Saturday, December 13, 2014

चला भारतीय नागरिकांनो आपण स्वतःहून नियम पाळायला सुरुवात करूया.

१४ डिसेंबर २०१४ च्या HELLO ठाणे - लोकमत मध्ये   खालील बातमी आली आहे . 

वाहतूक पोलिस यांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरुद्ध जी मोहीम चालू केली ती कौतुकास्पद आहे .  MOTOR VEHICLE ACT RULE 129/177  प्रमाणे दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालणे सक्तीचे आहे . हा नियम सगळ्यांना लागू आहे. त्यात सगळ्या प्रकारचे पोलिस, राजकीय पक्षाचे नेते , राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , मंत्री , मुख्यमंत्री , सामान्य नागरिक वगैरे सगळ्यां साठी हा  नियम लागू आहे . तरीही आपण पहिले असेल तर बहुतेक पोलिस हेल्मेट न घालता दुचाकी चालवितात . हा प्रश्न मी गेले अनेक महिने अनेक योग्य त्या अधिकाऱ्या पर्यंत लावून धरला आहे .

जर पोलिस, राजकीय वजनदार व्यक्ती , आमदार , खासदार , मंत्री , नगसेवक , VIP , VVIP अश्या व इतर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिनी हेल्मेट घालणे , SEAT BELT लावणे , SIGNAL पाळणे , काळ्या फिल्म न लावणे , विचित्र  पद्धतीने गाडीचा नंबर न लिहिणे अश्या अनेक  गोष्टी स्वतःहून केल्या तर मला खात्री आहे कि सामान्य  नागरिक सुध्धा शिस्तीत वागू लागतील.

प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपणहूनच हेल्मेट घातले पाहिजे.

शिस्त हि वरून खाली येते असा माझा विश्वास आहे .

चला भारतीय नागरिकांनो आपण स्वतःहून नियम पाळायला सुरुवात करूया.




Tuesday, December 9, 2014

गड्या आपला देश बरा - ( एक उपहासात्मक लेख )

आज ( ९.१२.२०१४ ) "नवा काळ" ने माझा पहिला वाहिला लेख " Article " छापला. मनात खूप भीती होती करण पहिला वाहिला लेख, पण सांगायला अतिशय आनंद होतोय कि दिवसभर मला अंदाजे २० / २५ च्या आसपास लेख आवडल्याचे फोन आले .

"नवा काळ" मधला लेख जसा च्या तसा फोटो मध्य आहे व वाचता नाही आला तर तो खाली देत आहे .
लेखात काही चुका आढळल्या किंवा काही सूचना असतील तर अवश्य कळवाव्यात . माझा इ मेल satyajitshah64@gmail.com हा आहे .

नवाकाळ मध्ये आलेला लेख : ९.१२.२०१४

गड्या आपला देश बरा
( एक उपहासात्मक लेख )
६ नोव्हेंबर २०१४ ला बार्सिलोना , स्पेन ला जाण्यासाठी , इस्तंबूल ला दुसर्या विमानाची वाट पाहण्यासाठी थांबलो होतो तेव्हा पासून माझे मन जरा अस्वस्थ , चलबिचल झाले होते.

इस्तंबूल हे मुंबई समोर फार छोटं शहर आहे . असं असूनही , त्यांचा आंतर राष्ट्रीय विमान तळ फारच चांगला व अत्याधुनिक वाटला .

विमान तळातून बाहेरच पार्किंग बघितलं तर फारच मोठं व अगदी व्यवस्थित होत. तरी बर हा हवाई अड्डा काही शहर बाहेर नाही , अगदी शहरात आहे .

विमानातून ( वरून ) इस्तंबूल या शहरच दर्शन झालं. जे पहिला त्यावरून त्या शहरातल्या शासन कर्त्यांच कौतुक वाटलं. बऱ्याच टोलेजंग इमारती एक सारख्या , म्हणजेच व्यवस्थित नियोजन बद्ध दिसल्या . एकावर एक असा एक मोठ्ठा उड्डाण पूल दिसला . कोठेही धोकादायक वळण त्याच्यावर नव्हत. एकावेळी ५ मार्गिकेतून ( LANE ) मधून जाणारे रस्ते बहितले . या शहरापुढे , मुंबई फिकी व नियोजन शुन्य वाटते .

जर हे छोटंसं शहर एवढं पुढारलेलं होऊ शकतं , तर मग आपण भारतीय का नाही करू शकत ?
बार्सिलोना ला उतरलो .

विमानतळ चकाचक , सगळे ओळीने immigration च्या रांगेत उभे . कोठे हि ढकला ढकली नाही , पुढे जाण्याची घाई नाही.

सामान घेण्यासाठी १४ सरकत्या पट्ट्या . कोठे हि गोंधळ नाही.

विमानतळातून फक्त ५ ते १० पावल चाललो तर चक्क ५ मजली गाड्यांच्या तळ . असे ५ मजली ५ गाड्यांच्ये तळ आहेत.

३० km वरच्या एका हॉटेल मध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली होती . मला घ्यायला एक गृहस्थ आले होते. त्यांची गाडी ४ थ्या मजल्यावर होती.

गाडी ने हॉटेल पर्यंत चा प्रवास सुरु झाला आणि मला एकदम बेचैन व्हायला झालं .

अख्या रस्त्यात एकही खड्डा नाही , म्हणजे कित निकृष्ठ दर्ज्याचे रस्ते आहेत इथले . मी खड्डा टिपण्या साठी कॅमेरा तयार ठेवला होता . सगळ मुसळ केरात .

दुसरा धक्का , सगळ्या गाड्यांवर नंबर एका प्रकारच्या ( FONT ) मध्येच लिहिले होते . कोणाच्याही नंबर प्लेट वर राजकीय पक्षाचा झेंडा नव्हता .

एका हि नंबर प्लेट वर BARCELONA XXXX जस आपल्याकडे ( महाराष्ट्र - ०४ - अब - XXXX ) असत तास नव्हतं. किवा कोणत्याही गाडीवर SPANISH भाषेत नंबर लिहिला नव्हता.

एकाही गाडीवर आकडे मोठ्या अक्षरात नव्हते किंवा ते दादा , मामा , असे वाटतील असे लिहिले नव्ह्वते. याचा अर्थ सरळ आहे कि त्यांना त्यांच्या राज्यावर प्रेम नाही. त्यांना त्यांचे दादा , मामा आवडत नाही . त्यांना त्यांच्या भाषेवर प्रेम नाही . मला या त्यांच्या निरस पणाचा खूप राग आला . कोणीही होर्न वाजवत नव्हतं . मला राहावल नाही म्हणून मी त्याला होर्न वाजवायला सांगितला . त्याने माझ्याकडे आचार्याने पाहिलं पण होर्न वाजविला , याच अर्थ त्यांच्या पण गाड्यांना होर्न असतो , पण वेडे लोक होर्न सारखा वाजवायच्या मजेला ते मुकतात बिचारे .

कोणत्याही truck च्या मागे " Father 's blessing " , "Mother 's blessing " , “ O.K. TATA “ , “ HEY U BAD , LET UR FACE B BLACK “वगैरे काहीच लिहिलं नव्ह्वत .

याचा अर्थ त्यांना आई , वडील यांची पुण्याई किवा आशीर्वाद नसतो वाटत . त्यांना TRUCK च्या मागे वेग वेगळं लिहिण्याची CREATIVITY नसते हे हि सिद्ध होतं.

सगळी कडे रस्त्यांवर गावाच नाव , बाकीच्या खुणा वगैरे व्यवस्थित लिहिलेले फलक लावलेले होते . याचा अर्थ त्यांना रस्ता चुकण्यात काय गम्मत असते हे माहित नाही . कोणाला हि रस्ता विचारावा लागत नाही . सगळ कस अगदीच निरस .

एके ठिकाणी त्याने गाडीचा वेग कमी केला , मी विचारल्यावर म्हणाला कि , तेथे वेगाची मर्यादा ८० KM /HR आहे . जर नाही पाळली तर घरी पावती येते व युरो १०० ( म्हणजे अंदाजे रुपये ८००० ते ८५०० एवढा दंड भरावा लागतो .

तेथे आपल्या सारखं चाय- पाणी , तडजोड , मंत्र्याचा , आमदाराचा , नगरसेवकाचा फोन वगैरे चालत नाही . बघा म्हणजे , गुन्हा करून वर सही सलामत सुटण्यात जी मजा आहे हे यांना कोण सांगणार ?

काही अंतरानंतर त्याने वेग वाढवला , कारण तो भाग गाव पासून दूर होतां म्हणून तेथे १२० KM /HR या वेगाने जावू शकत होतो. त्याने सांगितला कि गावात वेग मर्यादा ३० / ५० अशी पण असते .

 त्यांना काय माहित , गर्दीत सुद्धा वेगात गाडी चालवायला काय धाडस लागत व जे फक्त भारतीयान मध्येच आहेत. इथले सगळे लोक बुळे.

सगळ्या सिग्नल ला सगळ्या गाड्या थांबत होत्या . गावात पादचार्याना महामार्ग ओलांडायला पादचारी पूल होते . बऱ्याच ठिकाणी छोटे , मोठे उड्डाण पूल गाड्यांसाठी होते.

एके ठिकाणी रहदारी हळू झाली होती . संध्याकाळ होती, व कार्यालये सुटल्यामुळे, एकदम गाड्या वाढल्या होत्या . पण कोणीही होर्न वाजवत नव्हते , कोणीही आपली मार्गिका सोडून गाडी दुसऱ्या मार्गिकेत घुसवत न्हवते . कोणत्याही सिग्नलला , अथवा traffic jam मध्ये " Your Mother 's .... म्हणजे आपली इथलं ( तुझ्या आईला .... ) वगैरे अशी भांडण दिसली नाहीत .

टोल नाक्यावर सगळे फलकलिहिल्या प्रमाणे जात होते, म्हणजे ट्रक अवजड वाहनांच्य रांगेतून जात होते, कार वगैरे त्यांच्या रांगेतून जात होते . कोणीही मागून येवून मध्येच घुसत नव्हते . कोणीही टोल न देता जात नव्हते . त्यामुळे अशांना पकडणारी मनसे , पिंप वगैरे काहीच दिसत नव्हते.

त्या प्रवासात भरपूर दुचाकी स्वार बघितले , पण एकहि हेल्मेट शिवाय चालवताना नाही बघितला . गम्मत म्हणजे हे सगळा पोलिस नावाचा प्राणी नसतांना सुद्धा . कोणीही हेल्मेट MOTORCYCLE च्या HANDLE ला वगिरे लावून चालवताना नाही पाहिलं . मला त्यांची कीव करावीशी वाटली . त्यांना सांगावासा वाटलं कि अहो आमच्याकडे तर पोलिस हि हेल्मेट घालत नाहीत तर मग आम्ही नागरिकांनी का घालायचे ?

आमच्या कडे नियम हे फक्त कागदावरच असतात व ते फक्त मोडण्यासाठीच असतात . या लोकांना हे कोण शिकवणार ?

या ३० KM च्या प्रवासात मी कोठेही “ BIRTHDAY WISHES TO HONORABLE / RESPECTED / HIGHLY RESPECTED MR. XXXXXXXXXX , FROM MR. …………, MRS……….., KUMAR……….., KUMARI ……………….. AND FRIEND CIRCLE “असे कोणतेच अनधिकृत फलक ( HOARDINGS ) नाही बघितले . थोडक्यात काय , कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाचे , त्याच्या बायकोच्या , मुलाच्या, मुलीच्या, नातवाच्या, नातीच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, पोपटाच्या, ........ कोणा कोणाच्या हि वाढदिवसाचे फलक नाही दिसले . हे काय यौग्य आहे का ? आपल्याकडे कस , अगदी ८ ते १० दिवस सगळीकडे अनधिकृत फलक लावून सगळा शहर विद्रूप केलं जातं, तसं यांना का नाही जमत ? त्यांचं त्यांच्या नेत्यांवर प्रेम नाही , नेत्याच्या कुटुंबावर प्रेम नाही , कुत्र्यांवर प्रेम नाही ...... ? सगळा कस अगदीच निरास .

मला इथल्या लोकांची कीव करावीशी वाटली. शहर विद्रूप करत नाही म्हणजे काय ? मी या विरुद्ध आंदोलन केलं असत . शहर बंद केलं असत . बस फोडल्या असत्या . रेल्वे बंद पडल्या असत्या.

हे खरच भोळे वाटले यांना सार्वजनिक मालमत्ता हि स्वतःची , देशाची वाटते . त्यांना ओरडून सांगावसं वाटल कि , तुम्ही भारतात येवून बघा , आम्हीही सार्वजनिक मालमत्ता स्वतःची , आपलीच समजतो पण कसं सार्वजनिक मालमत्ता हि आपली समजून आम्ही तिचं नुकसान करतो. नवीन रस्त्यावर मंडप उभे करायला दर वर्षी कसे खड्डे करतो . सणांना कसे मंडप उभे करून रस्ता अडवितो . किती सांगू तुम्हाला इथल्या लोकांचे हे अडाणीपण ?

त्यांच्या दूरचित्रवाणीवर कोणत्याही channel वर वाढदिवसाच्या शुभेच्चा देणाऱ्या जाहिराती नाही दिसल्या . किती निष्ठुर आहेत इथले मतदार , त्यांचे त्यांच्या नेत्यांवर प्रेम नाही. काय म्हणावे याला ?

इथल्या भाजी मंडईत गेलो होतो , आपल्याप्रमाणेच भरपूर गर्दी होती . पण कोठेही आरडा ओरड नाही . सगळा शांत पाने चालू होतं. प्रत्यक जन दुसऱ्याच विकत घेवून होई पर्यंत थांबत होत.
त्यांच्याकडे छतावरून टांगलेला इलेक्ट्रोनिक वजन काटा होता. त्यात भारतासारखं वजन मारण्याचा भाग्य विक्रेत्याला नव्हतं. जेवढा वजन , तेवढं BILL PRINT होवून यायचं . घासा घीस नाही . एकच भाव . सगळा एकदम मुळमुळीत . अजून एक बघितलं, तेथे कोणीही , भैय्या और २ डालो , कडीपत्ता फ्री देदो वगैरे काहीच नाही . याला काय अर्थ आहे ? फुकट घेणं , मागणे हा आपला मुलभूत हक्क आहे, आणि यांना हा हक्क माहित नाही ? बिचारे !

अजून एक भारतीयांच्या दृष्टीने फार महत्वाच असं बघितलं . एवढ्या मोठ्या , पण छोट्या वाटा असलेल्या ( आपल्याकडे ठाण्यात जस जांभळी मार्केट आहे अगदी तसंच ) , कोणालाही , स्कूटर वर, CYCLE वर आत मंडई त एवढ्या माणसांच्या गर्दीत खरेदी करायला आलेला बघितलं नाही . नि तर जांभळी च्या मंडई त नेहमी पाहतो कि जेथे चालायला जागा नाही तेथे काही वीर , १ / २ किलो भाजी घ्यायला दु चाकी घेवून चालवत मंडई त फिरत असतात . दुसर्यांना त्याचा किती त्रास होतो याची त्यांना काहीच चिंता नसते. आपल्या मानाने इथले ग्राहक अगदीच वेडे, अडाणी , बुळे वाटले.

रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी , किव्वा एका रस्त्या वरून दुसर्या रस्त्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी आहे . थेथून गेलो तर तेथेही मला धक्का बसला . सगळा भुयारी मार्ग स्वच होता. कोणीही ठुन्कालेला नव्हत . कोणत्याही भिंतीवर SEX च्या कामाजोरीसाठी एखाद्या डॉक्टर ची जाहिरात नव्हती . हे म्हणजे त्यांचे अगदीच मागासलेले लक्षण वाटले.

भुयारी मार्गातून बाहेर आल्यावर पाहतो तर काय, सगळ्या गाड्या फक्त पार्किंग मध्येच उभ्या केल्या होत्या . अपंगांसाठी राखीव पार्कंग ( तेथे बाकी कोणी गाडी उभी करत नाही ) ( आपल्याकडे तर अपंगांच्या लोकल च्या डब्यातून धडधाकट लोकांना जायला मोठेपणा वाटतो ) . रस्त्यावर बस साठी वेगळी मार्गिका , तेथे बाकी कोणीच गाडी चालवत नाही. ट्रक , व इतर जड वाहने फक्त त्यांच्यात मार्गिकेतून जात होते.

येथे आजून एक वेडेपणा मी पहिला . वाहन चालक , पादचार्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी स्वतःहून थांबतात. हे मला ( एका भारतीयाला )फारच दाक्कादायक वाटल . कारण भारतात पादचार्यांना भटक्य कुत्र्यांपेक्ष्या वाईट वागणूक मिळते. भटक्या कुत्र्यां मुळे  एक आठवण आली कि , मी येथे भटके कुत्रे  पहिलेच नाही . मी आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी , पहाटे आमच्या इमारतीच्या जवळ उभी असलेली taxi त भटक्या कुत्र्यांच्या ताफ्या तून सुटून कशी पकडली हि एक फार मोठी साहसिक कहाणी आहे. या असल्या साहसाला , इथले गोरे लोक अगदीच मुकतात . आपल्याला या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून बचावण्यासाठी जे शारीरिक कौशल्य दाखवाव लागत याच त्यांना काहीच द्यान नाही. मला या लोकांची कीव आली व मी यांच्या पेक्षा किती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे हे लक्ष्यात येवून माझा उर भरून आला..

एका समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो . फारच कंटाळा आला . कोठेही घन नाही , कचरा नाही, लाघवी चा सुगंध नाही , थुंकलेलं रंगीबेरंगी काम नाही.

खरं सांगा तुम्हालाही हे सगळा वाचायला कंटाळा आला ना, मग विचार करा, माझी किती  वाईट अवस्था तेथे झाली असेल.

सगळा काही सुरळीत , नियमा प्रमाणे . अगदी काटेकोर पणे . याला काही अर्थ आहे का ? मला तर फारच कंटाळवाणा वाटल हे सगळं.

या परदेशी गोऱ्यांना नियम तोडण्यात काय साहस ( THRILL ) असतं हे माहीतच नाही.

इथले लोक उगीचच SKYING , PARAGLIDING अशा खेळांना साहसी खेळ मानतात . व असे खेळ खेळत असतात.

त्यांना मला ओरडून सांगावस वाटल कि , आम्ही भारतीय , तुमच्या पेक्षा किती तरी पटीने साहसी आहोत .

उदाहरणार्थ सांगायचे झाले तर , सिग्नल न पाळणे , triple seat दुचाकीवर बसंणे , रहदारीचे नियम न पाळणे , वाहतूक पोलीसा समोर traffic सिग्नल तोडणे , गर्दीच्या रस्त्यात दुचाकी , चार चाकी भन्नाट वेगात चालवणे , एखाद्या मुलीला हूल देणे, काहीही झालं तरी शिव्यांची लाखोली वाहणे, लगेचच हमारातुरीवर येणे , सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन वाहनाच्या काचा काळ्या कुट्ट ढेवणे , पोलिसाशी हुज्जत घालणे , चुकून पकडलं गेला तर , व्यवस्थित ओळख काढून सहीसलामत सुटण , गाड्यांवर विचित्र प्रकारे registration नंबर लिहिणे ( दादा , मामा , महाराष्ट्र वगैरे ) , गरज नसताना होर्न वाजवणे . भयानक आवाजाचे होर्न गाड्यांना लावणे , विचित्र आवाजाचा REVERSE HORN लावणे , TOLL नाक्यावर मागून येवू, रांग मोडून गाडी घुसवणे , TOLL न भरता दादागिरी करून जाणे , पोलिसावर हात उगारणे , काही झालं तरी मित्रांना बोलावून तोड फोड करणे , वगैरे वगैरे ( अशा आजून अनेक धाडसी गोष्टी आहेत ज्या भारतीय नित्य नियमाने करत असतात ) .
आता तुम्हीच सांगा , हे सगळं करण्यासाठी अंगात धाडस, साहस असाव लागता कि नाही ?

यातल काहीच या पाश्चात्य , गोऱ्या लोकांकडे नाही , त्यामुळेच मला ते लोक अजिबातच माग्गासालेला व अतिशय कमी धाडसी वाटले .

मला भारतीय लोकांच्या या सगळ्या धाडसी गोष्टी आठवून , मी भारतीय आहे म्हणून माझा उर भरून आला , व भारतीयां बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला .

गड्या आपलाच देश बरा.


Monday, December 8, 2014

आमदार श्री. संजय केळकर , यांच्या अजून एका संघर्षाला यश आले आहे .

आमदार श्री. संजय केळकर , जे मुळात समाजकारणी आहेत , त्याच्या अजून एका संघर्षाला  यश आले आहे .

गेली अनेक वर्षे कोपरी ब्रिज चे चौपदरीकरण,  मान्यता मिळून हि अडकून पडले होते , त्याचा पाठ पुरावा श्री. संजय केळकर यांनी , आमदार नसतानाही लक्ष्य घालून पाठपुरावा सुरु केला होता व चालू ठेवला होता .

आता ठाणेकरांच्या वाहतूक कोंडी च्या त्रासातून सुटण्याचा मार्ग लवकरच चौपदरी होईल .


Saturday, December 6, 2014

उद्घाटना अगोदरच कापुरबावडी ( माजिवडा ), ठाणे येथील नवीन उड्डाण पुलाचा SLAB पाडावा लागला .

उद्घाटना अगोदरच कापुरबावडी ( माजिवडा ), ठाणे येथील  नवीन उड्डाण पुलाचा SLAB पाडावा लागला .

याच उड्डाण पुलाच बळजबरीने उद्घाटन एका लोकप्रतिनिधी यांनी केले होते .

अजूनही या उड्डाण पुलामध्ये बरेचशे तांत्रिक दोष आहेत . हे दोष दूर नाही केले तर , हा उड्डाण पूल हा एक " अपघातकी " उड्डाण पूल ठरण्याचा धोका संभवतो . वाहतूक पोलिस , माझ्या सारखे नागरिक , आणि आमदार श्री. संजय केळकर या सगळ्यांचा पाठ पुरावा शासन दरबारी चालू आहे .

असा हा धोकादायक , तांत्रिक दृष्ट्या दोष असणारा उड्डाण पूल का बांधला याचे उत्तर शासन दरबारी नाही .

या उड्डाण पुलाची नाशिक मार्गिका जून , २०१४ ला वाजत गाजत चालू केली , पण अजूनही या मार्गिकेवर ची कामे संपली नाहीत . या मार्गीकेवरच्या रस्त्यावरचा पृष्ठभाग ( SURFACE  ) अजूनही तांत्रिक दृष्ट्या योग्य नाही.

भारत प्रगतीच्या मार्गावर आहे असे अजिबात वाटत नाही.



Evil Triumphs When Good People Sit Quiet


Stand up for what is right , Even if you’re standing alone !





 

Sunday, November 23, 2014

कोपरी पुलाच्या रुंदीकरणाच्या मागणी साठी दंड थोपटा.

ठाणेकर नागरिकांनो , दंड होतो म्हणून हेल्मेट सक्ती च्या विरुद्ध दंड थोपटण्या पेक्षा , कोपरी पुलाच्या रुंदीकरणाच्या मागणी साठी दंड थोपटा. गेले ११ वर्षे रुंदीकरणाला परवानगी मिळूनही अजून काहीही झालेलं नाही . १० वर्षांपूर्वी हे रुंदीकरण ९ Cr ला होणार होत ते आत्ता ५० Cr ला पोहोचलं आहे .

या साठी श्री. संजय केळकर साहेब , प्रयत्न शील आहेत .

हा विषय घेतल्या बद्दल मी पुढारी चे श्री. प्रशांत सिनकर यांचा आभारी  आहे.



वाहन सावकाश चालवा

वेगाने वाहन ( दु चाकी , चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) चालाविणार्यानो ,
हे वाचा व नेहमी   लक्ष्यात ठेवा .

जेवढ्या वेगाने वाहन चालवाल
               तेवढ्या च वेगाने वर जाल
वाहन सावकाश चालवा
              गंभीर  दुर्घटनेची शक्यता टाळा


Saturday, November 22, 2014

Wearing Helmet - PREVENTION IS BETTER THAN CURE


Mobile  ची किंमत १०००० ते ५०००० व अश्या  mobile ला SCRATCHES पासून वाचवण्या साठी ४०० ते १००० चे SCREEN GUARD आठवणीने लावतो ,
पण स्वतःच्या डोक्या चे  अपघातातून सौरक्षण करण्यासाठी मात्र साधे ४०० ते १००० चे हेल्मेट नाही घालत ?
एवढा स्वस्त तुमचा स्वतःचा  जीव  आहे ?

विसरलात का PREVENTION IS BETTER THAN CURE ?

लढण्यासाठी अनेक चांगले विषय आहेत.

जसं आपण कपडे घालायला विसरत नाही ,
तसं हेल्मेट घालून दुचाकी चालवायला विसरू नका .
हे तुमच्याच भल्यासाठी आहे .