Wednesday, May 13, 2015

USE HELMET WHILE RIDING A TWO WHEELER / कृपया दुचाकी चालविताना शिरस्त्राण ( HELMET ) घाला

नमस्कार,

कृपया हे छायाचित्र पहा , म्हणजे आपल्याला सगळे कळू शकेल.

हे एका दुर्दैवी वडिलांनी त्यांच्या गाडीच्या मागील काचेवर लिहिले आहे.

हे असे लिहिण्याची पाळी कोणत्याच वडिलांवरअथवा मुलावर    येवू नये अशी माझी हि प्रामाणिक धडपड आहे.


मी गेली काही वर्षे सगळ्या पोलिस मित्रांनी दु चाकी चालीविताना शिरस्त्राण ( HELMET ) घालावे यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.

त्याची कारणे अशी आहेत .

- पोलिसांनी शिरस्त्राण घातले तर आपोआपच सामान्य जनता हि शिरस्त्राण घालेल.
- जर दुचाकी वरील अपघातात पोलिसाचे देहावसान झाले तर त्याच्या कुटुंबियांना काहीच वेगळी अशी  शासकीय मदत मिळत नाही.

माझे ठाम मत आहे कि नियमासाठी तर शिरस्त्राण घालावेच पण स्वतःच्या संरक्षणासाठी हि शिरस्त्राण जरूर घाला .

जरा आश्चर्य वाटते कि अनेक जण, भ्रमणध्वनी ( MOBILE ) घेतल्यावर त्याला SCRATCH GUARD जरूर विकत घेतात , पण दुचाकी घेतल्यावर मात्र HEAD GUARD म्हणजेच शिरस्त्राण घेत नाहीत.

कृपया स्वतः हि दुचाकी चालविताना शिरस्त्राण वापर व बाकीच्यांनाही शिरस्त्राण वापरण्यासाठी उद्युक्त करा.

विसरू नकात दुचाकी  चा अपघात झाल्यावर वडिलांचा पैसा , ओळख , हुद्दा , पोच , राजकीय वजन इत्यादी काहीच उपयोगी येत नाही . फक्त आणि फक्त उपयोगी ठरू शकते ते म्हणजे शिरस्त्राण .
 
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

No comments:

Post a Comment