Wednesday, July 27, 2016

" राज्यसभेत शिरू पाहणाऱ्या भटक्या कुत्र्याला अडवून हाकलले " - भटक्या कुत्र्याला अपमानास्पद वागणूक "


नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" राज्यसभेत शिरू पाहणाऱ्या भटक्या कुत्र्याला अडवून हाकलले " - भटक्या कुत्र्याला अपमानास्पद वागणूक "

२७.०७.२०१६ च्या " लोकमत " या वृत्त पत्रातील ही बातमी वाचा

राज्यसभेत लोकनियुक्त प्रतिनिधींनी निवडून दिलेल्या व्यक्ती , त्याचप्रमाणे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या व्यक्ती खासदार म्हणून जातात.

हे चित्र पाहून तरी केंद्र शासनाला , या भटक्या कुत्र्यांच्या अमर्याद वेगाने वाढत जाणाऱ्या संख्येच्या प्रश्नांची जाण व्हायला हरकत नाही .

पण त्या भटक्या कुत्र्याला सुरक्षा रक्षकांनी तिथून हाकलल्यामुळे त्या भटक्या कुत्र्याचा जो घोर अपमान झाला आहे , या अपमानास्पद वागणुकीविरुद्ध आता " भारत " या देशातील प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी त्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई करतात हे पहावे लागेल .
त्या सुरक्षा रक्षकांना हे माहीत असायला हवं की " भारत " या देशात , " भटका कुत्रा " या प्राण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे . भटकणे हा भटक्या कुत्र्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे ( त्यांचे नावच " भटका " कुत्रा असे आहे ) त्यामुळे त्याला अशी अपमानास्पद वागणूक देणे हे योग्य नाही . फार फार तर त्या भटक्या कुत्र्याने राज्य सभेत शिरुन असे काय केले असते ? काही वेळ फक्त भुंकला असता , काही खासदारांना फक्त चावला असता , त्यातील काही खासदारांना फक्त रेबीस झाला असता , काही खासदार फक्त जखमी झाले असते , काही खांबांवर फक्त " मूत्र " विसर्जन केले असते , काही ठिकाणी फक्त " मल " विसर्जन केले असते , काही आसने फक्त फाडली असती , काही खासदारांच्या मागे फक्त धावला असता , काही वाहनांच्या मागे फक्त धावला असता , काही दुचाकींच्या मागे फक्त धावला असता , फक्त काही काळ राज्यसभेचे कामकाज फक्त तहकूब झाले असते , काही दिवसांनी त्याने त्याच्या जोडीदाराला ( भटक्या कुत्रीला ) फक्त आणले असते , त्या दोघांची दर सहा महिन्यांनी छान , गोंडस , अशी छोटीशी फक्त 6 ते 12 अशी पिल्ले जन्माला आली असती , त्यातील काही संसदेच्या आवारात फक्त गेली असती .

फक्त एवढयाश्या साध्याश्या , जराश्या कारणांसाठी त्या भटक्या कुत्र्याला असे हाकलून द्यायचे ?

यापुढे भटक्या कुत्र्यांना कोठूनही हाकलून देणे म्हणजे भटक्या कुत्र्यांवर अन्याय आहे.
ता. क . : हे जे काही लिहिले आहे ते फक्त उपहासात्मक ( आजच्या शुद्ध मराठीत SATIRE ) असे लिहिलेले आहे. कोणाच्याही अगदी " भटका कुत्रा , भटका कुत्री  " यांच्या देखील भावना दुखविण्याचा माझा  कोणताही   हेतू नाही . भटक्या कुत्र्यांच्या या भयंकर अश्या प्रश्नावर जनजागृती करण्याचा  हा एक  प्रयत्न आहे. 

No comments:

Post a Comment