वाहतूक पोलिस यांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरुद्ध जी मोहीम चालू केली ती कौतुकास्पद आहे . MOTOR VEHICLE ACT RULE 129/177 प्रमाणे दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालणे सक्तीचे आहे . हा नियम सगळ्यांना लागू आहे. त्यात सगळ्या प्रकारचे पोलिस, राजकीय पक्षाचे नेते , राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , मंत्री , मुख्यमंत्री , सामान्य नागरिक वगैरे सगळ्यां साठी हा नियम लागू आहे . तरीही आपण पहिले असेल तर बहुतेक पोलिस हेल्मेट न घालता दुचाकी चालवितात . हा प्रश्न मी गेले अनेक महिने अनेक योग्य त्या अधिकाऱ्या पर्यंत लावून धरला आहे .
जर पोलिस, राजकीय वजनदार व्यक्ती , आमदार , खासदार , मंत्री , नगसेवक , VIP , VVIP अश्या व इतर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिनी हेल्मेट घालणे , SEAT BELT लावणे , SIGNAL पाळणे , काळ्या फिल्म न लावणे , विचित्र पद्धतीने गाडीचा नंबर न लिहिणे अश्या अनेक गोष्टी स्वतःहून केल्या तर मला खात्री आहे कि सामान्य नागरिक सुध्धा शिस्तीत वागू लागतील.
प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपणहूनच हेल्मेट घातले पाहिजे.
शिस्त हि वरून खाली येते असा माझा विश्वास आहे .
चला भारतीय नागरिकांनो आपण स्वतःहून नियम पाळायला सुरुवात करूया.
No comments:
Post a Comment