Following news was published in PRAHAAR on 23rd March, 2011 about our fight. By mistake my name was published as Satyajit Singh in stead of Satyajit Shah.
It is a shock that news about Air Pollution is never a Breaking News. In short Authorities are not bothered for this serious issue.
I don;t know when we residents of Ghodbunder Road, Thane will get Fresh Air to Breath ?
घोडबंदर रोडची घुसमट
23 March, 2011 05:50:00 AM स्वप्नाली ढवळे
फॉन्ट साईज
एकेकाळी औद्योगिक वसाहतींमुळे ठाण्याचे नाव राज्यातच नव्हे; तर आशिया खंडात अग्रेसर होते. गेल्या काही वर्षात येथील कारखाने बंद पडत गेले. घोडबंदर रोड परिसरातील कारखाने आणि उद्योगांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. सध्या काही कारखाने सुरू आहेत. त्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणा-या रासायनिक वायूंनी घोडबंदर रोड परिसरातील कोलशेत, माजिवडा भागातील रहिवाशांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मुंबई- ठाण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या घोडबंदर परिसरातील रहिवासी वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. शहरापासून थोडे दूर निसर्गाच्या सान्निध्यात आणि स्वच्छ परिसरात राहण्याची स्वप्ने पाहात येथे स्थायिक झालेल्यांना धूळ, धूर आणि दूषित वायूंमुळे होणारी घुसमट सहन करावी लागत आहे.
एकेकाळी औद्योगिक वसाहतींमुळे ठाण्याचे नाव राज्यातच नव्हे; तर आशिया खंडात अग्रेसर होते. गेल्या काही वर्षात येथील कारखाने बंद पडत गेले. घोडबंदर रोड परिसरातील कारखाने आणि उद्योगांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. सध्या काही कारखाने सुरू आहेत. त्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणा-या रासायनिक वायूंनी घोडबंदर रोड परिसरातील कोलशेत, माजिवडा भागातील रहिवाशांच्या आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. येथील पाच कंपन्यांच्या बॉयलरमध्ये ज्वलनशील पदार्थ म्हणून कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यांच्यातून बाहेर पडणा-या काळ्या धुरामुळे वायुप्रदूषण होते. त्या कारखान्यांच्या चिमण्या कमी उंचीच्या आहेत. त्यामुळे इमारतींच्या भिंतीदेखील काळवंडल्या आहेत. विकासाच्या वाढत्या गतीबरोबर निसर्गाचे सान्निध्य दुरावू लागले आहे. अनेक गृहसंकुलांच्या रूपाने सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. येथील जागांचे भाव प्रचंड वाढल्यामुळे काही कारखानदार येथेच ठाण मांडून बसले आहेत.
येथील रहिवासी सत्यजित सिंग आणि त्यांच्या सहका-यांनी येथील प्रदूषणाच्या समस्यांबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री, राज्याचे पर्यावरणमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी, त्याचबरोबर ठाणे महापालिका आयुक्त अशा सर्व सरकारी यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी त्याकडे लक्ष देऊन घोडबंदर परिसर प्रदूषणमुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वायुप्रदूषणामुळे तेथील रहिवाशांना वारंवार सर्दी-पडसे, श्वसनाचे विकार होतात. त्याचबरोबर त्वचाविकार, फुप्फुसांचे आजार, डोळे चुरचुरणे असे त्रासही होतात.- स्नेहल ठक्कर, स्थानिक डॉक्टर
कारखान्यांतून बाहेर पडणा-या धुरामुळे वायू प्रदूषण तर होत आहेच. शिवाय येथून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाची समस्याही भेडसावू लागली आहे.- सत्यजित सिंग, रहिवासी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment