Sunday, November 11, 2018

श्वान दंशाची दहशत

" श्वान दंशाची दहशत " 

११ नोव्हेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी दैनिकामध्ये आलेली बातमीवजा माहिती . 

मी गेले अंदाजे ९ ते १० वर्षे श्वान दंशाच्या वेगाने वाढणाऱ्या घटना , व भटक्या कुत्र्यांची भयावह वेगाने वाढणारी संख्या याविरुद्ध लढत आहे. 

जेव्हा मी हि लढाई सुरु केली होती , तेंव्हा प्रसार माध्यमे ( वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या ) या प्रश्नावर आवाज उठवायला फारसे उत्सुक नव्हते . पण सध्या प्रत्येक प्रकारची प्रसार माध्यमे या गहाण प्रश्नावर वारंवार आवाज उठवत आहेत.  त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 

एकच दुःख  सलतंय ते  म्हणजे , " भारत "  या देशातील  ९९.९० %  नागरिकांना मात्र या गहन  प्रश्नावर लढायची अजिबात ईच्छाच नाही . बहुतेक बहुसंख्य भारतीय " श्वान दंश " हा एखादा प्रसाद असल्याप्रमाणे श्वान दंश झाल्यावर भक्तिभावाने खर्चिक औषधोपचार करून घेतात . 


No comments:

Post a Comment