नमस्कार , आणि सुंदर सकाळ
,
" नागपूर ग्रामीण भागात
तीन महिन्यात साडेपाच हजार निरपराध मानव प्राण्यांना भटक्या कुत्र्यांचा चावा
"
या सोबत २१ मे, २०१६ च्या
" ठाणे वैभव " या वृत्त पत्रातील बातमी देत आहे. नागपूर
नागपूर च्या जवळील ग्रामीण
भागातील हि संख्या आहे. लक्ष्यात घ्या कि श्वान
दंश झाल्यावर अनेकदा रुग्ण खाजगी दवाखाने अथवा खाजगी रुग्णालये येथे उपचार घेतात .
व अश्या श्वान दंशाच्या रुग्णाची माहिती शासनाकडे नसते. याचाच अर्थ प्रत्याक्ष्यात हि श्वान दंश झालेल्यांची संख्या अंदाजे अकरा हजार च्या आसपास
असण्याची दाट शक्यता आहे.
विचार करा जर ३ महिन्यात
११,००० श्वान दंश म्हणजे दररोज १२२ नागरिकांना श्वान दंश होतो व वर्षभरात अंदाजे ४४,०००
निरपराध मानव प्राण्यांना भटका कुत्रा चावतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे हि आकडेवारी नागपूरच्या ग्रामीण भागातील आहे.
नागपूर शहरात अंदाजे ९०,०००
ते १,००,००० एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर
शहरात दर वर्षी अंदाजे २५,००० ते ३०,००० व्यक्तींना श्वान दंश होतो .
श्वान दंशाच्या ज्या काही
घटना होतात त्यातील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
ही झाली फक्त
महाराष्ट्र नावाच्या एका पुरोगामी राज्याच्या उप राजधानीतील श्वान दंशाची आकडेवारी. महाराष्ट्रातील इतर गावात
, तालुक्यात , जिल्ह्यात , शहरात देखील याच प्रमाणे श्वान दंशाचे प्रमाण भरपूर आहे.
" महाराष्ट्र राज्यात
" दररोज अंदाजे अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.
" भारत " या महासत्ता
बनू पाहणाऱ्या देशात दररोज अंदाजे १ ,४१ ,९६० ( एक लाख एक्केचाळीस हजार नउशे साठ
) व्यक्तींना श्वान दंश होतो.
एक सत्य असे आहे कि भारतातील प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी ( ज्यातील अनेक
प्राणी मित्र मांसाहार मात्र चापून चोपून हाणतात
/ खातात ) त्यांचे फक्त भटक्या कुत्र्यान्वरच प्रेम आहे . आणि त्या प्राणी मित्रांना माहीतच नाही
कि एवढ्या मोठ्या प्रमाणात श्वान दंशाच्या घटना भारतात दररोज घडत आहेत. हा प्राणी मित्रांचा
अतिरेक सगळ्याच भारतीयांना महाग पडणार आहे.
काय तुम्हाला , तुमच्या
मुला बाळांना , नातेवाईकांना अजूनही श्वान
दंश झाला नाही ? काळजी करू नका कधीही , कोठेही , सगळ्या भारतीयांना आयष्यात एकदा ,
अनेकदा श्वान दंश होऊ शकतो कारण एवढ्या भयानक
वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या " भारत " नामक देशात वाढत आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !