Saturday, February 11, 2017

निवडणुकीचा प्रचार आणि सत्य ( TRUE, REAL , FACT )

११.०२.२०१७ 
" निवडणुकीचा प्रचार आणि सत्य ( TRUE, REAL , FACT ) "
निवडणूक जवळ आल्यामुळे सगळ्या उमेदवारांनी सगळ्या रहिवासी संकुलातील , प्रत्येक इमारतींमध्ये जाऊन घरो घरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे.

आत्ता मी आमच्या इमारतीमध्ये आल्या आल्या आमच्या रखवालदाराने ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत WATCHMAN म्हणतात ) माझ्या हातात एक कागद दिला काय आहे हे विचारले . ते एक मराठीतील पत्र होते , ज्यात आमच्या इमारतीच्या सचिव ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत SECRETARY म्हणतात ) यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी परवानगी मागणारे भारतीय जनता पक्ष या एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे आवेदन पत्र होते .

कालच आमच्या दारावर एका राजकीय पक्षाचे उमेदवार येऊन गेले होते . त्यांनी परवानगी घेतली होती का हे मी रखवालदाराला विचारले तर ते म्हणाले कि त्यांनी कोणाचीही परवानगी घेताच प्रचार करून गेले. ते चारही उमेदवार मला जाताना " पंजा " दाखवून गेले होते.

आजकाल सुरक्षेच्या ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत SECURITY म्हणतात ) दृष्टीने बहुतांश रहिवासी संकुलात व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागते .


आपल्यालाही कोणत्या राजकीय पक्षाचा काय अनुभव येतो हे स्वतःच पहा , या वरून कोणाला मत द्यायचे हे ठरवणे आपणाला सोपे जाऊ शकेल.


No comments:

Post a Comment