वाहन क्रमांक पाटीविना रस्त्यावर धावतेय अनधिकृत पणे वाहतूक करणारी प्रवासी बस
गेली अनेक वर्षे मी वाहतुकीच्या अनेक प्रश्नांवर गल्ली ते दिल्ली एकट्यानेच लढत आहे .
ठाणे या स्मार्ट सिटी मधील अनधिकृत प्रवासी बस वाहतूक सेवा हि तर कु-प्रसिद्ध आहेच. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड वरील तत्वज्ञान विद्यापीठासमोर , मानपाडा दिशेला जाणाऱ्या या एका अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या मागे व वाहन चालकाच्या बाजूच्या म्हणजे बस च्या लांबीच्या दिशेने मागील बाजूस देखील वाहन क्रमांक लिहिलेला नव्हता . पुढील बाजूस MH04GP1484 असा वाहन क्रमांक लिहिला होता. ती बस जागो जागी थांबून , वाहतुकीस अडथळा निर्माण करून प्रवासी उतरवत होती , व नवीन प्रवासी घेत होती.
हे दोन्ही दर्शविणारी छायाचित्रे ( पुराव्यादाखल ) या ई मेल सोबत जोडलेली आहेत . हि छायाचित्रे रविवार , ११ नोव्हेंबर , २०१८ रोजी सकाळी अंदाजे १०.०० च्या आस पास टिपली आहेत .
हे जे काहीआहे ते सगळं नियमबाह्य आहे .
एक सामान्य , जागरूक नागरिक म्हणून मी हे सगळं पुराव्यासकट पाठविण्याचे माझे कर्तव्य केले आहे . .
आश्चर्य म्हणजे हे सगळं पोलीस, वाहतूक पोलीस , परिवहन अधिकारी ( RTO ) यांना कसे दिसत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment