नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,
डोंबिवली करांना असह्य होणारा भटक्या कुत्र्यांचा उच्छाद / STRAY DOG MENACE SPREADS PANIC AMONG RESIDENTS OF DOMBIVALI
" HINDUSTAN TIMES " मधील हि बातमी वाचा , झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीय मानव प्राण्यांनो अजूनही तुम्हाला वाटते कि भारत या देशात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद नाही ?
- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे ६०,००० ते ७०,००० भटके कुत्रे असण्याही शक्यता आहे .
- या बातमीप्रमाणे कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अंदाजे २५,००० भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे.
- जर हेच प्रमाण धरले तर " महाराष्ट्र " नावाच्या एका पुरोगामी राज्यात अंदाजे एक ते दीड कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
- " भारत " या देशात अंदाजे २४ ते २६ कोटी भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकारणावर एक तुफान विनोदी मालिका बनू शकते. असं ऐकण्यात आले आहे कि एका महानगर पालिकेने म्हणे भटक्या कुत्र्यांच्या संख्ये पेक्ष्या जास्त कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असे दाखवून तेवढा खर्च मंजूर केला , पण तरीही भटक्या कुत्र्यांची पिल्लावळ जागो जागी दिसते म्हणे.
असो , माझे काम आहे झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीय नागरिकाला झोपेतून जागे करणे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment