Tuesday, February 21, 2017

तंत्रज्ञानाची नवलाई / पहावे ते नवलंच

नमस्कार , सुंदर संध्याकाळ , 

" तंत्रज्ञानाची नवलाई /  पहावे ते नवलंच  " 

नुकतंच मी दुबई येथे एक औद्योगिक प्रदर्शनासाठी गेलो होतो . ते प्रदर्शन WORLD TRADE CENTRE येथे होते. 

तेथे खाण्याची अनेक ठिकाणं ( FOOD STALL ) होते. 

अगोदर खाण्यासाठी पैसे द्यावे लागतात . मला कळत नव्हतं कि आपलं खाणं तयार झाल्यावर आपल्याला कसं कळणार ? 

तेवढ्यात ज्या व्यक्तीने पैसे घेतले , त्याने माझ्या हातात पहिल्या छायाचित्रात दिसत आहे ती गोलाकार चकती दिली आणि बसण्यास सांगितले. 

काही वेळाने त्या चकतीच्या परिघावरील ( ज्याला आजच्या शुद्ध मराठी मध्ये PERIMETER असे म्हणतात )   छोटेसे दिवे लागले व त्यातून आवाज येऊ लागला ( दुसऱ्या छायाचित्रात दिवे लागलेले दिसत आहे ) . 

हा एक संकेत होता कि मला हवे असलेले खाण्याचे पदार्थ तयार आहेत. 

ती चकती त्यांना द्यायची आणि आपले खाण्याचे पदार्थ घ्यायचे .  

म्हणजे आपल्यासारखं  VEG SANDWICH , VEG SANDWICH , असं ओरडणं कोठेही चालू नव्हतं .  त्याचप्रमाणे मेरा तयार हुआ क्या ? वगैरे विचारणाऱ्यांची तेथे गर्दी नव्हती , त्यामुळे ते असं सरळ सोट पणे मिळालेलं खाणं मला व्यवस्थित पचले नाही. 

असो हे तंत्रज्ञान अनोखं वाटलं म्हणून येथे कळवीत  आहे. 

२१. ०२. २०१७ 



Saturday, February 18, 2017

"आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग "

नमस्कार , रविवारची प्रसन्न सकाळ , 

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे"

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे" कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येताततितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातंइंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
        
पु.देशपांडे -   संदर्भ : "आमचे भाषाविषयक धोरण  "     

सध्या मराठीची गत याहूनही वाईट झाली आहे . 

दोन  मराठी व्यक्ती , मराठी मध्ये बोलताना प्रत्येक वाक्यात अंदाजे ४० ते ८० % इंग्रजी शब्द वापरतात. आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमात देखील काहीसं असच अनुभवायला मिळतं . याबाबत आकाशवाणी निवेदक / निवेदिका ( आमच्या शुद्ध मराठीत RJ ) यांना याबाबत  दूरध्वनी केला असता , " YOUNG GENERATION " ला कळण्यासाठी आम्ही असं मराठी कमी व इंग्रजी शब्द जास्त बोलतो , असं उत्तर मिळतं . आकाशवाणी वरील एका मराठी  FM वाहिनीवरील,  एका मराठी  कार्यक्रमाचं नाव होतं , BREAKFAST SHOW . 

मराठी मालिकांचे हाल तर याहूनही वाईट आहेत.  

मी आधीही कोणाला इंग्रजी संभाषण करताना , JUST NOW FINISHED MY नाश्ता , असे कधीच ऐकले नाही , पण मराठी संभाषणात मात्र आताच BREAK FAST केला , असे सर्रास ऐकू येते. 

शुद्ध मराठी बोलताना ( मातृभाषेत ) , कसली लाज वाटते , कसला कमीपणा वाटतो ?  

कोठे नेऊन  ठेवले आहे मराठी माणसांनी मराठीला ? 

प्रतिक्रिया देण्या अगोदर कृपया व्यवस्थित वाचा , आपण मराठी संभाषणात किती इंग्रजी शब्द , वाक्ये वापरता याचा हि विचार करा . 

चला , स्वतःपासूनच शुद्ध मराठी बोलायची सुरुवात करूया . 

आपणच मराठीला वाचवूया !  

सत्यजित  शाह - ठाणे 

Tuesday, February 14, 2017

कविता व्यालेनटांइन डे ( Valentine Day )

नमस्कार ,
सुंदर संध्याकाळ ,
कविता व्यालेनटांइन डे ( Valentine Day )
मी माझी ( मी स्वतः लिहिलेली - चोरलेली नाही ) अप्रकाशित कविता कधीच FACEBOOK वर टाकीत नाही कारण त्याची बेमालूमपणे चोरी होते. आणि गम्मत म्हणजे तो / ती चोर स्वतःच्या नावाने परत FACEBOOK वर अशी टाकतात अशी कि त्यांनीच ती कविता लिहिली आहे. माझ्याकडे " व्यालेनटांइन डे ( Valentine Day ) " हि कविता, मी कधी , कोठे लिहिली हे पुरावे आहेत म्हणून व राहवत नाही म्हणून हि कविता आजच्या दिवशी ( १४.२.२०१६ ) रोजी FACEBOOK वर टाकत आहे.
या सगळ्या माझ्या भावना आहेत.
सत्यजित अ शाह - ठाणे
एक अतिसामान्य पण जागरूक नागरिक
" व्यालेनटांइन डे ( Valentine Day ) "
Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?
नाही कधी आईवर प्रेम केलं
नाही कधी वडिलांना प्रेम दिलं
नाही कधी भावंडांवर प्रेम केलं
नाही आजी , आजोबांना मानाने वागवल
Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?
नाही कधी मातृभाषेवर प्रेम केलं
नाही कधी भारतीय संस्कृतीचं जतन केलं
नाही कधी स्वतःच्या शाळेवर प्रेम केलं
नाही कधी गुरुजनांना मानाचं स्थान दिलं.
Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?
नाही भारतीय खेळांवर प्रेम केलं
नाही भारतीय कलांवर प्रेम केलं
नाही भारतीय आयुर्वेदावर प्रेम केलं
नाही भारतीय योगाभ्यासावर प्रेम केलं
तरुणांनो ज्या भारत मातेने आपल्यासाठी एवढं दिलं
आठवा अश्या या भारत मातेसाठी तुम्ही काय केलं ?
Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?
कवी सत्यगीत

Sunday, February 12, 2017

फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या पोलिसाला दंड

नमस्कार , प्रसन्न सकाळ , 

" फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या पोलिसाला दंड " 

१३ फेब्रुवारी, २०१७ च्या " सामना " या वृत्तपत्रामध्ये आलेली हि बातमी येथे देत आहे. 

त्यासोबत त्या दुचाकीवरील वाहन क्रमांक कसा लिहिला होता त्याचे छायाचित्र व माजी पोलीस उपयुक्त, ठाणे वाहतूक पोलीस विभाग यांचे पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या साठी ०७०७२०१४ रोजी काढलेल्या परिपत्रकाची एक प्रत जोडत आहे

छायाचित्रातील पोलीस दुचाकीस्वाराने खालील नियम पाळलेले नाहीत / मोडले आहेत. 


१. ) दुचाकी चालविताना शिरस्त्राण (  HELMET )  घालणे ( MVA १२९/१७७ ) ,
२. ) वाहन क्रमांक पाटीवरील ( NUMBER PLATE ) वाहनाचा क्रमांक नियमाप्रमाणे इंग्रजी मध्ये असणे , पण या दुचाकीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी " भाऊ असे लिहिलेले आहे.[ CMVR १०५ () ( ii ) १७७ MVA ] 
३. ) वाहनावर / वाहन क्रमांक पाटीवर पोलिसांचे  गोलाकार STICKER लावू नये , वाहनावर / वाहन क्रमांक पाटीवर पोलीस असे लिहू नये [ CMVR ११९r/w १७७ MVA ]

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 





Saturday, February 11, 2017

देवगड मध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" देवगड मध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ "

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७ च्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रातील बातमी येथे देत आहे.

तुम्ही म्हणाल कि रविवारच्या सकाळी सकाळी तरी अशी बातमी नको , तुमचं खरं आहे , पण कसं आहे ना , " महाराष्ट्र " राज्यात दर रोज अंदाजे ७,७०० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो , " भारत " या देशात दर रोज अंदाजे १,४१,९६० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.

एवढे असूनही बहुसंख्य भारतीय या गंभीर समस्येबाबत अनभिज्ञ आहेत. भारतीय नागरिकांना या अतिशय भायवाय वेगाने वाढणाऱ्या समस्येविषयी जागरूक करण्याच्या माझ्या प्रयत्नांपैकी हा एक भाग आहे.

जर हे असेच चालू राहिले तर , काही काळा नंतर " भारत " या देशात प्रत्येक नागरिकाला किमान एकदा तरी श्वान दंश झालेला असेल.


निवडणुकीचा प्रचार आणि सत्य ( TRUE, REAL , FACT )

११.०२.२०१७ 
" निवडणुकीचा प्रचार आणि सत्य ( TRUE, REAL , FACT ) "
निवडणूक जवळ आल्यामुळे सगळ्या उमेदवारांनी सगळ्या रहिवासी संकुलातील , प्रत्येक इमारतींमध्ये जाऊन घरो घरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे.

आत्ता मी आमच्या इमारतीमध्ये आल्या आल्या आमच्या रखवालदाराने ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत WATCHMAN म्हणतात ) माझ्या हातात एक कागद दिला काय आहे हे विचारले . ते एक मराठीतील पत्र होते , ज्यात आमच्या इमारतीच्या सचिव ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत SECRETARY म्हणतात ) यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी परवानगी मागणारे भारतीय जनता पक्ष या एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे आवेदन पत्र होते .

कालच आमच्या दारावर एका राजकीय पक्षाचे उमेदवार येऊन गेले होते . त्यांनी परवानगी घेतली होती का हे मी रखवालदाराला विचारले तर ते म्हणाले कि त्यांनी कोणाचीही परवानगी घेताच प्रचार करून गेले. ते चारही उमेदवार मला जाताना " पंजा " दाखवून गेले होते.

आजकाल सुरक्षेच्या ( ज्याला आजच्या शुद्ध मराठीत SECURITY म्हणतात ) दृष्टीने बहुतांश रहिवासी संकुलात व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागते .


आपल्यालाही कोणत्या राजकीय पक्षाचा काय अनुभव येतो हे स्वतःच पहा , या वरून कोणाला मत द्यायचे हे ठरवणे आपणाला सोपे जाऊ शकेल.


Friday, February 10, 2017

ठाणेकरांसाठी महत्वाचे

ठाणेकरांसाठी महत्वाचे ----- मानपाडा जंक्शन ते तत्त्वज्ञान सिग्नल या दरम्यानची वाहतूक बंद
ठाणे शहर हद्दीतील राज्य महामार्ग क्र. ४२ या ठाणे घोडबंदर वरील तत्त्वज्ञान सिग्नल ते मानपाडा दरम्यान आर मॉल रोडवर पादचारी पुलाच्या उभारण्याकरिता मानपाडा जंक्शन ते तत्त्वज्ञान सिग्नल या दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी, 2017 रोजी रात्री 10.00 पासून ते शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी ०९.०० वा. पर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
घोडबंदर रोडने गायमुख मार्गे ठाणे शहरात जाणाऱ्या जड अवजड वाहनांनी मनोर -रोजनोली - मानकोली-खारेगाव टोल नाका मार्गाचा वापर करावा .मुंबईकडून ठाणे बाजूने घोडबंदर रोडवरून पुढे अहमदाबाद दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांनी कापूरबावडी सर्कल -बाळकूम -कशेळी - अंजूरफाटा -चिंचोटी-वसई -या मार्गाचा वापर करावा . पनवेल व महापे , नवी मुंबई येथून मुंब्रा बायपास मार्गे घोडबंदर मार्गाने अहमदाबाद -गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी खारेगाव टोलनाका -मानकोली -वडपे –चाविंद्रा (भिवंडी) -वाडा मनोर या मार्गाचा अवलंब करावा . ठाणे बाजूकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारया राज्य परिवहन,महानगरपालिका परिवहन बसेस,चारचाकी, दुचाकी वाहनांनी तत्त्वज्ञान सिग्नल-ग्रीनवूड -सूर्या टॉवरहिरानंदानी सर्कॅल-डॉ काशिनाथ नाट्यगृह-हैप्पी वेली सर्कॅल-मानपाडा मार्गाचा वापर करावा. घोडबंदर रोडने ठाणे बाजूकडे जाणाऱ्या राज्य परिवहन,महानगरपालिका परिवहन बसेस,चारचाकी, दुचाकी वाहनांनी वाहनांनी १) मानपाडा -हैप्पी वेली सर्कॅल- डॉ काशिनाथ नाट्यगृह-्रगांधीनगर २)ब्रह्मांड सिग्नल-ब्रह्मांड सर्कॅल-एअरफोस स्टेशन -ढोकाळी ३).आरमॉल-मनोरमा नगर मार्गाचा वापर करावा. असे आवाहन श्री संदीप पालवे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे यांनी केले आहे.

Wednesday, February 8, 2017

पुणे - वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा - लोकसत्ता

लोकसत्ता  मुखपृष्ठ » पुणे » वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा!
प्रतिक्रिया

वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा !

सध्या शहरात दोन ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना रेबिजची लस देण्याचे काम चालते.

प्रतिनिधी, पुणे | February 8, 2017 2:48 AM

वर्षभरात १८ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा !

शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना होणार

रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून वेगाने जाणाऱ्या मोटारींच्या मागे धावणारी भटकी कुत्री हा चालणाऱ्या आणि दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांच्याही त्रासाचा विषय झाली आहेत. धनकवडी, वडगाव शेरी, सहकारनगर आणि शहराच्या बाहेरच्या भागातून महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत आहेत. गेल्या वर्षभरात (सन २०१६) १८,०५९ नागरिकांना कुत्रा चावल्यामुळे लस घेण्याची पाळी आली असून, हा केवळ महापालिका दवाखाने आणि नायडू रुग्णालयात नोंदला गेलेला आकडा आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी निर्बीजीकरणाद्वारे त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी नागरिकांना रस्त्यांवर होणाऱ्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून तो तोकडा असल्याचे दिसून येत आहे. जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत केवळ ५,३०६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण होऊ शकले आहे.

शहरात कुत्री किती आहेत हे कळावे म्हणून या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कुत्र्यांच्या गणनेचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात निर्बीजीकरण झालेली व न झालेली कुत्री, तसेच पूर्ण वाढ झालेली कुत्री व पिल्ले यांची संख्या काढण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरू असूनही त्यांचा उपद्रव असल्याच्या तक्रारी येतातच. कुत्र्यांच्या गणनेद्वारे निर्बीजीकरणाचे नियोजन सुकर होऊ शकेल. घरोघरी जाऊन पाळीव कुत्र्यांची तसेच रस्त्यावर फिरून भटक्या कुत्र्यांची गणना करून घेतली जाईल.’’

सध्या शहरात दोन ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना रेबिजची लस देण्याचे काम चालते. आता बाणेरमध्ये असे ‘डॉग पाँड’ मार्चअखेरीस तयार होईल, तसेच कोंढव्यातही त्यासाठी जागा बघत आहोत, असेही डॉ. साबणे यांनी सांगितले.


वर्षभरात रेबिजचे २० मृत्यू

* शहरात गेल्या वर्षभरात रेबिजच्या वीस मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील १९ व्यक्ती पुण्याबाहेर राहणाऱ्या होत्या, तर एक जण पुण्याचा रहिवासी होता. त्यापूर्वीही २०१५ मध्येही रेबिजचे १६ बळी गेले आहेत. हे सर्व रुग्णही पुण्याबाहेरून उपचारांसाठी शहरात आले होते.

* कुत्र्याचा चावा साधा असल्यास रुग्णाला ‘रॅबिपूर’ हे इंजेक्शन व धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते, परंतु चावा खोल असेल तर त्याबरोबर ‘अँटिरेबिज सीरम’ हे इंजेक्शनही जखमेच्या ठिकाणी द्यावे लागते. यातील ‘रॅबिपूर’ व धनुर्वाताचे इंजेक्शन ग्रामीण भागात उपलब्ध होत असले, तरी ‘अँटिरेबिज सीरम’ सर्व ठिकाणी उपलब्ध नाही. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये अशा रुग्णांना ससून, नायडू किंवा वायसीएम रुग्णालयातच जावे लागते आहे. ससूनमध्ये रुग्णांना हे इंजेक्शन बाहेरूनच आणावे लागत आहे.

* राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात कुत्रा चावण्याची समस्या अधिक आहे शासकीय संस्थांमध्ये रॅबिपूर लस मोफत मिळते. ‘अँटिरेबिज सीरम’ सर्वच रुग्णांना द्यावी लागत नसून त्यासाठी रुग्णांना वरच्या रुग्णालयात पाठवतात’’





Saturday, February 4, 2017

" आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहोळा

नमस्कार , 
" आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहोळा
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला मला खूप आवडते.
आजही मला रविवार , २ फेब्रुवारी , २०१४ हा दिवस आठवतो आणि मी मग आठवणीत रमून जातो . त्या दिवशी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पण अतिशय साधा व घरगुती असा माझ्या " आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहोळा डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात छोट्या रंगमंचावर ( MINI THEATRE ) येथे पार पडला होता.
त्या प्रकाशन सोहोळ्याची काही छायाचित्रे येथे देत आहे.
त्या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते.
- प्राध्यापक श्री. प्रदीप ढवळ - नाटककार, लेखक
- श्री. संजय केळकर - सध्या आमदार , तेव्हा माजी आमदार
- सौ जयश्री ताई खाडिलकर - पांडे - मालक , प्रकाशक , संपादिका - " नवा काळ "
- कवी अशोक बागवे
- सत्यजित अ शाह - कवी - म्हणजेच मी
- सौ अनुराधा ताई प्रभुदेसाई - संस्थापिका - लक्ष्य प्रतिष्ठाण
- श्री. मिलिंद बल्लाळ - संपादक - " ठाणे वैभव "
- प्राध्यापक श्री. संतोष राणे - शारदा प्रकाशन
आपण हा कार्यक्रम बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .




आजची सत्यागितं परीक्षण ठाणे वैभव

नमस्कार , प्रसन्न संध्याकाळ , 

" आजची सत्यागितं " - काव्यसंग्रह परीक्षण 

२१ मार्च, २०१५ च्या " ठाणे वैभव " या दैनिकांमध्ये सुधा ताई मोकाशी यांनीं " आजची सत्यागितं " या माझ्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहाचे केलेलं परीक्षण छापून आले होते. ते येथे देत आहे.