाही मिळालं याची एक खंत मनात लागून राहिली आहे

नीळकंठ जी  खाडिलकर यांची एक आठवण येथे सांगावीशी वाटते ,   दिनांक : २६ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " मध्ये माझी  " फुकट  " या शीर्षकाची एक कविता छापून आली होती . त्या दिवशी सकाळी अंदाजे ११.१५ च्या आसपास माझा  भ्रमणध्वनी खणखणला . ओळखीच्या क्रमांकावरून तो संपर्क साधण्यात आला  नव्हता . मी हॅलो म्हटलं , समोरून धीरगंभीर आवाजात विचारणा झाली सत्यजित शाह का ? मी हो म्हटल्यावर त्यांनी सांगितलं कि " मी नीलकंठ खाडिलकर बोलतोय " तुमची आज छापून आलेली " फुकट " कविता वाचली . चांगली आहे . हे ऐकून मला  " स्वर्ग दोन बोटं उरला " या उक्तीचा अर्थ कळला होता . मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली , त्यांनी मला रविवार सोडून कोणत्याही दिवशी सकाळी ११ नंतर दुपारी १२ का च्या आत येण्यास सांगितलंसंभाषणाच्या शेवटी , मी त्यांना म्हटलं कि त्या   " फुकट  " कवितेत खालील ओळी  देखील टाकव्याश्या वाटल्या होत्या , पण नाही टाकल्या

दे दे रे दे दे 
     सासरे बुवा दे दे 
बायको बरोबर 
      मेहुणी हि फुकट दे     

माझे ऐकून  त्यांनी स्मितहास्य केल्यासारखं मला वाटलं , पण ते म्हणाले कि कल्पना ठीक आहे , पण त्या ओळी  तुम्ही नाही टाकल्या हे चांगलं केलं

त्यांचे भेट घेण्याचं सुख मला नव्हतं , पण त्यांच्याशी अश्या प्रकारे भ्रमणध्वनीवर संवाद मात्र झाला होता

मला आज निघतांना जयश्री ताईंनी ,   नीळकंठ जी  खाडिलकर यांची छायाचित्रातील ग्रंथसंपदा नीळकंठ जी  खाडिलकर यांची आठवण म्हणून दिली

अग्रलेखांचा बादशाह नीळकंठ जी  खाडिलकर  यांना  माझा मानाचा  मुजरा





No comments:

Post a Comment