Sunday, October 21, 2018

वाढती श्वान दहशत

" वाढती श्वान दहशत " 

२२ ऑक्टोबर, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्राने हा वाढत्या श्वान दहशतीवर घेतलेला सखोल आढावा . या आढाव्याबद्दल मी " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्राचे शतशः आभारी आहे . 

भटक्या कत्र्यांच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध त्याचप्रमाणे श्वान दंशाच्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गेली अंदाजे १० / ११ वर्षे गल्ली ते दिल्ली , उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय या सर्व ठिकाणी दाद मागतोय . महत्वाचं म्हणजे ९९.९९ % भारतीय जनता या गहाण प्रश्नावर हाताची घडी ,  तोंडावर बोट , कानात बोळे या अवस्थेत ध्यानस्थ बसून सगळं सहन करीत आहे . 

-  "ठाणे" शहरात दररोज अंदाजे ८० ते ९० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

-  "महाराष्ट्र" राज्यात  दररोज अंदाजे ८०००  निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.  

-  "भारत" देशात दररोज अंदाजे १,४२,०००  निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.  

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



No comments:

Post a Comment