आपल्याला माहितच असेल कि मी . मार्च, २०१३
पासून , ठाणे येथील पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण
( HELMET ) घालावे यासाठी अनेक पातळीवर लढत आहे. त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे , गेल्या
काही महिन्यांमध्ये अंदाजे २०० च्या आसपास पोलिसांना दुचाकीवर शिरस्त्राण नाही
घातले म्हणून दंड झाला आहे. भले हा दंड रुपये १०० असेल पण आज पर्यंत जे घडले
नाही ( म्हणजे पोलिसांना दंड ) हे घडून आले. MOTOR VEHICLE ACT
MVA १२९/१७७ च्या अंतर्गत दुचाकीवर शिरस्त्राण (
HELMET ) घालणे हे सगळ्याच भारतीयांना बंधनकारक आहे.
यासोबत दोन छायाचित्रे जोडत आहे . त्यातील पहिल्या छायाचित्रात आपण
पाहू शकाल कि त्या लाल वाहनाला , जी पोलिसाची आहे , त्याला सुद्धा ज्यामर लावला आहे
व त्या वाहनाच्या चालकाकडून / मालकाकडून ठाणे वाहतूक पोलिसांनी दंड देखील वसूल
केला आहे. दुसऱ्या छायाचित्रातील गाडीला ज्यामर लावला गेला आहे. ती गाडी आहे
अंबरनाथ येथील नगराध्यक्ष यांची. त्यांच्या गाडीला देखील ज्यामर लावला गेला. त्यांच्या
वाहनाच्या चालकाकडून / मालकाकडून देखील वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला
आहे. हि छायाचित्रे मला ठाण्याच्या DCP TRAFFIC DR . रश्मी जी करंदीकर
यांनी whatsapp वर पाठविली आहेत.
२ / ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे
मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांनी पोलिसांनी शिरस्त्राण नाही घातले म्हणून
त्याची जी झाडा झडती घेतली हे कौतुकास्पद आहे. मी मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर (
MOBILE ) संपर्क साधला व त्यांना माझ्या या लढाई बद्दल सांगितलं. त्यांना असेही सांगितलं
कि या पुढे मी पोलिस व राजकारणी यांनी आसन पट्टा ( SEAT BELT ) लावावा या साठी देखील
लढाई चालू करणार आहे . मंत्री श्री. दिवाकर रावते जी यांनी पोलिस व राजकारणी यांनी
वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत या माझ्या मागणीला सहमती दर्शविली. त्यांनी मला
एवढेही सांगितले कि त्यांच्या ४ चाकी वाहनाला काळ्या काचा नाही आहेत.
हे सगळ सांगण्याचा एकच उद्देश
आहे की मला आपल्या सगळ्यांना हे दाखवून द्यायचे आहे की माझ्या सारखा एक अति साम्मान्य
नागरिक देखील या समाजात फार मोठ्ठा बदल घडवून आणू शकतो
या प्रयत्नांना
आताशी थोडे फार यश आले आहे. अजूनही अनेक पोलिस शिरस्त्राण घालात नाहीत, वाहनातील आसन
पट्टा ( SEAT BELT ) लावत नाहीत . काळ्या कुट्ट काचां असलेल्या गाड्या वापरतात. देव
नागरी मध्ये लिहिलेले , अथवा दादा , राम , असे काही तरी लिहिलेले वाहनाचे क्रमांक असतात
, लाल सिग्नल ला थांबत नाहीत , NO PARKING मध्ये गाड्या लावतात , एकेरी मार्ग असतानादेखील
गाडी त्यान घुसावितात. अश्या अनेक प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात.
यथा राजा तथा प्रजा हि म्हण
खरीच आहे. जर नेते , राजकारणी , पोलिस नियम पाळत नाहीत तर मग नागरिक कशाला नियम पाळतील
?
आत्ता तुम्ही
म्हणाल कि पोलिस, राजकारणी , नेते यांना नियम पाळले पाहिजेत हे सांगायची काय
गरज ? त्यांनी स्वतः हून नियम पाळले पाहिजेत. जर तस सगळ सुरळीत होत असत तर मग पंतप्रधान
नरेंद्र मोडी यांना स्वछ भारत अभियान राबवायची काय गरज होती ? ज्या भारत नामक देशात
स्वच्छता ठेवा असे सांगितले जाते त्याच भारत या देशात पोलिस , राजकारणी , नेते यांना
नियम पाळले पाहिजेत हे सांगायची गरज निर्माण झाली आहे.
माझ्या सारखा एक अति सामन्य
नागरिक करून करून किती प्रयत्न करणार ? त्याचप्रमाणे किती नागरिकांपर्यंत पोहोचणार
? तुम्हा सगळ्यांच्या मदतीची जर जोड मिळाली तर अशक्य ते शक्य
घडू शकेल.
जर सगळ्या प्रकारच्या प्रसार
माध्यमांनी माझी हि लढाई सामन्य नागरिकांपर्यंत नेली तर नागरिकांमधून काही माझ्या सारखे
पुढे येउन वाहतुकीचे नियम सगळ्यांनी पाळले पाह्जेत यासाठी पोलिस, राजकारणी , नेते यांच्यावर
दबाव टाकू शकतील.
विचार करा जर एखाद्या अति सामान्य
माणसाच्या प्रयत्नाने देखील समाजात थोडा फार बदल होतो तर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी
तर समाजात किती मोठ्ठा बदल होऊ शकेल ?
Stand up for what is right ,
Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good
People Sit Quiet