Thursday, October 25, 2018

" SENIOR CITIZEN DIES OF DOG BITE " - Oct. 2018 - NAGPUR - Please Read

" SENIOR CITIZEN DIES OF DOG BITE "  - Oct. 2018 -  NAGPUR  - Please Read

WHERE ARE THOSE MALE / FEMALE ( प्राणी मित्र /  प्राणी मैत्रिणी ) FRIENDS OF STRAY DOGS ?

WHERE ARE THOSE ANIMAL ( STRAY DOGS ) ORGANISATIONS  ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

" श्वानाने घेतला वृद्धाचा बळी " - ऑक्टोबर , २०१८ - नागपूर - कृपया वाचा

" श्वानाने घेतला वृद्धाचा बळी " - ऑक्टोबर  , २०१८  -  नागपूर - कृपया वाचा 

कोठे गेले प्राणी मित्र ? 

कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

कोठे गेल्या त्या प्राणी संघटना ?  

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Sunday, October 21, 2018

" सध्याचे नगरसेवक भावी निवडणुकी अगोदरच पडले ? "

" सध्याचे नगरसेवक  भावी   निवडणुकी अगोदरच पडले ? " 

२२ ऑक्टोबर, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रात CITIZEN REPORTER  या सदरात आलेली हि सत्य परिस्थिती पहा

"अनधिकृत फलक , अपघातांना आमंत्रण"
कळव्याहून विटावा येथे जाताना , शिवाजी रुग्णालयासमोर एका आदरणीय , वंदनीय , पूजनीय , माननीय अश्या एका नगरसेवक साहेबांच्या वाढदिवसाचा  हा असा धोकादायक अवस्थेत पडलेला एक अनधिकृत फलक गेली अनेक दिवस दिसतोयगम्मत म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हा असा अवमान ठाणे   पा ला कधीच दिसत नाहीबहुतेक अपघात होण्याची वाट ठाणे   पा पहात असेल.    

 " त्या अनधिकृत फलकावरील ते नगरसेवक भावी निवडणुकीच्या अगोदरच असे कसे पडले ? " अशी नागरिकांमध्ये  कुजबुज आहे 

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

http://fightofacommonman.blogspot.in/

वाढती श्वान दहशत

" वाढती श्वान दहशत " 

२२ ऑक्टोबर, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्राने हा वाढत्या श्वान दहशतीवर घेतलेला सखोल आढावा . या आढाव्याबद्दल मी " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्राचे शतशः आभारी आहे . 

भटक्या कत्र्यांच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध त्याचप्रमाणे श्वान दंशाच्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गेली अंदाजे १० / ११ वर्षे गल्ली ते दिल्ली , उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय या सर्व ठिकाणी दाद मागतोय . महत्वाचं म्हणजे ९९.९९ % भारतीय जनता या गहाण प्रश्नावर हाताची घडी ,  तोंडावर बोट , कानात बोळे या अवस्थेत ध्यानस्थ बसून सगळं सहन करीत आहे . 

-  "ठाणे" शहरात दररोज अंदाजे ८० ते ९० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

-  "महाराष्ट्र" राज्यात  दररोज अंदाजे ८०००  निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.  

-  "भारत" देशात दररोज अंदाजे १,४२,०००  निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.  

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Saturday, October 20, 2018

" रेबीज लसींसह औषधांचा तुटवडा " - राज्यभर रुग्णांचे हाल , बाहेरून औषधखरेदी करण्याची वेळ

" रेबीज लसींसह औषधांचा तुटवडा " - राज्यभर रुग्णांचे हाल , बाहेरून औषधखरेदी करण्याची वेळ 

२१ ऑक्टोबर , २०१८ च्या ' महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील हि बातमी वाचा . 

महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ८,००० ( आठ हजार ) निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होत असतो . 

हि बातमी वाचून शासन हा गहाण प्रश्ना  किती गांभीर्याने घेत आहे हे तुम्हाला उमजेल . 

अश्या वेळी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना कोठे गायब होतात हे कोणालाच काळात नाही . 

या अति गंभीर समस्ये विरुद्ध माझा , डॉक्टर आनंद हर्डीकर - ठाणे , डॉक्टर उदय कुलकर्णी - ठाणे अश्या काही वेड्यांचा आपापली उदरनिर्वाहाची कामे करून देखील ,  लढा सुरूच आहे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

" कुत्र्यांनी तोडले मुलांचे लचके " - आसनगांव , ठाणे जिल्हा

" कुत्र्यांनी तोडले मुलांचे लचके " - आसनगांव , ठाणे जिल्हा 

२१ ऑक्टोबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील हि बातमी वाचा . 
" भारत " हा असा एकमेव देश आहे कि जेथे दररोज अंदाजे १,४२,००० ( एक लाख बेचाळीस हजार ) निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 

श्वानदंश ग्रस्तांपैकी ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात . 

हे एवधी भयावह सत्य स्थिती असून देखील शासन दरबारी हे थांबविण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

या विरुद्ध माझा , डॉक्टर आनंद हर्डीकर - ठाणे  , डॉक्टर उदय कुलकर्णी - ठाणे अश्या वेड्यांचा लढा सुरूच आहे. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Tuesday, October 9, 2018

" ठाणे वैभव " - खरी पत्रकारिता

" ठाणे वैभव  " या वृत्तपत्राच्या  सोमवार , १७ ऑक्टोबर , २०१८ च्या अंकात आलेली हि बातमी . 

हि अशी खरी पत्रकारिता पाहून अश्या लढाया लढायला स्फुरण येते.  ( बाकी वृत्तपत्रांनी याबाबत बातमी काय दिली होती हे मी वाचले आहे . ) 

मी येथे सांगू इच्छितो कि मी जेव्हा शासनाकडे माझे सविस्तर असे निवेदन पाठविले तेंव्हा त्याची प्रत ठाणे येथील एक अतिशय धडपडे असे जागरूक नागरिक श्री. चंद्रहांस तावडे यांना देखील पाठवली होती . ती प्रत त्यांना मिळाल्यावर त्यांनी मला संपर्क साधून सांगितले होते कि याच गोष्टीसाठी ते देखील ठाणे म न पा आयुक्तांना भेटले आहेत व नूतनीकरण न करण्याबद्दल सांगितले आहे. 

मी येथे श्री. चंद्रहांस तावडे यांचे तर मनापासून खूप आभार मानतो . ते नेहमी ठाणे सहाराच्या भल्यासाठी अनेक लढाया लढत असतात. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

" मुख्यमंत्री " - साप्ताहिक - खरी पत्रकारिता

" मुख्यमंत्री " या साप्ताहिकेच्या सोमवार , ८ ऑक्टोबर , २०१८ च्या अंकात आलेली हि बातमी . 