Saturday, November 28, 2015

STILL YOU HAVE NOT ENJOYED STRAY DOG BITE ? काय आपणाला अजूनही श्वान दंश झाला नाही ?

सुंदर सकाळ आणि नमस्कार ,

आपणाला श्वान दंश झाला का ?

काय म्हणालात नाही ?

अरेरे किती दुर्दैवी आहात तुम्ही .

पण अजूनही संधी गेली नाही , असेच आपण " भटक्या कुत्र्याच्या त्रासावर " गप्प बसलात तर आपल्याला हि श्वान दंश लवकरच होईल.

काही वर्षात भारत या देशात श्वान दंश न झालेली व्यक्ती ( राजकारणी , नेते, मंत्री सोडून  ) शोधून सापडणार नाही.

" TIMES  OF  INDIA "  व " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त्त्पात्रातील २८.११.२०१५ च्या अंकातील या बातम्या यासोबत जोडत आहे.

गेली अंदाजे ४ एक वर्षे मी या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढणाऱ्या संख्येवर मी लढत आहे. अनेकवेळा शासन दरबारी हा प्रश्न नेला आहे.

आपल्या  भारत देश हा जगात एकमेव असा देश आहे  कि कोणताही प्रश्न अतिशय गंभीर  स्वरूप धारण केल्याशिवाय  त्यावर उपाय योजना करायची नसते . त्यातही ९९.९ ५ भारतीय नागरिक गप्प बसतात, त्यामुळे शासन काहीच हालचाल करीत नाही.

-          ठाणे  शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे ७०,००० झाली आहे.
-          ठाणे शहरात अंदाजे ३० व्यक्तीना श्वान दंश होतो.
-          भारत या देह्सात दरवर्षी अंदाजे ३५,००० हजार व्यक्ती रेबीस मुळे मृत्युमुखी पडतात.
-          अंदाजे ८० % श्वान दंशाच्या घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील मुलांना श्वान दंश होतो.
-          महाराष्ट्र राज्यात रोज अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.
-          म्हणजेच महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अंदाजे २८,१०,५०० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          " भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          म्हणजेच " भारत " या देशात दरवर्षी अंदाजे ५,१८,१५,४०० श्वान दंशाच्या घटना घडतात,

एका हाताच्या बोटावर मोजता येईल अश्या " प्राणी मित्रांमुळे " ( जे स्वतः मिटक्या मारून मांसाहार करतात - त्यावेळेला त्यांचे प्राणी प्रेम विसरतात )   या भटक्या कुत्र्यांपासून स्व-संरक्षण करण्यासाठी " मानव प्राणी " हातात काठी ग्यायला देखील घाबरतो.

दुसऱ्याला  श्वान दंश झाल्यावर मानव प्राणी गप्प बसतो. " माझ्या बापाचे काय जातो " हे मनात म्हणतो , पण स्वतःला , मुलाबाळांना , आप्तस्वकीयांना  श्वान दंश झाल्यावर मात्र खडबडून जागा होतो. हि आजच्या भारतीय नागरिकाची सत्य कहाणी आहे.

परत एकदा आपण भारतीयांना नम्र विनंती आहे कि भारत या देशात " मानव प्राण्यांचे " अस्तित्व टिकण्यासाठी या लढाईत उतरा , स्वतःवर शेकण्याची वाट पाहू नका .

फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " व्हा.

या प्रश्नावर कसा आवाज उठवायचा या साठी आपण मला  satyajitshah64@gmail.com या इ मेल वर  संपर्क साधू शकता.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





" डान्स बार सुरु होणार " कविता " नवा काळ " शनिवार , २८.११.२०१५ च्या अंकात

नमस्कार , 

एका ताज्या घटनेवर माझ्या कडून ' डान्स बार सुरु होणार " या शीर्षकाची एक कविता लिहिली गेली. 

" नवा काळ " चे मी अत्यंत आभार आहे कि त्यांनी हि कविता , शनिवार , २८.११.२०१५ च्या " नवा काळ " च्या अंकात छापून ती वाचकांपर्यंत नेली. 

आज दिवस भरात मला महाराष्ट्रातील अनेकविध ठिकाणाहून " नवा काळ " च्या वाचकांचे कविता आवडल्याचे दूरध्वनी आले .

माझ्या कविता शक्यतो अश्याच नीर-निराळ्या ताज्या ( कविता लिहिली गेली तेंव्हा ) घटनांवर असतात.

अश्याच अनेक कविता " आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहात आहेत.

हा माझ्या " नागरिक " या व्यक्तीला " जागरूक नागरिक " करण्याच्या उपक्रमातील एक भाग आहे.

आपला अभिप्राय satyajitshah64@gmail.com या ई मेल वर पाठवू शकता.



Monday, November 16, 2015

सर्रास पणे पायदळी तुडविले जाणारे वाहतुकीचे अनेक नियम

नमस्कार ,

सर्रास पणे पायदळी तुडविले जाणारे वाहतुकीचे अनेक नियम

अजून एका महत्वाच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचा श्रीगणेशा केला आहे.

" नवा काळ " ने सोमवार, १६.११.२०१५ च्या अंकात श्री. दिवाकर रावते - परिवहन मंत्री यांना मी  लिहिलेले पत्र छापले आहे.

त्याबद्दल मी जयश्री ताई खाडिलकर - संपादक , मालक यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

कृपया हे वाचा . आपण किती वर्षे गप्प बसणार ?

MOTOR VEHICLE ACT मध्ये वाहतुकीचे सगळे नियम हे सर्व भारतीयांना सम समान पणे लागू आहेत.

आपण e - paper वाचण्यासाठी  http://navakal.org/images/epaper.pdf     येथे CLICK करा. पण क्रमांक ६ वर हे चापून आले आहे.    

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet




Thursday, November 12, 2015

IN INDIA STRAY DOGS ARE BETTER TREATED THAN HUMANS

नमस्कार ,

आपल्या सर्वांना नवीन वर्ष अतिशय सुखा , समाधानाचे व भरभराटीचे जाओ .

या सोबत मी IBN LOKMAT या मराठी वृत्तवाहिनीवरील एका अति भयानक  बातमीबद्दल ( पिसाळलेल्या कुत्र्याचा ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे  यांना  चावा ) माहिती देणारी २ छायाचित्रे जोडत आहे.

हि बातमी दुपारी IBN LOKMAT वर दुपारी अंदाजे २.३० / ३.०० च्या सुमारास  दाखविली ( छायाचित्रात आहे त्या स्वरुपात ) गेली.

कोणीही  येवला, महाराष्ट्र राज्य , भारत येथील त्या ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे ज्यांना पिसाळलेला कुत्रा चावला यांचा कधीच विचार करणार नाहीत. त्या कोणाचाही दोष नसताना , त्यांना श्वान  दन्शाचा हा छळवाद.

पुन्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कि या श्वान दंशाच्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध ,  त्याच प्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्ये च्या प्रश्ना विरुद्ध आवाज उठवा.

तुम्हाला , तुमच्या प्रियजनांना श्वान दंश होई पर्यंत वाट पाहू नकात. लक्ष्यात ठेवा  शासनाला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही.

आपले दुर्दैव आहे कि भारत देशात भटक्या कुत्र्यांचे अति लाड होत आहेत आणि मानव प्राण्याची हेळसांड होत आहे.

उठा जागरूक नागरिक व्हा .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Friday, November 6, 2015

INDIA IS FACING VERY SERIOUS ISSUE OF STRAY DOG MENACE

नमस्कार ,

या सोबत जोडलेल्या ६ नोव्हेंबर , २०१५ च्या " लोकमत " नागपूर व " महाराष्ट्र टाईम्स " नागपूर च्या आवृत्तीमध्ये आलेल्या बातम्या वाचा.

हि अशी दयनीय  परिस्थिती महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी व आपल्या सध्याच्या माननीय , वंदनीय , आदरणीय अश्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामधील आहे.

नागपूरची हि अशी स्थिती तर मग बाकीच्या गावातील , शहरातील काय परिस्थिती असेल याचा विचार करा.

“ठाणे” या महानगरपालिका हद्दीत रोज अंदाजे २५ ते ३० श्वान दंशाच्या घटना घडतात. यावरून गणित मांडले तर महाराष्ट्र नावाच्या राज्यात रोज अंदाजे ७,७७० श्वान दंशाच्या घटना घडतात.

मुंबई मध्ये २०१२ साली ८२,२७४ जणांना श्वान दंश झाला तर २०१३ साली ८१,७१६ जणांना श्वान दंश झाला . म्हणजेच मुंबई मध्ये रोज अंदाजे २२० ते २३० जणांना श्वान दंश होतो. 

कृपया तुम्हाला , तुमच्या जवळच्यांना , तुमच्या आप्त स्वकीयांना श्वान दंश होण्याची व त्यांच्या वर एखादा दुर्धर प्रसंग येण्याची वाट पाहू नकात.
कृपया महाराष्ट्र शासनाच्या https://aaplesarkar.maharashtra.gov.in  या PORTAL  वर भटक्या कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या त्रासाबद्दल त्वरित तक्रार करा .

मी अनेकांसारखे  लोका  सांगे ब्रम्ह्द्यान असे करीत नाही , त्याच प्रमाणे फक्त प्रतिक्रिया देत बसत नाही , गेली ४ ते ५ वर्षे मी व माझे काही समविचारी मित्र या भटक्या कुत्र्यांच्या वाढत चाललेल्या संख्ये  विरुध्द अनेक पातळींवर लढत आहोत .

एक लक्ष्यात घ्या कि एक कुत्री दरवर्षी १२ पिल्लांना जन्म देते , जर हे असेच चालू राहिले तर येत्या काळात " भारत " नावाच्या देशात मानव प्राण्याच्या संख्ये एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या होणार आहे.

वारंवार स्वतःचे PROFILE PICTURES बदलाण्यापेक्ष्या देशाचे PICTURE बदला. 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet