Saturday, May 9, 2015

ठाण्यात १३४ पोलिसांवर शिरस्त्राण ( HELMET ) न घातल्याबद्दल कारवाई - एक अति सामान्य भारतीय नागरिक हि समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो

एक  अति  सामान्य  भारतीय नागरिक हि समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो  

ठाण्यात १३४ पोलिसांवर शिरस्त्राण ( HELMET ) न घातल्याबद्दल कारवाई

मी ठाणे , महाराष्ट्र , भारत येथे राहणारा एक अति सामान्य नागरिक.  मार्च, २०१३ च्या सुमारास मी सुरत, गुजरात येथे व्यावसायिक कामासाठी गेलो होतो तेव्हा तेथील, वाहतूक  पोलिस हे वाहतूक नियंत्रण करताना व दु चाकी चालवितांना सुध्धा  शिरस्त्राण ( HELMET ) वापरताना दिसले. 

तेव्हा पासून मी DCP TRAFFIC - THANE यांच्या कडे , ठाणे येथील  सगळ्या पोलिसांनी शिरस्त्राण ( HELMET ) घालावे  यासाठी  पाठपुरावा चालू केला होता. अनेक वाहतूक पोलिस , वाहतूक पोलिस अधिकारी यांच्याशी या संदर्भात मी अनेक वेळा बोललो. त्यावेळच्या ACP TRAFFIC यांच्याकडून याची खातर जमा करून घेतली कि वाहतुकीचे सगळे नियम पोलिसांना देखील लागू आहेत.

तरीही या गोष्टीला काहीच यश येत नव्हते. काही महिन्यान पूर्वी मी माहिती  अधिकाराच्या  नियमांतर्गत किती पोलिसांवर हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई केली याची माहिती मागविली होती . त्यावेळी मला असे उत्तर मिळाले होते कि अशी माहिती मिळू शकत नाही कारण कारवाई केलेल्या व्यक्तीचे कामाचे स्वरूप ( PROFESSION ) दंडाच्या पावतीवर लिहिले जात नाही .

मी जेव्हा पोलिसांना भेटत होतो तेव्हा शिरस्त्राण हे त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे पटवून देत होतो. गेल्या काही महिन्यात २ / ३ पोलिस कर्मचारी दुचाकी वरून पडून  डोक्याला मार लागून निधन पावले हे त्यांच्या ध्यानात आणून देत होतो. पोलिसांच्या हे ध्यानात आणून देत होतो कि  कायद्याचे संरक्षण करणार्यांनीच जर कायदे नाही पाळले तर सामान्य नागरिक कायदे कसे पाळतील.  मला असेही सांगितले गेले कि अशा अपघातग्रस्त पोलीसांच्या कुटुंबाना शासनाकडून काही वेगळी  आर्थिक मदत मिळत नसते.

अनेक पोलिसांना हे माहित होते कि त्यांनी सुध्धा दुचाकीवर शिरस्त्राण घालणे MOTOR VEHICLE ACT MVA १२९/१७७ च्या अंतर्गत बंधनकारक आहे. काही वाहतूक पोलिसांनी मला असे सुचविले कि मी वरिष्ठ अधिकार्यांना भेटले पाहिजे कारण जर वरून आदेश आला तर सगळे पोलिस दु चाकी चालवितांना शिरस्त्राण घालू लागतील.

सरतेशेवटी माझ्या या धडपडीला यश आले व त्यावेळचे DCP TRAFFIC DR . श्रीकांत परोपकारी यांनी  ७-७-२०१४ ला एक परिपत्रक जारी केल व सगळ्या पोलिसांना दुचाकीवर शिरस्त्राण घालणे हे बंधनकारक आहे  याबद्दल जाणीव करून दिली व जर कोणी नाही घातले तर त्यावर कारवाई करण्यात येईल हे त्यात नमूद केले.  मी  त्यावेळचे DCP TRAFFIC DR . श्रीकांत परोपकारी यांचे याबाबत मनापासून आभार मानतो.

त्यानंतर हि मी या विषयाचा पाठपुरावा चालू ठेवला. मी दुचाकी चालविताना शिरस्त्राण न घातलेल्यांची छायाचित्रे ( PHOTO ) काढून DCP TRAFFIC , COMMISSIONER OF POLICE यांना पाठवीत होतो. याचे फळ हळू हळू दिसू लागले. अनेक पोलिस दुचाकी चालविताना शिरस्त्राण घातलेले दिसू लागले आहेत.

या सोबत ६.५.२०१५ ला माहिती  अधिकाराच्या  नियमांतर्गत हाती आलेली माहिती ( ATTACHMENT ) जोडत आहे . आजपर्यंत १३४ पोलिसांवर दुचाकी चालविताना शिरस्त्राण नाही घातले म्हणून कारवाई झाली आहे. माझ्या मते सुरुवात तर चांगली झाली आहे.

कृपया असा गैरसमज करून घेवू नका कि हे सगळ मी माझी शेखी मिरविण्यासाठी लिहित आहे. मला हे दाखवून द्यायचे आहे कि भारतात माझ्यासारखा   एक  अति सामान्य  माणूस देखील समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

भारतात ९९ % नागरिक हेच म्हणतात कि ते स्वतः एकटे काय बदल घडवून आणू शकणार आहेत ? या अशा विचारसरणीने कोणीच बदल घडवून आणण्यासाठी पुढेच येत नसतो. दुर्दैवाने भारतात प्रतिक्रिया देणारे अनेक जण आहेत, पण क्रिया करणारे फारच कमी आहेत.

बर असही नाही कि मी जेष्ठ नागरिक आहे  . माझा स्वतःचा व्यवसाय आहे. व्यवसाय सांभाळून हे सगळ चालू असत.

माझा ठाम विश्वास आहे कि भारतात यथा राजा तथा प्रजा हे चालते. भारतीयांसाठी राजा म्हणजे मंत्री, नेते, राजकारणी , पोलिस हे होत. दुर्दैवाने भारतात राजाच वाहतुकीचे नियम पळत नाही. अनेक नेते, मंत्री, राजकीय व्यक्ती SEAT BELT लावत नाहीत, दुचाकीवर शिरस्त्राण घालत नाहीत , गाडीवर विचित्र नंबर लिहितात इत्यादी . जर या सगळ्यांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे ठरविले तर भारताची प्रगती झपाट्याने होवू शकेल.

माझ ठाम मत आहे कि भारतीय नागरिक हा फक्त " नागरिक " न राहता त्याने " जागरूक   नागरिक " म्हणून रहाव . याने भारतातील अनेक प्रश्न लवकर सुटू शकतील.  नाहीतर भारताची प्रगती हि फक्त कागदोपत्रीच राहील. आपणही "जागरूक नागरिक " बनून आपल्या विभागातील हेल्मेट न घातलेल्या पोलिसांचे फोटो आपल्या विभागातील DCP TRAFFIC यांना पाठवा . त्याचं ई मेल आपल्याला या  http://www.mahapolice.gov.in/mahapolice/jsp/temp/mail.jsp  LINK वर सापडतील.   

चला  सगळ्यांनी मिळून स्वतः नियम पाळूया व इतरांना देखील नियम पाळण्याबद्दल जागरूक करूया.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 






No comments:

Post a Comment