Thursday, March 10, 2011

News in LOKSATTA dt. 11th March, 2011 about Air Pollution on Ghodbunder Road

Folloiwng news article was published in Thane Vrutant of LOKSATTA dt. 11th March, 2011.

I would like to really thank all the friends from m PRINT and T.V. media for supporting our this fight and taking this fight to the readers , viewers.

In case you also feel the this issue is serious and the cause is genuine , then please join in our this fight against Air Pollution on Ghodbunder Road, Thane.




घोडबंदरवासियांचा आता प्रदूषणाविरुद्ध लढा

ठाणे/प्रतिनिधी, शुक्रवार, ११ मार्च २०११

निसर्गरम्य वातावरणाचा हवाला देऊन घोडबंदर रोडलगत वेगाने विकसीत होत असलेल्या नव्या ठाण्यातील रहिवासी तेथील काही कंपन्यांमधून सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विषारी धुराविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार पुराव्यानिशी तक्रार करूनही दोषी कारखान्यांविरुद्ध कारवाई करण्यात कुचराई होऊ लागल्याने या रहिवाशांनी आता हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिकडेच घोडबंदर परिसरात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांचे रितसर व्हिडीओ चित्रीकरण करून त्याच्या प्रती पुरावा म्हणून वितरीत करण्यात आल्या आहेत.
ठाण्याच्या या भागात पूर्वी औद्योगिक वसाहती होत्या, हे वास्तव असले तरी आता या भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. किंबहुना ठाण्याचा विस्तार प्राधान्याने याच भागात होत आहे. आता नवीन ठाणे म्हणून हा परिसर ओळखला जातो. या बदलत्या परिस्थितीतही कोळशाचा इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर होणारे काही कारखाने इथे अजूनही अस्तित्वात आहेत. फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भविण्यास हवेतील प्रदूषण हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यास भाग पाडावे, यासाठी घोडबंदर रोड परिसरात राहणारे काही नागरिक आग्रही आहेत. त्यात भारत कदम, दीपाली पाटील, महेश जोशी, मैथिली चेंदवणकर, प्रांजल राऊत, आर.आर.जाधव, सत्यजित अहेर, शंकर तलवार, सुहास पोतनीस, सुनील बारहाते, तांबे, सत्यजित शहा आदींचा त्यात समावेश आहे. सत्यजीत शहा यांनी माहितीच्या अधिकारात कोळशाचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या कारखान्यांची माहिती मागविली. त्यातून उघड झालेल्या माहितीनुसार ठाण्यात माजिवडा, कोलशेत रोड, बाळकूम आणि आझादनगर येथे कोळशाच्या इंधन म्हणून वापर करणारे पाच कारखाने असल्याचे उघड झाले आहे. घोडबंदर परिसरात पूर्वी तीन कारखाने होते. आता दोन कंपन्या कार्यरत आहेत. आमचा कंपन्यांना विरोध नसून त्या करीत असलेल्या प्रदूषणास आहे. त्यांनी प्रदूषण नियंत्रित ठेवून उत्पादन काढावे, त्याला आमची हरकत असणार नाही, असे शहा यांनी ‘वृत्तान्त'शी बोलताना सांगितले. कोळशाचा इंधन म्हणून वापर करणारे तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ३४ कारखाने आहेत तर तलासरी, डहाणू आणि पालघरमध्ये आठ कारखाने आहेत, अशी माहितीही शहा यांना मिळाली आहे. अनेकदा पहाटे सर्व रहिवासी झोपेत असताना या कारखान्यांमधून मोठय़ा प्रमाणात धूर सोडला जातो. देशातील एक आदर्श शहर म्हणून नावारुपास येणाऱ्या ठाणे शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून केले जाणारे प्रदूषण येथील रहिवाशांच्या आरोग्यास घातक आहे. तेव्हा येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एक तर हे कारखाने अन्यत्र स्थलांतरीत करावेत, किंवा त्यांना प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडावे, अशी घोडबंदरवासियांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment