Thursday, March 26, 2015

भारतीयांनो उठा. नुसत " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " बना

नमस्कार ,
२५ मार्च, २०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली हि बातमी सगळ्यांबरोबर SHARE करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप.
हे डॉ. महेश बेडेकर ठाणे , महाराष्ट्र येथील एक नावाजलेले स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यांचे एक अतिशय सुसज्ज असे रुग्णालय आहे . ते त्यांच्या वैद्यकीय पेशात अतिशय मग्न असतात. एवडे मग्न असूनही ते गेली कित्येक वर्षे नागरिकांना त्रास देवून सण साजरे करण्याचे जे प्रकार चालू आहेत त्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहेत.
या लढाईचे फायदे असे होवू घातले आहेत कि नुकतेच न्यायालयाने अश्या या उत्सवाच्या सादरीकरणावर निर्बध आणले आहेत असे एका वर्तमानपत्रात वाचण्यात आले.
हे सगळ सांगण्याचे कारण म्हणजे आजकाल सगळीकडे फक्त " नागरिक " दिसतात , " जागरूक नागरिक " अभावानेच आढळून येतात.
अनेक व्यक्ती वेळ नसल्याचे कारण देतात, माझ्या एकट्याच्या लढण्याने काय फरक पडणार , अशी अनेक कारणे देतात व परिस्थितीशी जुळवून घेवून फक्त दुसऱ्याच्या नावाने बोटे मोडतात.
चला भारतीयांनो उठा. नुसत " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " बना . सभोवतालच्या प्रश्नांवर आवाज उठवा .
कृपया विसरू नका " Evil Triumphs When Good People Sit Quiet "






  • No comments:

    Post a Comment