Tuesday, February 21, 2017

तंत्रज्ञानाची नवलाई / पहावे ते नवलंच

नमस्कार , सुंदर संध्याकाळ , 

" तंत्रज्ञानाची नवलाई /  पहावे ते नवलंच  " 

नुकतंच मी दुबई येथे एक औद्योगिक प्रदर्शनासाठी गेलो होतो . ते प्रदर्शन WORLD TRADE CENTRE येथे होते. 

तेथे खाण्याची अनेक ठिकाणं ( FOOD STALL ) होते. 

अगोदर खाण्यासाठी पैसे द्यावे लागतात . मला कळत नव्हतं कि आपलं खाणं तयार झाल्यावर आपल्याला कसं कळणार ? 

तेवढ्यात ज्या व्यक्तीने पैसे घेतले , त्याने माझ्या हातात पहिल्या छायाचित्रात दिसत आहे ती गोलाकार चकती दिली आणि बसण्यास सांगितले. 

काही वेळाने त्या चकतीच्या परिघावरील ( ज्याला आजच्या शुद्ध मराठी मध्ये PERIMETER असे म्हणतात )   छोटेसे दिवे लागले व त्यातून आवाज येऊ लागला ( दुसऱ्या छायाचित्रात दिवे लागलेले दिसत आहे ) . 

हा एक संकेत होता कि मला हवे असलेले खाण्याचे पदार्थ तयार आहेत. 

ती चकती त्यांना द्यायची आणि आपले खाण्याचे पदार्थ घ्यायचे .  

म्हणजे आपल्यासारखं  VEG SANDWICH , VEG SANDWICH , असं ओरडणं कोठेही चालू नव्हतं .  त्याचप्रमाणे मेरा तयार हुआ क्या ? वगैरे विचारणाऱ्यांची तेथे गर्दी नव्हती , त्यामुळे ते असं सरळ सोट पणे मिळालेलं खाणं मला व्यवस्थित पचले नाही. 

असो हे तंत्रज्ञान अनोखं वाटलं म्हणून येथे कळवीत  आहे. 

२१. ०२. २०१७ 



No comments:

Post a Comment