Wednesday, February 28, 2018

सौ. लीला शाह - डोंबिवली - एक महान अविस्मरणीय भेट ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " )

" एक महान अविस्मरणीय भेट " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " ) 

सौ. लीला शाह - डोंबिवली यांचा २ / ३ दिवसांपूर्वी मला दूरध्वनी आला . त्या म्हणाल्या कि " आजची सत्यगीतं "हा माझा पहिला वाहिला काव्यसंग्रह त्यांनी वाचला व त्याचे परीक्षण त्यांनी लिहिले आहे . ते घेण्यासाठी व गप्पा मारण्यासाठी बोलविण्यासाठी त्यांचा दूरध्वनी होता. 

आज , बुधवार , २८ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्यांच्याकडे गेलो होतो . 

थोडं त्याच्या विषयी : त्या लेखिका , कवयित्री आहेत . त्याच्या अनेक कवितांना त्यांनी चाल देखील लावली आहे .  कोल्हापूरजवळील जयसिंगपूर येथे २२ ते २४ सप्टेंबर , २०१७  दरम्यान संपन्न झालेल्या  २२ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे  त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते . त्यांची  आतापर्यंत ६६ पुस्तके ( कादंबऱ्या , कविता ) प्रसिद्ध झाली आहेत . त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या एक पुस्तकाला तर महाराष्ट्र शासनाचा रुपये ५०,०००=०० चे ( अनुदान / पारितोषिक )  देखील मिळाले आहे . अरे हो विसरलो , त्यांचं वय फक्त ८३ वर्षे . अतिशय उर्जावान ( ENERGETIC ) . अजूनही विविध लिखाण चालू आहे . अतिशय नम्र , शांत बोलणं. 

अनेकविध विषयांवर बोलणं झालं . त्या आणि मी सुदैवाने मुळचे " इंडी " या कर्नाटक मधील एकाच गावचे . 

त्यांनी त्यांची एक अप्रतिम कविता ( चाल लावलेली ) , गाऊन  देखील ऐकवली . निघताना त्यांनी त्याचे एक पुस्तक मला सप्रेम भेट म्हणून दिलं . 

खरोखरच  " एक महान अविस्मरणीय भेट " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " GREAT भेट " ) 

माझ्या  " आजची सत्यगीतं " या माझ्या  पहिल्या  वाहिल्या  काव्यसंग्रहाचे  त्यांनी केलेलं परीक्षण , व त्याच्या सोबतच्या भेटीची काही छायाचित्रे येथे देत आहे . 

परीक्षण : 

सत्यजित शाह यांचा " आजची सत्यगीतं " हा कविता संग्रह वाचला . एकूण ऐंशी कविता - त्यातल्या काही दीर्घही आहेत. कविता वाचताना कवीच्या अतिशय संवेदनशील मनाचा पदोपदी प्रत्यय येत राहिला. त्यांच्या कवितांमधून समाज , राजकारण , राजकारणी , पर्यावरण , दुष्काळ , आत्महत्या , अंधश्रद्धा , कोडगी राजसत्ता , नवी पिढी असे अनेक विषय त्यांनी खूप तळमळीने मांडले आहेत . हे सर्व विषय जिवंत आहेत . 

सत्यजित यांच्या नावातच " सत्य " आहे त्या मुळे हे विचार अगदी सत्य आहेत . मात्र त्यांची " जीत " होईल का ? झाली तर जगातली कितीतरी दुःख दूर होतील. 

सत्यजित यांना जे जे प्रश्न पडलेत , ज्या ज्या व्यथा त्यांना छळतात ते सर्व प्रश्न संवेदनशील माणसालाही जाणवतातच . " अरे ! खरंच असंच चाललंय कि सगळं " " काय करू शकतो आपण " असं वाटून हृदयात एक बारीकशी कळ उठतेच - पण आपल्याला काय करायचंय ? मरेना  का कुणी तिकडे , या बधिर वृत्तीची खूप माणसं जगात असतात. अश्या माणसांना थोडं हलवण्याचं सामर्थ्य या कवितांमधून नक्कीच आहे . 

या पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण आहे . पाण्याचे प्रदूषण , कारखाने , रस्ते , धूर सारं काही त्यात आलेले आहे . 

या सर्व कवितांमधून कवीच्या मनातली वेदना , संवेदना , सामाजिक भान , तळमळ , कळकळ दिसून येते . कवीच्या इच्छेप्रमाणे लोकांना थोडी तरी " जाग " आली तरी कवीला कविता लिहिल्याचं सार्थक झालं वाटेल . 

सत्यजित यांच्या पहिल्या कविता संग्रहा साठी त्यांचं अभिनंदन आणि   पुढच्या दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा . 

सौ . लीला शाह 





Monday, February 26, 2018

मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती

" मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती " 

मराठी भाषा दिवस , जागतिक  मराठी  भाषा दिन याच्या दिवशी , मी सर्व   मराठी भाषिकांना एक कळकळीची नम्र विनंती करीत आहे . 

मराठी संभाषणात         (अव्यावसायिक)  लिखाणात  इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी वाक् प्रचार यांचा वापर करणे टाळावे . शक्यतो शुद्ध मराठीत संभाषण करावं . मराठीवर इंग्रजीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण रोखणे अत्यंत निकडीचे आहे . 

मराठी भाषा स्वतःचे अस्तित्व गमावत चालली आहे . मराठी भाषेत शब्द , वाक्ये , म्हणी , वाक् प्रचार  यांची अजिबात वानवा नाही . 

बाकी व्यक्ती साजरा करतात म्हणून "  मराठी भाषा दिवस , जागतिक  मराठी  भाषा दिन  " इंग्रजीत शुभेच्छा देऊन साजरा करू नकात .  

उठा , तुम्ही मराठी भाषिक आहात . मराठीत बोला , मराठीत लिहा , मराठीला " मराठी भाषा " म्हणून मानाने जगू द्या .  

जर तुम्हाला मराठी शब्द माहित नसतील तर मला संपार्क करा , माझ्याकडे एक अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द तयार आहेत . 

हे मी फक्त लोका सांगे ब्रम्ह ज्ञान , स्वतः मात्र कोरडे पाषाण .... या म्हणीप्रमाणे वागत नाही . मी स्वतः गेली अंदाजे २ वर्षे , अव्यावसायिक  मराठी संभाषणादरम्यान इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये , इंग्रजी म्हणी , इंग्रजी  वाक् प्रचार   यांचा वापर  कटाक्षाने टाळतो . 

सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८ 
satyajitshah64@gmail.com

http://fightofacommonman.blogspot.in/

Sunday, February 25, 2018

" मराठीच्या वापरासाठी " लोकसत्ता " चे धन्यवाद

" मराठीच्या वापरासाठी " लोकसत्ता " चे धन्यवाद 

या सोबत २५ फेब्रुवारी, २०१८ च्या दोन सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या पृष्ठावर छापून आलेल्या बातम्यांचे प्रकाशचित्र ( PICTURE ) येथे जोडत आहे . 

एका बातमीत " पारपत्रे  " हा शुद्ध मराठी शब्द वापरला आहे  तर दुसऱ्या बातमीत " पासपोर्ट " हा ( खर तर हा इंग्रजी शब्द आहे ) इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहून वापरला आहे . 

" लोकसत्ता " या एका  नावाजलेल्या मराठी  वृत्तपत्राने  " पारपत्रे  " हा शुद्ध मराठी शब्द वापरला आहे . 

व " पासपोर्ट " हा  इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहून  दुसऱ्या एका नावाजलेल्या   मराठी   वृत्तपत्राने  वापरला आहे .  त्या  नावाजलेल्या   मराठी   वृत्तपत्राचे नांव मी काही येथे सांगणार नाही . 

पण मला येथे कळविण्यास अतिशय आनंद होतो कि गेले कित्येक महिने मी   " लोकसत्ता " या एका  नावाजलेल्या  मराठी  वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर कमी होऊन , मराठी शब्दांचा वापर वापर वाढलेला दिसत आहे . 

हि खरं तर मराठी भाषेवरील इंग्रजी शब्दांच्या अतिक्रमणाला थोपविणारी गोष्ट आहे.  

खरं  तर प्रत्येक मराठी वृत्तपत्राने   स्वतःहूनच बातम्यांमध्ये  मराठी शब्द वापरायला पहिजे . 

साजरा करायचा म्हणून अथवा बाकीचे साजरा करतात म्हणून , २७ फेब्रुवारी  रोजी  " जागृतीक मराठी दिन / मराठी भाषा दिवस  " नावापुरता साजरा न करता , मराठी बातम्यांमध्ये इंग्रजी शब्द टाळून , मराठी शब्द वापरून रोजच मराठी भाषा दिन साजरा करावा . 

तळ टीप : मी येथे काही " लोकसत्ता " या एका मराठी वृत्तपत्राचे विपणन ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " मार्केटिंग " )  /  जाहिरात   ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत ' ADVERTISING "  ) करीत नाही .  घाबरू नका २७ फेब्रुवारी रोजी , माझी भली मोठ्ठी छबी " लोकसत्ता "  या मराठी वृत्तपत्राच्या प्रथम पृष्ठावर छापून येणार नाही . 

मी गेली काही वर्षे या मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढत आहे म्हणून हि माहिती येथे देत आहे . 


Friday, February 23, 2018

ठाणे खाडीतील रंगबेरंगी पक्षी

“ ठाणे खाडीतील रंगबेरंगी पक्षी 

२५ जानेवारी२०१८ रोजी ठाणे खाडीतून होडीने भ्रमण करीत असताना मी अनेकविध पक्षी पाहून खूप आनंदी झालो होतो . .

हे ठाणे खाडी भ्रमण ( THANE CREEK SAFARI ) " THANE COLLECTORATE "  " पर्यावरण दक्षता मंडळ " यांनी आयोजित केलं होत.

अचानक खाडीच्या तीरावरील झाडांवर त्याचप्रमाणे खाडीच्या पाण्यात अनेक रंगबेरंगी पक्षी दिसलेउत्सुकतेने ते पक्षी पहिले तेव्हा भ्रमनिरास झाला , कारणते पक्षी नव्हते तर त्या रंगबेरंगी प्लास्टिक च्या पिशव्या होत्या 

मन सुन्न झाले .

भविष्यातील चित्र नजरेसमोरून गेले आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . .


मराठी साहित्य संमेलन - माझं काव्यवाचन

" मराठी साहित्य संमेलन - माझं काव्यवाचन "

माझं अहोभाग्य कि मला बडोदे , गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त आयोजित केलेल्या " कवीकट्टा " या काव्यमंचावर " आदरणीय , वंदनीय " हि माझी कविता शुक्रवार . १६ फेब्रुवारी , २०१८ रोजी रात्रौ सादर करण्याची संधी मिळाली .
काही आठवड्यांपूर्वी "पुढारी" या दैनिकातील एका बातमीत ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी कविता पाठविण्याची बातमी आली होती. मी माझी अतिशय आवडती अशी " आदरणीय , वंदनीय " हि कविता पाठवली होती . सुदैवाने माझ्या कवितेची बाकीच्या अंदाजे ५०० कवितांबरोबर निवड झाली .

या सोबत , काव्य वाचन करतानाचे प्रकाशचित्र ( PICTURE/PHOTO ) , मी काव्य वाचन केलेली " आदरणीय , वंदनीय " हि कविता , काव्य वाचन केल्याचे प्रशस्तिपत्रक ( CERTIFICATE ) , माझ्या ज्या काव्यसंग्रहातून हि कविता मी घेतली त्या " आजची सत्यगीतं " या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ जोडले आहे .





Thursday, February 22, 2018

पोलिसच वाहतुकीचे नियम पाळत नाहीत

" पोलिसच वाहतुकीचे नियम पाळत नाहीत " 
" CITIZEN REPORTER " या " महाराष्ट्र टाईम्स " वृत्तपत्राने सुरु केलेल्या सदरात २२ फेब्रुवारी, २०१८ रोजी हि  छोटीशी बातमी आली होती. 

कायद्याचे रक्षकच वाहतुकीचे नियम पाळत नाहीत हे योग्य आहे का ? 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !





Tuesday, February 6, 2018

आजच्या आभासी अश्या मोहजालेच्या युगातील प्रामाणिकपणा

" आजच्या आभासी अश्या मोहजालेच्या युगातील प्रामाणिकपणा "
मोहन माळी , माझा अकरावी , बारावी चा वर्ग मित्र , ऑस्ट्रेलिया येथे राहतो , त्याचा एके दिवशी whatsapp वर संदेश आला कि , त्याने माझ्या फेसबुक वर मी टिपलेली रस्त्यांची काही प्रकाशचित्रे ( PICTURES/PHOTOS ) पहिली . ती त्याला त्याच्या एका ध्वनिचित्रफितीमध्ये वापरायची आहेत व त्यासाठी त्याला माझी परवानगी हवी व ती प्रकाशचित्रे ( PICTURES/PHOTOS ) मूळ आकारात हवी आहेत. त्याने असेही कळविले होते कि तो माझ्या नावाचा उल्लेख देखील करणार आहे . मी ताबडतोब परवानगी दिली व मूळ छायाचित्रे पाठवून देखील दिली.
काल , मंगळवार , ६ फेब्रुवारी, २०१८ रोजी मोहन माळी याने youtube वरील खालील एक साखळी ( LINK ) पाठवली . त्यात पाहतो तर काय त्यात त्याने माझ्या नावाचा उल्लेख केला होता .


या आजच्या आभासी अश्या मोहजालेच्या युगात , अनेक व्यक्ती दुसऱ्यांची प्रकाशचित्रे ( PICTURES/PHOTOS ) , कथा , कविता बेमालूम पणे चोरून स्वतःच्या नावाने निर्लज्य पणे खपवत असतात व ताठ मानेने मिरवत देखील असतात ,
अश्या या सद्य परिस्थितीत मोहन माळी याचे खरंच कौतुक करावेसे वाटते.
मोहन माळी हा स्वतः पेटी वाजवितो व गातो देखील .

Saturday, February 3, 2018

क्रिया प्रतिक्रिया - काव्यसंग्रह ' आजची सत्यगीत '

" क्रिया प्रतिक्रिया " 

माझ्या " आजची सत्यगीत " या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रह मधील , माझी एक आवडती कविता येथे आपल्यासाठी देत आहे ( POST करीत आहे ) .
दुर्दैवाने यातील शब्द न शब्द खरा ( सत्य ) आहे.
भारताला आजच्या घडीला क्रिया करणाऱ्यांची गरज आहे , ना के फक्त आणि फक्त प्रतिक्रिया देणाऱ्यांची.
प्रतिक्रिया देणारे दुर्दैवाने जागो जागी आढळून येतात . 
Evil Triumphs When Good People Sit Quiet




Thursday, February 1, 2018

बेवारस कुत्र्यांचा उच्छादच ठरले लिमयेंच्या मृत्यूचे कारण

" बेवारस कुत्र्यांचा उच्छादच ठरले लिमयेंच्या मृत्यूचे कारण "

हि दुर्दैवी घटना भारत या देशातील , महाराष्ट्र राज्यातील , सोलापूर या शहरात घडली आहे . 

नेहमी प्रमाणे " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रिणी " कोठे गायब / भूमिगत  झाल्या आहेत हे माहित नाही . 

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८ च्या " दिव्य मराठी " या दैनिकाच्या सोलापूर आवृत्ती मध्ये छापून आली आहे . 

" माणूस मरो , पण भटका  कुत्रा जगो " 

" मेरा भारत महान ! "