Tuesday, August 27, 2019

ठाणे - भटक्या कुत्र्यांचे शहर

ठाणे - भटक्या कुत्र्यांचे शहर
कोणे एके काळी म्हणे " ठाणे हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते असे म्हणतात. आजचे ठाणे पाहून तर ती एक बहुतेक अफवा असेल असेच वाटते कारण तलाव शोधावे लागतात .
असो , पण सध्या " ठाणे - भटक्या कुत्र्यांचे शहर " आहे असे मात्र मी ठाम पणे म्हणू शकतो . पहावे तेथे भटके कुत्रे आरामात विहार करीत असतात . नुसते भटके कुत्रे नाहीत तर त्यांच्या टोळ्याच हैदोस घालीत शहरभर फिरत असतात .
दुर्दैव एवढं आहे कि , दररोज अंदाजे ८० ते १०० ठाणेकरांना श्वानदंश होऊन देखील ठाणेकर नागरिक गप्प आहे . त्यामुळेच ठाणे पा देखील चुप्प आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष देखील या प्रश्नावर मूग गिळून आहे.
" मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो."
२७ ऑगस्ट , २०१९ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्रातील CITIZEN
REPORTER मध्ये छापून आलेली माझी कैफियत देत आहे.



Tuesday, August 20, 2019

मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी

मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी

मराठी वाचवा , मराठी जगवा . ‌‌‌‌.
मराठी माणसानो , इंग्रजी शब्दांच्या कुबड्या न घेता , मराठीत संभाषण करा .



अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले.

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: August 18, 2019 02:31 AM | Updated: August 18, 2019 02:31 AM
- नितीन नायगावकर
नवी दिल्ली : मराठी, तामिळ, बंगाली यांना प्रादेशिक भाषा म्हणणे योग्य नाही. त्या राष्ट्रीय भाषाच आहेत. मराठीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, धारवाड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातही ती बोलली जाते. त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्व प्रादेशिक भाषा राष्ट्रीय भाषाच आहेत, असे स्पष्ट मत प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत व्यक्त केले. व्यवस्थेकडून विविध स्तरांवर प्रादेशिक भाषांची गळचेपी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत, प्रादेशिक भाषा, अनुवाद आदी विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रादेशिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का?
अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले. यातील काही फारच कमी बोलल्या जातात तर काही कोट्यवधी लोक बोलतात. दुसऱ्या भारतीय भाषांमध्ये हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम केले आहे. सध्याचा सत्ताधारी पक्ष एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा यावर विश्वास ठेवतो; पण मुळात हे युरोपीय राष्ट्रांचे धोरण आहे. त्यांची नक्कल करण्याचा हा प्रयत्न आहे.
हिंदी सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे हे धोरण असेल का?
हिंदीभाषिक प्रदेश सर्वांत हिंसक, धर्मांध, कायद्यांची मोडतोड करणारा आहे, असा निष्कर्ष त्या प्रदेशांमधील गेल्या काही वर्षांचा राजकीय व्यवहार बघून काढता येतो. हिंदी ही जातीयवाद, हिंसा, हत्या, बलात्काराची भाषा आहे, हा निष्कर्ष काही प्रमाणात सत्यही आहे; पण हिंदी साहित्यात त्याचे समर्थन मिळणार नाही. आपल्या देशातील राजकारणाचे खूपच बाजारीकरण झाले आहे; पण त्यात आंतर्विरोधही आहे. प्रचार, प्रसार आणि मते मागण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना बहुभाषिकतेचा अभिमान वाटतो आणि नंतर याच प्रादेशिक भाषांचे महत्त्व ते नाकारतात. हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम करताना आपली दुसरी बाजूही सांभाळून ठेवली आहे.
अनुवादाला हवी तशी प्रतिष्ठा मिळतेय का?
पश्चिमेत अनुवादाला जी प्रतिष्ठा मिळाली, ती भारतीय भाषांमध्ये मिळाली नाही. मात्र, भारतीय भाषांमध्ये आपसात अनुवादाचे काम वाढले आहे. मल्याळम, मराठी, हिंदी या इतर भाषांचे आतिथ्य करणाºया आहेत. यात दुसºया भाषांचे अनेक अनुवाद झाले. मात्र, बंगाली ही सर्वांत कमी आतिथ्यशील भाषा आहे. बंगालीत इतरांचे अनुवाद फारच कमी होतात. गुजरातीमध्ये बंगाली भाषेतून खूप अनुवाद झाले; पण गुजरातीचे बंगालीत कमी आहेत. हिंदीमध्ये तर बंगाली साहित्याचा अनुवाद मोठ्या प्रमाणात झाला. टागोर, महाश्वेतादेवी यांच्यासारखी कितीतरी नावे सांगता येतील. हिंदीत आतिथ्य आहे; पण उणीवही आहे. हिंदीभाषिक लोक दुसरी भारतीय भाषा फार कमी शिकतात. विशेषत: इतर भाषिक लोकच हिंदी शिकून त्याचा अनुवाद करतात.

संस्कृतचा योग्य वापर होतोय का?
संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा आहेत. त्यांचे ज्ञान असलेले खूप कमी लोक भारतात आहेत. या भाषांच्या बाबतीत विद्वत्तेच्या अभावाचे मोठे संकट आहे. या भाषांचे सर्वांत विश्वसनीय स्रोत हळूहळू कमी होत आहेत; पण विदेशात जास्त प्रमाणात आहेत. मात्र, आधुनिक राष्ट्रीय भाषांचे महत्त्व कमी करून त्यांचे महत्त्व वाढविणे योग्य नाही. संस्कृतला स्तुती, अंधभक्ती, चापलुसीची भाषा बनविले जात आहे. ते अज्ञानी आहेत किंवा संस्कृतमधील निर्भयतेचे स्वीकार करू इच्छित नाहीत. संस्कृतमध्ये जेवढी निर्भयता, जिज्ञासा, ज्ञानाच्या विविधतेचा स्वीकार आहे तो अनेक भाषांमध्ये नाही. वेद वैदिक संस्कृतमध्ये लिहिण्यात आले. संस्कृतची बौद्धिक परंपरा ही शास्त्रार्थाची होती. नवा विचार मांडण्यासाठी तुम्हाला इतिहास सांगावा लागतो. त्यानंतरच नवी विचारसरणी आणावी लागते. तिला चरणस्पर्शी भाषा करणे हा अन्याय आहे.
Marathi is not a regional but a national language - Ashok Vajpayee | मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी


Saturday, August 17, 2019

लोकलची चौथी सीट

" लोकलची चौथी सीट "
" नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकाच्या १८ ऑगस्ट, २०१८ च्या अंकात मी स्वतः लिहिलेली ( कोणाची चोरून स्वतःच्या नावावर न खपवलेली ) कविता छापून आली आहे.
या कवितेतील अनुभव फक्त , आणि फक्त लोकल ने प्रवास करणाऱ्या असंख्य मुंबईकरांनाच येतो.
हे चौथे आसन म्हणजेच हि " लोकलची चौथी सीट " पटकावणे हा एक तसा धाडशी खेळच आहे.
काहींना हा प्रश्न पडेल कि मी " सीट " हा एक इंग्रजी शब्द का वापरला आहे ? त्याच मुख्य कारण असं आहे कि , लोकल प्रवाश्यांमध्ये चौथी सीट हाच शब्द प्रचलित आहे . त्यामुळे जर मी त्या ऐवजी चौथे आसन हा शुद्ध मराठी शब्द वापरला असता तर तो बहुसंख्य मराठी वाचकांना कळाला नसता 


Sunday, August 4, 2019

माननीय , आदरणीय आयुक्त साहेब , डेंग्यू , ताप , इतर रोगांच्या साथींपासून आम्हा ठाणेकर नागरिकांना वाचवा

Satyajit Shah satyajitshah64@gmail.com

Sat, Aug 3, 3:03 PM (22 hours ago)
to mcadmcadmc2mhoChiefchiefministerCMOSwadheensanjay, bcc: me, bcc: satyajit
३ ऑगस्ट , २०१९ 

प्रति ,
माननीय आयुक्त , 
ठाणे महानगर पालिका , 
ठाणे , महाराष्ट्र राज्य , भारत

विषय : माननीय , आदरणीय आयुक्त साहेब , डेंग्यू  , ताप , इतर रोगांच्या  साथींपासून आम्हा ठाणेकर नागरिकांना वाचवा
 
नमस्कार ,
माझ्या पत्नीला ( सौ. गीता शाह ) यांना , गेले ३ / ४ दिवस ताप येत होता . आज रक्ताची चाचणी केल्यावर " डेंग्यू " या एका भयंकर रोगाचे निदान झाले आहे . औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे गेलो असता असे कळले कि ठाणे शहरातील अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत . त्यातील किती रुग्णांना  " डेंग्यू " या एका भयंकर रोगाची लागण झाली असले याची ठोस माहिती प्रशासनाकडे नसणार . त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य माहित देखील नसेल . 

जेव्हा स्वकीयांना " डेंग्यू " या आजाराचे निदान होते , ज्या प्रमाणे या रुग्णाचे प्लेटलेट कमी होतात , रुग्णाला जो त्रास होतो , ते सगळं रुग्ण व त्याच्या स्वकीयांनाच भोगावं लागतं . 

या ई - मेल द्वारे , मी  नियमितपणे शासनाचे सर्व कर भरणारा एक ठाणेकर नागरिक म्हणून व बाकी इतर ठाणेकरांच्या वतीने  आपणाला एक नम्रपणे  विनंती करतो कि या प्रश्नात तातडीने लक्ष्य घालावे व " डेंग्यू " या एका भयंकर रोगापासून , ताप , व इतर रोगांच्या साथींपासून आम्हा ठाणेकर नागरिकांना वाचवावे . 

आपला कृपाभिलाषी ,
सत्यजीत  शाह - ठाणे
ए २ / १३०१ , हाईड पार्क रिजेन्सी को.  ऑ.  हा.  सो. , 
तत्वज्ञान विद्यापीठाच्या मागे , घोडबंदर रोड , 
ठाणे पश्चिम , ४०० ६१०  
०९८२११५०८५८
 मेल : satyajitshah64@gmail.com
ब्लॉग : http://fightofacommonman.blogspot.in/

प्रत ( C.C. )  :   माननीय श्रीसंजय जी  केळकर साहेब  - आमदार - ठाणे शहर यांना

Saturday, August 3, 2019

" जय जय भटके कुत्रे " - एक कविता


जय जय भटके कुत्रे  " - एक कविता


जय जय भटके कुत्रे
मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे  

बालकांना चावो भटके कुत्रे 
आजी , आजोबांना चावो भटके कुत्रे 
आई , बाबांना चावो भटके कुत्रे 
ताई , माई , अक्काला  चावो भटके कुत्रे   \\ \\ 

दादा , मामा , काकाला  चावो भटके कुत्रे   
प्रभात फेरी करणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 
दूध , वृत्तपत्रे वाटणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 
पोस्टमन , पोलिसांना , पत्रकारांना चावो भटके कुत्रे \\ \\ 

दुचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 
चारचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 
रेल्वे स्थानकांवर फिरो  भटके कुत्रे 
विमान धावपट्टीवर फिरो भटके कुत्रे \\ \\ 

विमान तळा वर फिरो भटके कुत्रे   
राज्यसभा आवारात  फिरो भटके कुत्रे 
ठाणे मनपा मध्ये फिरो भटके कुत्रे 
शाळे मध्ये फिरो भटके कुत्रे \\ \\ 

शासनाला दिसत नाहीत हे भटके कुत्रे 
प्राणी मित्रांचे लाडके हे भटके कुत्रे 

जय जय भटके कुत्रे
मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे

कवी : सत्यगीत ( सत्यजित शाह - ठाणे














माढ्यात भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर


" माढ्यात भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर "

"
माढा " , कुर्डुवाडी मोहोळ मधील एक गाव , जेथून आदरणीय , वंदनीय , पूजनीय , माननीय श्री. शरदचंद्र पवार साहेब खासदार झाले होते , त्या गावातील सद्य परिस्थिती या बातमीवरून कळून येते .
माझा जन्म माढ्याचा , माझं आजोळ माढा , शालेय जीवनात उन्हाळ्याच्या प्रत्येक सुट्टीत तेथे जायचो , अजूनही तेथे माझे तीन मामे भाऊ राहतात . त्या माढ्याचे हे हाल पाहून अतिशय दुःख होतंय.
या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढीविरुद्ध श्वानदंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ते १० वर्षे एकलकोंडा लढत आहे . दुर्दैवाने भारतीय नागरिक मात्र मुकाट्याने हे सगळं सहन करतेय .
मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो हि या भारत देशाची आजची स्थिती आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

http://fightofacommonman.blogspot.in/