Saturday, November 30, 2019

आजची ठळक बातमी ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत BREAKING NEWS )

आजची ठळक बातमी ( आजच्या शुद्ध प्रचलित मराठीत BREAKING NEWS ) 
विरार रेल्वे स्थानकात भटक्या कुत्र्यांचे १२ प्रवाशांना चावे 
लोकसत्ता - ता. ३० नोव्हेंबर , २०१९ 
पहा भटके कुत्रे कसे मानवांचे लचके तोडताहेत
अशा वेळी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना कधीच मानव प्राण्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचे वाचनात नाही , ऐकिवात नाही , कारण . . . . . . . 
मानव प्राणी मरो
पण भटकी कुत्री जगो 
काही दिवसांनी भारत या देशातील  श्वान दंश झालेला मानव प्राणी शोधून काढावा लागेल
जन्मलेल्या बाळाला रॅबीस होऊन नये म्हणून एक लस द्यावी लागेल अशी काहीशी दुर्दैवी परिस्थिती येण्याची शक्यता आहे
#straydogmenace  


Thursday, November 28, 2019

अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन


अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन 

'अग्रलेखांचा बादशहा' अशी ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर हे २२ नोव्हेंबर , २०१९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले . " नवाकाळ " मधील त्यांच्या अतिशय रोखठोक अश्या लिखाणाने अनेक दशके सातत्याने अन्यायाविरुद्ध वाचा फोडली होती .अशा  या दुःखद क्षणी मी आज , गुरुवार , २८.११.२०१९ रोजी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे - संपादक , " नवाकाळ " यांना भेटण्यासाठी " नवाकाळच्या गिरगांव येथी कार्यालयात गेलो होतो . कार्यालयातील ज्या खोलीत नीळकंठ जी खाडिलकर बसायचे , त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला मिळाले . त्यांची खुर्ची  इतर सामान तसेच जतन  करून ठेवले आहे . खुर्चीच्या वर मराठी साहित्यकार, नाट्याचार्य, पत्रकार " नवाकाळ " हे वृत्तपत्र मार्च , १९२३ साली ज्यांनी चालू केलं ते कृष्णजी प्रभाकर खाडिलकरकाका साहेब खाडिलकर म्हणून  ते प्रसिद्ध होते ) त्यांचे छायाचित्र आहे . त्या खोलीचं छायाचित्र मी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांच्या परवानगीने टिपलं .   

 त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला   नीळकंठ जी  खाडिलकर यांच्या हयातीत नाही मिळालं याची एक खंत मनात लागून राहिली आहे

नीळकंठ जी  खाडिलकर यांची एक आठवण येथे सांगावीशी वाटते ,   दिनांक : २६ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " मध्ये माझी  " फुकट  " या शीर्षकाची एक कविता छापून आली होती . त्या दिवशी सकाळी अंदाजे ११.१५ च्या आसपास माझा  भ्रमणध्वनी खणखणला . ओळखीच्या क्रमांकावरून तो संपर्क साधण्यात आला  नव्हता . मी हॅलो म्हटलं , समोरून धीरगंभीर आवाजात विचारणा झाली सत्यजित शाह का ? मी हो म्हटल्यावर त्यांनी सांगितलं कि " मी नीलकंठ खाडिलकर बोलतोय " तुमची आज छापून आलेली " फुकट " कविता वाचली . चांगली आहे . हे ऐकून मला  " स्वर्ग दोन बोटं उरला " या उक्तीचा अर्थ कळला होता . मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली , त्यांनी मला रविवार सोडून कोणत्याही दिवशी सकाळी ११ नंतर दुपारी १२ का च्या आत येण्यास सांगितलंसंभाषणाच्या शेवटी , मी त्यांना म्हटलं कि त्या   " फुकट  " कवितेत खालील ओळी  देखील टाकव्याश्या वाटल्या होत्या , पण नाही टाकल्या

दे दे रे दे दे 
     सासरे बुवा दे दे 
बायको बरोबर 
      मेहुणी हि फुकट दे     

माझे ऐकून  त्यांनी स्मितहास्य केल्यासारखं मला वाटलं , पण ते म्हणाले कि कल्पना ठीक आहे , पण त्या ओळी  तुम्ही नाही टाकल्या हे चांगलं केलं

त्यांचे भेट घेण्याचं सुख मला नव्हतं , पण त्यांच्याशी अश्या प्रकारे भ्रमणध्वनीवर संवाद मात्र झाला होता

मला आज निघतांना जयश्री ताईंनी ,   नीळकंठ जी  खाडिलकर यांची छायाचित्रातील ग्रंथसंपदा नीळकंठ जी  खाडिलकर यांची आठवण म्हणून दिली

अग्रलेखांचा बादशाह नीळकंठ जी  खाडिलकर  यांना  माझा मानाचा  मुजरा