एक मुख्यमंत्री अन दोन उपमुख्यमंत्री ( भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र )
माझं ४ नोव्हेंबर , २०१९ च खालील व्यंगचित्र बहुतेक खरं ठरणार असं वाटतंय . एक मतदार म्हणून जे होतंय ते पाहणं हाती उरलं आहे .
सध्या मलबार हिल , मुंबई येथे
" वर्षा " नावाचा एक बंगला आहे जेथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे .
पण सध्याचे युतीचे जुळवाजुळवीचे राजकारण , व सद्य राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात मलबार हिल , मुंबई येथे खालील तीन बंगले कायमस्वरूपी असतील बहुतेक आणखी २ / ३ उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासाठी मोकळी जमीन देखील सोडण्यात येईल .
१. ) " वर्षा
" - मा. मुख्यमंत्री
२. ) " मेघ " ( १ ) - मा .उपमुख्यमंत्री ( १ )
३. ) " मेघ " ( २ ) - मा .उपमुख्यमंत्री ( २ )
२. ) " मेघ " ( १ ) - मा .उपमुख्यमंत्री ( १ )
३. ) " मेघ " ( २ ) - मा .उपमुख्यमंत्री ( २ )
"वर्षा" व "मेघ" यांचं नातं सांगण्याची गरज नाही . नवीन बंगल्यांची नावे " मेघ " ( १ ) व " मेघ " ( २ ) अशी का ठेवली आहेत हे कळलेच असेल .
मी हाडाचा व्यंगचित्रकार नाही , पण एक उपरोधिक व्यंगचित्र रेखाटण्याचे धाडस केले आहे .खरं तर व्यंगचित्र एवढं स्पष्ट करून सांगू नये , पण मी नवव्यंगचित्रकार असल्याने हा एक प्रयत्न .
काही चुका असतील तर माफी असावी .
तळ टीप : " वर्षा " बंगल्यातील तारण तलाव दाखविण्याचा प्रयत्न केला आहे .
No comments:
Post a Comment