Wednesday, March 30, 2011

News Published in Maharashtra Times dt. 31st March, 2011

Following news was published in Maharashtra Times .

In this news following photo of one Shree. Shanti Processors ,Mohan Mill Compound , Kolshet Road, Thane West was published.

As on date this factory is still polluting.

Also another 3 factories are there in Thane Municipal Corporation limits, which use COAL as a fuel for their boilers.

Type of Air Pollution because of Coal Fired Boilers is known to everybody.

Let’s see when we residents of Ghodbunder Road will get FRESH AIR TO BREATH .


ठाणे + कोकण


शुद्ध हवेच्या लढ्याला यश
31 Mar 2011, 0433 hrs IST




म. टा. प्रतिनिधी


घोडबंदर रोड येथील रवी स्टील आणि शांती प्रोसेशन या प्रदूषणकारी कंपन्यांच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. रवी स्टील या कंपनीने आपला गाशा या भागातून गुंडाळून भिवंडीला स्थलांतर केले आहे. शांती प्रोसेशन या कंपनीतील प्रदूषण मात्र सुरूच असून ते कमी करण्यासाठी आता रहिवाशांचे प्रयत्न सुरू आहेत.



घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्घ हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाणी यामुळे येथील लोकांचे जगणे असह्य झाले होते. कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायूमुळे डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातील रहिवासी करीत होते. सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सत्यजीत शहा या जागरुक नागरिकाच्या नेतृत्वाखाली कोलशेत रोड येथील श्रुती पार्क, माजिवडा येथिल रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ येथील ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्यांनी शुद्ध हवेसाठी लढा उभारला होता.

प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कामगार उपायुक्त कार्यालयापासून ते थेट पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यापर्यंत तक्रारींचा पाढा, आ. संजय केळकर यांच्या सहकार्यांने विधिमंडळात उठविलेला आवाज असे विविध मार्ग अवलंबून स्थानिकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून या कंपन्यांना नोटिसाही धाडण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात अचानक रवी स्टील या कंपनीतील प्रदूषण बंद झाल्याने रहिवाशांना सुखद धक्का बसला. सत्यजीत शहा यांनी त्याबाबत चौकशी केल्यानंतर रवी स्टील या कंपनीने भिवंडीत स्थलांतर केल्याची माहिती पुढे आली आहे. 'रवी स्टीलमधून होणाऱ्या प्रदूषणातून आमची मुक्तता झाली असली तरी शांती प्रोसेशन या कंपनीच्या प्रदूषणाचा आजही आम्हाला त्रास होत आहे. ही कंपनी बंद व्हावी अशी आमची इच्छा नसून त्यांनी योग्य ती खबरदारी घेत प्रदूषण नियंत्रणात ठेवावे', असे मत सत्यजीत शहा यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment