Monday, November 4, 2019

भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र


भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र

सध्या मलबार हिल , मुंबई येथे " वर्षा " नावाचा एक बंगला  आहे जेथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे . 

पण सध्याचे युतीचे जुळवाजुळवीचे राजकारण , व सद्य राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात  मलबार हिल , मुंबई येथे खालील तीन बंगले कायमसाठी असतील . 

१. ) " वर्षा " - मा. मुख्यमंत्री 
२. ) " मेघ " ( १ ) - मा .उपमुख्यमंत्री ( १ )
३. ) " मेघ " ( २ ) - मा .उपमुख्यमंत्री ( २ )

"वर्षा" व "मेघ" यांचं नातं सांगण्याची गरज नाही .  नवीन बंगल्यांची नावे  " मेघ " ( १ ) व  " मेघ " ( २ ) अशी का ठेवली आहेत हे कळलेच असेल  . 

मी हाडाचा व्यंगचित्रकार नाही , पण एक उपरोधिक व्यंगचित्र रेखाटण्याचे  धाडस केले आहे .खरं तर व्यंगचित्र एवढं स्पष्ट करून सांगू नये , पण मी नवा व्यंगचित्रकार असल्याने हा एक प्रयत्न . 

काही चुका असतील तर माफी असावी .   



No comments:

Post a Comment