Tuesday, December 9, 2014

गड्या आपला देश बरा - ( एक उपहासात्मक लेख )

आज ( ९.१२.२०१४ ) "नवा काळ" ने माझा पहिला वाहिला लेख " Article " छापला. मनात खूप भीती होती करण पहिला वाहिला लेख, पण सांगायला अतिशय आनंद होतोय कि दिवसभर मला अंदाजे २० / २५ च्या आसपास लेख आवडल्याचे फोन आले .

"नवा काळ" मधला लेख जसा च्या तसा फोटो मध्य आहे व वाचता नाही आला तर तो खाली देत आहे .
लेखात काही चुका आढळल्या किंवा काही सूचना असतील तर अवश्य कळवाव्यात . माझा इ मेल satyajitshah64@gmail.com हा आहे .

नवाकाळ मध्ये आलेला लेख : ९.१२.२०१४

गड्या आपला देश बरा
( एक उपहासात्मक लेख )
६ नोव्हेंबर २०१४ ला बार्सिलोना , स्पेन ला जाण्यासाठी , इस्तंबूल ला दुसर्या विमानाची वाट पाहण्यासाठी थांबलो होतो तेव्हा पासून माझे मन जरा अस्वस्थ , चलबिचल झाले होते.

इस्तंबूल हे मुंबई समोर फार छोटं शहर आहे . असं असूनही , त्यांचा आंतर राष्ट्रीय विमान तळ फारच चांगला व अत्याधुनिक वाटला .

विमान तळातून बाहेरच पार्किंग बघितलं तर फारच मोठं व अगदी व्यवस्थित होत. तरी बर हा हवाई अड्डा काही शहर बाहेर नाही , अगदी शहरात आहे .

विमानातून ( वरून ) इस्तंबूल या शहरच दर्शन झालं. जे पहिला त्यावरून त्या शहरातल्या शासन कर्त्यांच कौतुक वाटलं. बऱ्याच टोलेजंग इमारती एक सारख्या , म्हणजेच व्यवस्थित नियोजन बद्ध दिसल्या . एकावर एक असा एक मोठ्ठा उड्डाण पूल दिसला . कोठेही धोकादायक वळण त्याच्यावर नव्हत. एकावेळी ५ मार्गिकेतून ( LANE ) मधून जाणारे रस्ते बहितले . या शहरापुढे , मुंबई फिकी व नियोजन शुन्य वाटते .

जर हे छोटंसं शहर एवढं पुढारलेलं होऊ शकतं , तर मग आपण भारतीय का नाही करू शकत ?
बार्सिलोना ला उतरलो .

विमानतळ चकाचक , सगळे ओळीने immigration च्या रांगेत उभे . कोठे हि ढकला ढकली नाही , पुढे जाण्याची घाई नाही.

सामान घेण्यासाठी १४ सरकत्या पट्ट्या . कोठे हि गोंधळ नाही.

विमानतळातून फक्त ५ ते १० पावल चाललो तर चक्क ५ मजली गाड्यांच्या तळ . असे ५ मजली ५ गाड्यांच्ये तळ आहेत.

३० km वरच्या एका हॉटेल मध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली होती . मला घ्यायला एक गृहस्थ आले होते. त्यांची गाडी ४ थ्या मजल्यावर होती.

गाडी ने हॉटेल पर्यंत चा प्रवास सुरु झाला आणि मला एकदम बेचैन व्हायला झालं .

अख्या रस्त्यात एकही खड्डा नाही , म्हणजे कित निकृष्ठ दर्ज्याचे रस्ते आहेत इथले . मी खड्डा टिपण्या साठी कॅमेरा तयार ठेवला होता . सगळ मुसळ केरात .

दुसरा धक्का , सगळ्या गाड्यांवर नंबर एका प्रकारच्या ( FONT ) मध्येच लिहिले होते . कोणाच्याही नंबर प्लेट वर राजकीय पक्षाचा झेंडा नव्हता .

एका हि नंबर प्लेट वर BARCELONA XXXX जस आपल्याकडे ( महाराष्ट्र - ०४ - अब - XXXX ) असत तास नव्हतं. किवा कोणत्याही गाडीवर SPANISH भाषेत नंबर लिहिला नव्हता.

एकाही गाडीवर आकडे मोठ्या अक्षरात नव्हते किंवा ते दादा , मामा , असे वाटतील असे लिहिले नव्ह्वते. याचा अर्थ सरळ आहे कि त्यांना त्यांच्या राज्यावर प्रेम नाही. त्यांना त्यांचे दादा , मामा आवडत नाही . त्यांना त्यांच्या भाषेवर प्रेम नाही . मला या त्यांच्या निरस पणाचा खूप राग आला . कोणीही होर्न वाजवत नव्हतं . मला राहावल नाही म्हणून मी त्याला होर्न वाजवायला सांगितला . त्याने माझ्याकडे आचार्याने पाहिलं पण होर्न वाजविला , याच अर्थ त्यांच्या पण गाड्यांना होर्न असतो , पण वेडे लोक होर्न सारखा वाजवायच्या मजेला ते मुकतात बिचारे .

कोणत्याही truck च्या मागे " Father 's blessing " , "Mother 's blessing " , “ O.K. TATA “ , “ HEY U BAD , LET UR FACE B BLACK “वगैरे काहीच लिहिलं नव्ह्वत .

याचा अर्थ त्यांना आई , वडील यांची पुण्याई किवा आशीर्वाद नसतो वाटत . त्यांना TRUCK च्या मागे वेग वेगळं लिहिण्याची CREATIVITY नसते हे हि सिद्ध होतं.

सगळी कडे रस्त्यांवर गावाच नाव , बाकीच्या खुणा वगैरे व्यवस्थित लिहिलेले फलक लावलेले होते . याचा अर्थ त्यांना रस्ता चुकण्यात काय गम्मत असते हे माहित नाही . कोणाला हि रस्ता विचारावा लागत नाही . सगळ कस अगदीच निरस .

एके ठिकाणी त्याने गाडीचा वेग कमी केला , मी विचारल्यावर म्हणाला कि , तेथे वेगाची मर्यादा ८० KM /HR आहे . जर नाही पाळली तर घरी पावती येते व युरो १०० ( म्हणजे अंदाजे रुपये ८००० ते ८५०० एवढा दंड भरावा लागतो .

तेथे आपल्या सारखं चाय- पाणी , तडजोड , मंत्र्याचा , आमदाराचा , नगरसेवकाचा फोन वगैरे चालत नाही . बघा म्हणजे , गुन्हा करून वर सही सलामत सुटण्यात जी मजा आहे हे यांना कोण सांगणार ?

काही अंतरानंतर त्याने वेग वाढवला , कारण तो भाग गाव पासून दूर होतां म्हणून तेथे १२० KM /HR या वेगाने जावू शकत होतो. त्याने सांगितला कि गावात वेग मर्यादा ३० / ५० अशी पण असते .

 त्यांना काय माहित , गर्दीत सुद्धा वेगात गाडी चालवायला काय धाडस लागत व जे फक्त भारतीयान मध्येच आहेत. इथले सगळे लोक बुळे.

सगळ्या सिग्नल ला सगळ्या गाड्या थांबत होत्या . गावात पादचार्याना महामार्ग ओलांडायला पादचारी पूल होते . बऱ्याच ठिकाणी छोटे , मोठे उड्डाण पूल गाड्यांसाठी होते.

एके ठिकाणी रहदारी हळू झाली होती . संध्याकाळ होती, व कार्यालये सुटल्यामुळे, एकदम गाड्या वाढल्या होत्या . पण कोणीही होर्न वाजवत नव्हते , कोणीही आपली मार्गिका सोडून गाडी दुसऱ्या मार्गिकेत घुसवत न्हवते . कोणत्याही सिग्नलला , अथवा traffic jam मध्ये " Your Mother 's .... म्हणजे आपली इथलं ( तुझ्या आईला .... ) वगैरे अशी भांडण दिसली नाहीत .

टोल नाक्यावर सगळे फलकलिहिल्या प्रमाणे जात होते, म्हणजे ट्रक अवजड वाहनांच्य रांगेतून जात होते, कार वगैरे त्यांच्या रांगेतून जात होते . कोणीही मागून येवून मध्येच घुसत नव्हते . कोणीही टोल न देता जात नव्हते . त्यामुळे अशांना पकडणारी मनसे , पिंप वगैरे काहीच दिसत नव्हते.

त्या प्रवासात भरपूर दुचाकी स्वार बघितले , पण एकहि हेल्मेट शिवाय चालवताना नाही बघितला . गम्मत म्हणजे हे सगळा पोलिस नावाचा प्राणी नसतांना सुद्धा . कोणीही हेल्मेट MOTORCYCLE च्या HANDLE ला वगिरे लावून चालवताना नाही पाहिलं . मला त्यांची कीव करावीशी वाटली . त्यांना सांगावासा वाटलं कि अहो आमच्याकडे तर पोलिस हि हेल्मेट घालत नाहीत तर मग आम्ही नागरिकांनी का घालायचे ?

आमच्या कडे नियम हे फक्त कागदावरच असतात व ते फक्त मोडण्यासाठीच असतात . या लोकांना हे कोण शिकवणार ?

या ३० KM च्या प्रवासात मी कोठेही “ BIRTHDAY WISHES TO HONORABLE / RESPECTED / HIGHLY RESPECTED MR. XXXXXXXXXX , FROM MR. …………, MRS……….., KUMAR……….., KUMARI ……………….. AND FRIEND CIRCLE “असे कोणतेच अनधिकृत फलक ( HOARDINGS ) नाही बघितले . थोडक्यात काय , कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाचे , त्याच्या बायकोच्या , मुलाच्या, मुलीच्या, नातवाच्या, नातीच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, पोपटाच्या, ........ कोणा कोणाच्या हि वाढदिवसाचे फलक नाही दिसले . हे काय यौग्य आहे का ? आपल्याकडे कस , अगदी ८ ते १० दिवस सगळीकडे अनधिकृत फलक लावून सगळा शहर विद्रूप केलं जातं, तसं यांना का नाही जमत ? त्यांचं त्यांच्या नेत्यांवर प्रेम नाही , नेत्याच्या कुटुंबावर प्रेम नाही , कुत्र्यांवर प्रेम नाही ...... ? सगळा कस अगदीच निरास .

मला इथल्या लोकांची कीव करावीशी वाटली. शहर विद्रूप करत नाही म्हणजे काय ? मी या विरुद्ध आंदोलन केलं असत . शहर बंद केलं असत . बस फोडल्या असत्या . रेल्वे बंद पडल्या असत्या.

हे खरच भोळे वाटले यांना सार्वजनिक मालमत्ता हि स्वतःची , देशाची वाटते . त्यांना ओरडून सांगावसं वाटल कि , तुम्ही भारतात येवून बघा , आम्हीही सार्वजनिक मालमत्ता स्वतःची , आपलीच समजतो पण कसं सार्वजनिक मालमत्ता हि आपली समजून आम्ही तिचं नुकसान करतो. नवीन रस्त्यावर मंडप उभे करायला दर वर्षी कसे खड्डे करतो . सणांना कसे मंडप उभे करून रस्ता अडवितो . किती सांगू तुम्हाला इथल्या लोकांचे हे अडाणीपण ?

त्यांच्या दूरचित्रवाणीवर कोणत्याही channel वर वाढदिवसाच्या शुभेच्चा देणाऱ्या जाहिराती नाही दिसल्या . किती निष्ठुर आहेत इथले मतदार , त्यांचे त्यांच्या नेत्यांवर प्रेम नाही. काय म्हणावे याला ?

इथल्या भाजी मंडईत गेलो होतो , आपल्याप्रमाणेच भरपूर गर्दी होती . पण कोठेही आरडा ओरड नाही . सगळा शांत पाने चालू होतं. प्रत्यक जन दुसऱ्याच विकत घेवून होई पर्यंत थांबत होत.
त्यांच्याकडे छतावरून टांगलेला इलेक्ट्रोनिक वजन काटा होता. त्यात भारतासारखं वजन मारण्याचा भाग्य विक्रेत्याला नव्हतं. जेवढा वजन , तेवढं BILL PRINT होवून यायचं . घासा घीस नाही . एकच भाव . सगळा एकदम मुळमुळीत . अजून एक बघितलं, तेथे कोणीही , भैय्या और २ डालो , कडीपत्ता फ्री देदो वगैरे काहीच नाही . याला काय अर्थ आहे ? फुकट घेणं , मागणे हा आपला मुलभूत हक्क आहे, आणि यांना हा हक्क माहित नाही ? बिचारे !

अजून एक भारतीयांच्या दृष्टीने फार महत्वाच असं बघितलं . एवढ्या मोठ्या , पण छोट्या वाटा असलेल्या ( आपल्याकडे ठाण्यात जस जांभळी मार्केट आहे अगदी तसंच ) , कोणालाही , स्कूटर वर, CYCLE वर आत मंडई त एवढ्या माणसांच्या गर्दीत खरेदी करायला आलेला बघितलं नाही . नि तर जांभळी च्या मंडई त नेहमी पाहतो कि जेथे चालायला जागा नाही तेथे काही वीर , १ / २ किलो भाजी घ्यायला दु चाकी घेवून चालवत मंडई त फिरत असतात . दुसर्यांना त्याचा किती त्रास होतो याची त्यांना काहीच चिंता नसते. आपल्या मानाने इथले ग्राहक अगदीच वेडे, अडाणी , बुळे वाटले.

रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी , किव्वा एका रस्त्या वरून दुसर्या रस्त्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी आहे . थेथून गेलो तर तेथेही मला धक्का बसला . सगळा भुयारी मार्ग स्वच होता. कोणीही ठुन्कालेला नव्हत . कोणत्याही भिंतीवर SEX च्या कामाजोरीसाठी एखाद्या डॉक्टर ची जाहिरात नव्हती . हे म्हणजे त्यांचे अगदीच मागासलेले लक्षण वाटले.

भुयारी मार्गातून बाहेर आल्यावर पाहतो तर काय, सगळ्या गाड्या फक्त पार्किंग मध्येच उभ्या केल्या होत्या . अपंगांसाठी राखीव पार्कंग ( तेथे बाकी कोणी गाडी उभी करत नाही ) ( आपल्याकडे तर अपंगांच्या लोकल च्या डब्यातून धडधाकट लोकांना जायला मोठेपणा वाटतो ) . रस्त्यावर बस साठी वेगळी मार्गिका , तेथे बाकी कोणीच गाडी चालवत नाही. ट्रक , व इतर जड वाहने फक्त त्यांच्यात मार्गिकेतून जात होते.

येथे आजून एक वेडेपणा मी पहिला . वाहन चालक , पादचार्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी स्वतःहून थांबतात. हे मला ( एका भारतीयाला )फारच दाक्कादायक वाटल . कारण भारतात पादचार्यांना भटक्य कुत्र्यांपेक्ष्या वाईट वागणूक मिळते. भटक्या कुत्र्यां मुळे  एक आठवण आली कि , मी येथे भटके कुत्रे  पहिलेच नाही . मी आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी , पहाटे आमच्या इमारतीच्या जवळ उभी असलेली taxi त भटक्या कुत्र्यांच्या ताफ्या तून सुटून कशी पकडली हि एक फार मोठी साहसिक कहाणी आहे. या असल्या साहसाला , इथले गोरे लोक अगदीच मुकतात . आपल्याला या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून बचावण्यासाठी जे शारीरिक कौशल्य दाखवाव लागत याच त्यांना काहीच द्यान नाही. मला या लोकांची कीव आली व मी यांच्या पेक्षा किती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे हे लक्ष्यात येवून माझा उर भरून आला..

एका समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो . फारच कंटाळा आला . कोठेही घन नाही , कचरा नाही, लाघवी चा सुगंध नाही , थुंकलेलं रंगीबेरंगी काम नाही.

खरं सांगा तुम्हालाही हे सगळा वाचायला कंटाळा आला ना, मग विचार करा, माझी किती  वाईट अवस्था तेथे झाली असेल.

सगळा काही सुरळीत , नियमा प्रमाणे . अगदी काटेकोर पणे . याला काही अर्थ आहे का ? मला तर फारच कंटाळवाणा वाटल हे सगळं.

या परदेशी गोऱ्यांना नियम तोडण्यात काय साहस ( THRILL ) असतं हे माहीतच नाही.

इथले लोक उगीचच SKYING , PARAGLIDING अशा खेळांना साहसी खेळ मानतात . व असे खेळ खेळत असतात.

त्यांना मला ओरडून सांगावस वाटल कि , आम्ही भारतीय , तुमच्या पेक्षा किती तरी पटीने साहसी आहोत .

उदाहरणार्थ सांगायचे झाले तर , सिग्नल न पाळणे , triple seat दुचाकीवर बसंणे , रहदारीचे नियम न पाळणे , वाहतूक पोलीसा समोर traffic सिग्नल तोडणे , गर्दीच्या रस्त्यात दुचाकी , चार चाकी भन्नाट वेगात चालवणे , एखाद्या मुलीला हूल देणे, काहीही झालं तरी शिव्यांची लाखोली वाहणे, लगेचच हमारातुरीवर येणे , सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन वाहनाच्या काचा काळ्या कुट्ट ढेवणे , पोलिसाशी हुज्जत घालणे , चुकून पकडलं गेला तर , व्यवस्थित ओळख काढून सहीसलामत सुटण , गाड्यांवर विचित्र प्रकारे registration नंबर लिहिणे ( दादा , मामा , महाराष्ट्र वगैरे ) , गरज नसताना होर्न वाजवणे . भयानक आवाजाचे होर्न गाड्यांना लावणे , विचित्र आवाजाचा REVERSE HORN लावणे , TOLL नाक्यावर मागून येवू, रांग मोडून गाडी घुसवणे , TOLL न भरता दादागिरी करून जाणे , पोलिसावर हात उगारणे , काही झालं तरी मित्रांना बोलावून तोड फोड करणे , वगैरे वगैरे ( अशा आजून अनेक धाडसी गोष्टी आहेत ज्या भारतीय नित्य नियमाने करत असतात ) .
आता तुम्हीच सांगा , हे सगळं करण्यासाठी अंगात धाडस, साहस असाव लागता कि नाही ?

यातल काहीच या पाश्चात्य , गोऱ्या लोकांकडे नाही , त्यामुळेच मला ते लोक अजिबातच माग्गासालेला व अतिशय कमी धाडसी वाटले .

मला भारतीय लोकांच्या या सगळ्या धाडसी गोष्टी आठवून , मी भारतीय आहे म्हणून माझा उर भरून आला , व भारतीयां बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला .

गड्या आपलाच देश बरा.


No comments:

Post a Comment