अवजड वाहनांचा पुणे - मुंबई व मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर (
EXPRESS WAY ) सर्रास नियमभंग
११ नोव्हेंबर , २०१८ , पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर खोपोली पथकर नाक्याच्या अलीकडे अंदाजे ८.०० / ८.१५ वाजण्याच्या सुमारास हि " चिंतामणी " या वाहतूक आस्थापनेची प्रवासी बस ( वाहन क्रमांक MH-29-AT-7200
) या छायाचित्रात पहिल्या मार्गिकेतून अंदाजे ताशी १०० किलोमीटर या वेगाने चालवीत होता. मध्येच त्या बस चा वाहन चालक पहिल्या मार्गिकेतून दुसऱ्या , तिसऱ्या मार्गिकेत जात होता . पुन्हा तिसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत येत होता. हे तो वाहन चालक अश्या पद्धतीने मार्गिका बदलायचा कि जणू तो द्रुतगती महामार्ग हा त्याच्या आस्थापनेच्या खाजगी मालिकेचा आहे.
फक्त तोच वाहन चालक पहिल्या मार्गिकेतून ( जी मार्गिका छोट्या वाहनांसाठी ( CAR ) असते ) जात नव्हता तर शिवशाही , शिवनेरी , या एस टी महामंडळांच्या बस , इतर अनेक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस , अनेक ट्रक व इतर अवजड वाहने देखील हा नियम भंग करताना आढळल्या .
"
रस्ते अपघातांचा आलेख वाढला १० महिन्यात १०,६७२ जणांचा मृत्यू " या मथळ्याची एक बातमी आजच्या " नवाकाळ " या एका मराठी सुप्रसिद्ध दैनिकात वाचली , हि बातमी वाचून हा अपघातांचा आलेख का वाढला याचे उत्तर मिळाले .
पुणे - मुंबई व मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर नेहमीच का अपघात होतात याचे कारण देखील समजले . अनेक अपघात इतरांच्या मूर्खपणामुळेच होत असतात.
या विषयीची तक्रार मी योग्य त्या शासकीय खात्यांकडे करणार आहे.
No comments:
Post a Comment