Sunday, February 25, 2018

" मराठीच्या वापरासाठी " लोकसत्ता " चे धन्यवाद

" मराठीच्या वापरासाठी " लोकसत्ता " चे धन्यवाद 

या सोबत २५ फेब्रुवारी, २०१८ च्या दोन सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या पृष्ठावर छापून आलेल्या बातम्यांचे प्रकाशचित्र ( PICTURE ) येथे जोडत आहे . 

एका बातमीत " पारपत्रे  " हा शुद्ध मराठी शब्द वापरला आहे  तर दुसऱ्या बातमीत " पासपोर्ट " हा ( खर तर हा इंग्रजी शब्द आहे ) इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहून वापरला आहे . 

" लोकसत्ता " या एका  नावाजलेल्या मराठी  वृत्तपत्राने  " पारपत्रे  " हा शुद्ध मराठी शब्द वापरला आहे . 

व " पासपोर्ट " हा  इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहून  दुसऱ्या एका नावाजलेल्या   मराठी   वृत्तपत्राने  वापरला आहे .  त्या  नावाजलेल्या   मराठी   वृत्तपत्राचे नांव मी काही येथे सांगणार नाही . 

पण मला येथे कळविण्यास अतिशय आनंद होतो कि गेले कित्येक महिने मी   " लोकसत्ता " या एका  नावाजलेल्या  मराठी  वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर कमी होऊन , मराठी शब्दांचा वापर वापर वाढलेला दिसत आहे . 

हि खरं तर मराठी भाषेवरील इंग्रजी शब्दांच्या अतिक्रमणाला थोपविणारी गोष्ट आहे.  

खरं  तर प्रत्येक मराठी वृत्तपत्राने   स्वतःहूनच बातम्यांमध्ये  मराठी शब्द वापरायला पहिजे . 

साजरा करायचा म्हणून अथवा बाकीचे साजरा करतात म्हणून , २७ फेब्रुवारी  रोजी  " जागृतीक मराठी दिन / मराठी भाषा दिवस  " नावापुरता साजरा न करता , मराठी बातम्यांमध्ये इंग्रजी शब्द टाळून , मराठी शब्द वापरून रोजच मराठी भाषा दिन साजरा करावा . 

तळ टीप : मी येथे काही " लोकसत्ता " या एका मराठी वृत्तपत्राचे विपणन ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " मार्केटिंग " )  /  जाहिरात   ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत ' ADVERTISING "  ) करीत नाही .  घाबरू नका २७ फेब्रुवारी रोजी , माझी भली मोठ्ठी छबी " लोकसत्ता "  या मराठी वृत्तपत्राच्या प्रथम पृष्ठावर छापून येणार नाही . 

मी गेली काही वर्षे या मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढत आहे म्हणून हि माहिती येथे देत आहे . 


No comments:

Post a Comment