Saturday, November 24, 2018

भटक्या कुत्र्यामुळे मानव प्राण्याचा असा एक दुर्दैवी मृत्यू .

भटक्या कुत्र्यामुळे मानव प्राण्याचा असा एक दुर्दैवी मृत्यू . 

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील १९ नोव्हेंबर , २०१८ च्या एका मराठी वृत्तपत्रात छापून आलेली हि हृदयद्रावक बातमी . 

त्या मृत व्यक्तींच्या  घरच्यांना कोण नुकसान भरपाई देणार ? 

कोठे गेली प्राणी मित्र ? 
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

विसरू नकात ,

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


भय गुंडांचे नव्हे , मोकाट कुत्र्यांचे

"भय गुंडांचे नव्हे , मोकाट कुत्र्यांचे " 

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील १९ नोव्हेंबर , २०१८ च्या एका मराठी वृत्तपत्रात छापून आलेला हा डोळे उघडणारा लेख . 

गंमत म्हणजे गेली अंदाजे ८ ते १० वर्षे , मी स्वतः , डोंबिवली येथील डॉक्टर आनंद हर्डीकर , ठाणे येथील डॉक्टर उदय कुलकर्णी अशी काही मोजकी माणसेच या भटक्या कुत्र्यांच्या महावेगाने वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध व श्वान दंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध गल्ली ते दिल्ली लढत आहोत . सुदैवाने आत्ता या गहन  प्रश्नांची जाणीव आम्ही सोडून इतर काही व्यक्तींना होत आहे याचे समाधान वाटत आहे. 

दुर्दैवाने भारत या देशात 

" मानव प्राणी मारो , पण भटका कुत्रा जगो " अशी काहीशी विचित्र परिस्थिती आहे. 

विसरू नकात ,

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 



Thursday, November 22, 2018

पुण्यासाठी वाहतुकीचा वेगळा कायदा ?

" पुणे "   या महाराष्ट्र राज्यातील , भारत देशातील एका शहरासाठी वाहतुकीचा वेगळा कायदा ? 
२३ नोव्हेंबर , २०१८  च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकातील " बहुतांची अंतरे " या सदरात संक्षेपित स्वरूपात छापून आलेले हे माझे मत . 
शिरस्त्राण  घालणे - MVA १२९/१७७
माझ्या माहितीप्रमाणे
MVA १२९/१७७ प्रमाणे भारतीय नागरिकाने दुचाकी चालविताना शिरस्त्राण  घालणे हा एक दंडनीय अपराध आहे . 
यातील MVA म्हणजे MOTOR VEHICLE ACT - जो सर्व भारतीय नागरिकांना सम समान लागू आहे .
पण सध्या महाराष्ट्र राज्यातील एका शहरात जे चालले आहे त्याप्रमाणे भविष्यात खालील प्रमाणे कायदा अस्तित्वात येऊ शकतो .
P - MVA १२९/१७७ प्रमाणे पुणेकराने दुचाकी चालविताना शिरस्त्राण घालणे हा एक दंडनीय अपराध आहे . 
यातील P - MVA म्हणजे POONA MOTOR VEHICLE ACT - जो फक्त आणि फक्त पुणे येथील नागरिकांनाच सम समान लागू आहे .
हे असेच चालू राहिले तर प्रत्येक गावाचा , शहराचा वेग वेगळा कायदा बनवावा लागेल .
म्हणा " मेरा भारत महान " जेथे कायदे भासतात लहान


Wednesday, November 21, 2018

P - MVA १२९/१७७ - POONA MOTOR VEHICLE ACT

शिरस्त्राण न घालणे -  MVA १२९/१७७

माझ्या माहितीप्रमाणे  

MVA १२९/१७७  प्रमाणे भारतीय  नागरिकाने दुचाकी चालविताना शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय अपराध आहे .  
यातील MVA  म्हणजे  MOTOR VEHICLE ACT  - जो सर्व भारतीय नागरिकांना सम समान लागू आहे . 

पण सध्या महाराष्ट्र राज्यातील एका शहरात जे चालले आहे त्याप्रमाणे भविष्यात खालील प्रमाणे  कायदा अस्तित्वात येऊ शकतो . 

P - MVA १२९/१७७  प्रमाणे भरती नागरिकाने दुचाकी चालविताना शिरस्त्राण  घालणे हा एक दंडनीय अपराध आहे . 
यातील P - MVA   म्हणजे  POONA  MOTOR VEHICLE ACT  - जो फक्त आणि फक्त पुणे येथील नागरिकांनाच सम समान लागू आहे . 

हे असेच चालू राहिले तर  प्रत्येक गावाचा , शहराचा वेग वेगळा कायदा बनवावा लागेल . 

म्हणा " मेरा भारत महान " जेथे कायदे भासतात लहान 

Monday, November 12, 2018

वाहन क्रमांक पाटीविना रस्त्यावर धावतेय अनधिकृत पणे वाहतूक करणारी प्रवासी बस


वाहन क्रमांक पाटीविना रस्त्यावर धावतेय अनधिकृत पणे वाहतूक करणारी प्रवासी बस
गेली अनेक वर्षे मी वाहतुकीच्या अनेक प्रश्नांवर गल्ली ते दिल्ली एकट्यानेच लढत आहे .
ठाणे या स्मार्ट सिटी मधील अनधिकृत प्रवासी बस वाहतूक सेवा हि तर कु-प्रसिद्ध आहेच. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड वरील तत्वज्ञान विद्यापीठासमोर , मानपाडा दिशेला जाणाऱ्या या एका अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या मागे वाहन चालकाच्या बाजूच्या म्हणजे बस च्या लांबीच्या दिशेने मागील बाजूस देखील वाहन क्रमांक लिहिलेला नव्हता . पुढील बाजूस MH04GP1484 असा वाहन क्रमांक लिहिला होता. ती बस जागो जागी थांबून , वाहतुकीस अडथळा निर्माण करून प्रवासी उतरवत होती , नवीन प्रवासी घेत होती.
हे दोन्ही दर्शविणारी छायाचित्रे ( पुराव्यादाखल ) या मेल सोबत जोडलेली आहेत . हि छायाचित्रे रविवार , ११ नोव्हेंबर , २०१८ रोजी सकाळी अंदाजे १०.०० च्या आस पास टिपली आहेत .
हे जे काहीआहे ते सगळं नियमबाह्य आहे .
एक सामान्य , जागरूक नागरिक म्हणून मी हे सगळं पुराव्यासकट पाठविण्याचे माझे कर्तव्य केले आहे . .
आश्चर्य म्हणजे हे सगळं पोलीस, वाहतूक पोलीस , परिवहन अधिकारी ( RTO ) यांना कसे दिसत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !





Sunday, November 11, 2018

अवजड वाहनांचा पुणे - मुंबई व मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर ( EXPRESS WAY ) सर्रास नियमभंग


अवजड वाहनांचा पुणे - मुंबई मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर ( EXPRESS WAY ) सर्रास नियमभंग 

११ नोव्हेंबर , २०१८ , पुणे - मुंबई  द्रुतगती महामार्गावर खोपोली पथकर नाक्याच्या अलीकडे अंदाजे .००  / .१५ वाजण्याच्या सुमारास हि " चिंतामणी " या वाहतूक आस्थापनेची प्रवासी बस ( वाहन क्रमांक  MH-29-AT-7200 )  या छायाचित्रात पहिल्या मार्गिकेतून अंदाजे  ताशी १०० किलोमीटर या वेगाने चालवीत होता. मध्येच त्या बस चा वाहन चालक पहिल्या मार्गिकेतून दुसऱ्या , तिसऱ्या मार्गिकेत जात होता . पुन्हा तिसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत येत होता. हे तो वाहन चालक अश्या पद्धतीने मार्गिका बदलायचा कि जणू  तो द्रुतगती महामार्ग हा त्याच्या आस्थापनेच्या खाजगी मालिकेचा आहे. 

फक्त तोच वाहन चालक पहिल्या मार्गिकेतून ( जी मार्गिका छोट्या वाहनांसाठी ( CAR ) असते ) जात नव्हता तर शिवशाही , शिवनेरी , या एस टी महामंडळांच्या बस , इतर अनेक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस , अनेक ट्रक इतर अवजड वाहने देखील हा नियम भंग करताना आढळल्या . 

" रस्ते अपघातांचा आलेख वाढला १० महिन्यात १०,६७२ जणांचा मृत्यू " या मथळ्याची एक बातमी आजच्या " नवाकाळ " या एका मराठी सुप्रसिद्ध दैनिकात वाचली , हि बातमी वाचून हा अपघातांचा आलेख का वाढला याचे उत्तर मिळाले . 

पुणे - मुंबई मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर नेहमीच का अपघात होतात याचे कारण देखील समजले . अनेक अपघात इतरांच्या मूर्खपणामुळेच होत असतात. 

या विषयीची तक्रार मी योग्य त्या शासकीय खात्यांकडे करणार आहे.