Monday, September 24, 2018

" लोकसत्ता " - एक खरं खूर मराठी दैनिक

" लोकसत्ता " - एक खरं खूर मराठी दैनिक

हे विधान मी फार जपून त्याचप्रमाणे संपूर्ण शुद्धीत व पुराव्यानिशी करीत आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक मराठी दैनिके आहेत . त्यात बातम्या अजूनतरी मराठी भाषेत  दिली जातात , पण त्या मराठी भाषेतील बातम्यांमध्ये  २० ते  ३० % इंग्रजी शब्द , वापरले जातात . म्हणजेच  इंग्रजीच्या कुबड्या घ्याव्या लागतात .

पण माझे निरीक्षण आहे कि , " लोकसत्ता "  हे दैनिक मात्र बातम्या शुद्ध मराठीत देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात . पुराव्यादाखल रविवार , २३ सप्टेंबर , २०१८ च्या " लोकसत्ता " मधील हि बातमी वाचा .

" फेरवापराची स्पर्शभिंगे "   म्हणजे REUSABLE CONTACT  LENSES  . 

या अश्या शुद्ध  मराठी वापराबद्दल मी " लोकसत्ता  " चे संपादक  श्री  गिरीश कुबेर यांचे मनापासून आभार मानतो .  अश्या प्रकारे मराठीत इंग्रजीच्या कुबड्या घेणं कमी केलं तर आपोआपच मराठी भाषा लोप पावण्यापासून वाचू शकेल . 

मी तर माझ्या परीने शुद्ध मराठी बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करतो .


" आपले पोलीस " , " वाहतूक पोलीस मित्र "

" आपले पोलीस " , " वाहतूक पोलीस मित्र " 

कालच  सगळ्यांच्या लाडक्या  गणपती बाप्पांचे  विसर्जन सुरळीत पणे  पार पडले . 

आपण सगळे कबूल कराल कि अश्या प्रकारच्या सणात आपले  खाकी गणवेशधारी पोलिस बंधू आणि भगिनी त्याच प्रमाणे वाहतूक पोलिस बंधू आणि भगिनी अक्षरशः अहोरात्र कामे करून सगळे सण सुरळीत पणे  पार पाडण्यासाठी प्रयत्न शील असतात. अश्या वेळी त्यांना त्यांची तहान, भूक   देखील  विसरावी  लागते.

आपलं जर त्याना या बद्दल तोंडी धन्यवाद दिले, एखादी पिण्याच्या पाण्याची बाटली दिली, तर पहा त्यांच्या चेहऱ्यावर कशी व किती ख़ुशी फुलते. माझ्या मते आपण एवढे तरी जरूर करू शकतो.

त्याच प्रमाणे आपण  स्वतःहून  नियमाने वागून त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतो.

त्यांचे हे कष्ट मी या दोन्ही  कवितांमध्ये  व्यक्त केले आहेत.



Friday, September 21, 2018

भटक्या कुत्र्याचा चिमुकलीला चावा

भटक्या कुत्र्याचा चिमुकलीला चावा - महाराष्ट्र टाईम्स - २१ सप्टेंबर, २०१८ 

कोठे गेले प्राणी मित्र, कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 

अजून किती घटना घडल्यावर शासन जागं होणार आहे ? 


ठाणेकरांनो पादचारी पूल वापरा

ठाणेकरांनो पादचारी पूल वापरा


गेली अनेक वर्षे मी घोडबंदर रोड ठाणे येथील महामार्गावर  रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी पादचारी पुल असावेत साठी लढलो. शासनाने उशीरा का होईना , पण काही ठिकाणी पादचारी पूल बांधले , पण  ८० ते ९० % सुशिक्षित ठाणेकर मात्र अजूनही धोकादायक पणे महामार्गाच्या   १० मार्गीका हमरस्त्यातूनच ओलांडून जातात. 

या छायाचित्रातील पादचारी पूल हा तत्वज्ञान विद्यापीठाजवळील आहे . कोणत्याही वेळी  रास्ता ओलांडण्यासाठी त्या पादचारी पुलाचा  वापर करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य असते , पण तेच वेगवान वाहनाच्या रहदारीतून धोकादायकपणे महामार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या मात्र भरपूर असते . 

प्रत्येक अपघात झाल्यावर फक्त शासनाच्या नावे बोटे मोडण्यात अर्थ नसतो . 

हे थांबल पाहिजे.

कसं आहे झोपलेल्याला झोपेतून उठवू शकतो , पण  देखील धोकादायकपणे महामार्ग ओलांडणाऱ्या  या अश्या ( झोपेचे सोंग घेतलेल्या ) सुशिक्षित व्यक्तींना  कोण झोपेतून जागे करणार ? 



Wednesday, September 19, 2018

स्मार्ट ठाणे का विद्रुप ठाणे - " अनधिकृत फलकांचे " ( ILLEGAL HOARDINGS ) चे ठाणे



"स्मार्ट ठाणे का विद्रुप ठाणे"


हे असे चित्र ठाणे नावाच्या एका स्मार्ट शहरात जागो जागी , गल्ली बोळात दिसून येते. माझ्या माहितीप्रमाणे अनधिकृत फलक ( ILLEGAL HOARDINGS ) लावणे यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे . तुम्हीच ठरवा याला स्मार्ट ठाणे म्हणायचे का विद्रुप ठाणे म्हणायचे ? लोकप्रतिनिधीनी जर असे केलं तर कोणाकडे तक्रार करायची ?


असं म्हणे कि कोणे एके काळी ( शेकडो वर्षांपूर्वी ) , ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे , पण आत्ता तेच ठाणे शहर हे " अनधिकृत फलकांचे " ( ILLEGAL HOARDINGS ) चे एक स्मार्ट शहर म्हणून आपसूकच ओळखले जात आहे.






Monday, September 17, 2018

रामचंद्र नगर , डोंबिवली पूर्व - भटक्या कुत्र्यांचा १३ वर्षे वयाच्या मुलीवर हल्ला

" रामचंद्र नगर , डोंबिवली पूर्व - भटक्या कुत्र्यांचा १३ वर्षे वयाच्या मुलीवर हल्ला "

१८ सप्टेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध दैनिकातील बातमी वाचा . 

त्या मुलीवर डॉक्टर आनंद हर्डीकर , जे माझ्या प्रमाणेच गेली अनेक वर्षे या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीविरुद्ध लढत आहेत. . 

यापूर्वीच डोंबिवली येथील " पलावा " या एका कुंपण असलेल्या उच्चभ्रू रहिवासी संकुलातील एका मुलीवर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता . 

जपून रहा , हा असा भटक्या कुत्र्यांचा हल्ला कोणावरदेखील होऊ शकतो . 



Sunday, September 16, 2018

ठाणे करांनो , उठा करदात्यांच्या पैशाचा , हा असा अपव्यय थांबवा - गडकरी रंगायतन

ठाणे करांनो , उठा  करदात्यांच्या पैशाचा , हा  असा अपव्यय थांबवा . 

कृपया १७ सप्टेंबर, २०१८ च्या " दैनिक ठाणे वैभव " मध्ये छापून आलेली " दुरुस्तीच्या खर्चातून उभे राहिले असते नवे रंगायतन  " हि बातमी वाचा . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !